Monday 27 June 2011

अल्प वैवाहिक सौख्य

                                                                ||        श्री         ||

काल माझे एक मित्र वरील पत्रिका घेऊन आले. मला म्हणाले 'हि पत्रिका माझ्या एका नातेवाईक मुलीची आहे. तीच तिच्या नव-याशी पटत नाही. काय अडचण आहे बघा जरा ? त्यांनी दिलेली पत्रिका सोबत जोडली आहे. खाजगी कारणास्तव पत्रिकेत नाव घातल नाही. 

मी पत्रिकेच्या दशा अंतर्दशा बगीतल्या. तिला मंगळाची  दशा व शनीची अंतर्दशा चालू आहे. पत्रिकेतील दशा वगैरे पाहून मी खालील जंत्री मांडली.  हि कुंडली अभ्यासकांनी जरूर बघावी.

मंगळाची महादशा ०४-०४-२००८  ते ०४-०४-२०१५
महादशा स्वामी मंगळ : ८ ९ १ १० २ ७
अंतर्दशा स्वामी शनी : ६ १० ९ ४ ५

 पत्रिकेत महादशास्वामी मंगळ १० २ ७ असून तो शुक्राच्या नक्षत्रात आहे. शुक्र ९ १ लागलाय. तो पत्रिकेतील ८ ९ १ भावांचा बलवान कार्येश आहे.  अंतर्दशास्वामी शनी ९ ४ ५ असून तो चंद्राच्या नक्षत्रात. चंद्र ६ १० आहे. सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी बुध आहे व तो ८  ९  १  ३  १२ ७ या भावांचा बलवान कार्येश आहे.

वरील जंत्री बगता घटस्फोट अटळ आहे हे लक्षात येईल. सर्व कार्येश ग्रह कुटुंबस्थान, विवाह्स्थान व लाभस्थानाच्या विरोधात बलवान आहेत. 

अशा जातकाला  मारहाण, मानसिक त्रास, छळ वगैरे सारख्या त्रास भोगावा लागणारच. 

पण हि सध्या स्थिती आहे. कदाचित पुढची महादशा वेगळ काही घडून आणू शकते म्हणून मी पुढील येणारी महादशा बघितली. ती दशा राहूची. ती ०४-०४-२०१५ ते ०४-०४-२०३३ पर्यंत आहे.  

राहू व्ययात असून त्यावर चंद्राची दृष्टी आहे व त्याचा नक्षत्रस्वामी शुक्र आहे. म्हणजे राहू हा ६  १०  १२  ८  ९  १ असा लागलाय. एकही कार्येश ग्रह वैवाहिक सुखासाठी कारक नाही. म्हणजे २०३३ पर्यंत हे असच चालणार.


अशात पुनर्मिलन वगैरे प्रकार शक्यच नाही किंवा पुढे कधीतरी या जाचातून सुटका होईल अशी आशाहि नाही. त्यामुळे मी सांगितले कि घटस्फोट घेण्याच्या प्रोसेसला लागा. घटस्फोट तत्काळ मिळण्याची परिस्थिती आहे.

त्यांनी सांगितले कि तुम्ही सांगता ते अगदी खर आहे. घटस्फोट घेण्याच्या तयारीला आम्ही लागलो होतो. पण गेल्या महिन्यातच तिच्या नव-याचा मृत्यू झाला. हे एकूण धक्काच बसला. कारण हे त्यांनी अनपेक्षित सांगितले.  मी त्यांना विचारले कि तुम्ही मला हे आधी का नाही सांगितले? ते म्हंटले कि 'नशीब'  हा प्रकार खरच असतो का हे बघायचे होते ? त्यामुळे काय घडल ते सांगितले नाही. पण तुम्ही जे सांगितले ते अगदी शंभर टक्के बरोबर आहे. अन नशीब हा प्रकार खरच असेल तर तिच्या नशिबात पुढे काय आहे हेही विचारायचं होत ?

मी त्यांना सांगितले कि एकंदरीत या जातकाच्या नशिबात वैवाहिक सौख्य अगदीच अल्प आहे. पुनर्विवाह करूनही परिस्थिती साथ देणार नाही २०३३ पर्यंत हे असच चालणार. तोपर्यंत तीच वय पन्नाशीच्या आसपास जाईल. 

नशीब शेवटी !  काय ..  अस म्हणून ते उठले. 

ते गेले पण मी मात्र विचारातून बाहेर पडलो नव्हतो. आपण घटस्फोट या विषयावरच लक्ष्य केंद्रित केल्यामुळे हि घटना लक्ष्यात आली नाही का ? पुन्हा एकदा मी पत्रिकेत डोक खुपसून बसलो. बगता .. बगता..  बगता .. क्षणार्धात क्लिक झाल. आयची S  रे  S   S   या  S   मंगळाच्या.

पत्रिकेत मंगळ सप्तमेश आहे, मंगळाचीच दशा चालू  व तो शुक्राच्या माध्यमातून अष्टमाचाही बलवान कार्येश झालाय. सप्तमेश मंगळ अष्टमात. वैधव्य योग.

मी माझ्या मागच्या लेखात  'मंगळाचाच दोष का मानतात ?'  यामध्ये सप्तमेश मंगळ जर अष्टमात असेल तर वैधव्य योग येतोच हे लिहिले आहे.  

आपला 
नानासाहेब  पाटील

Thursday 23 June 2011

मी कुठले रत्न धारण करू ?

कुठले रत्न धारण करावे याबद्दल ब-याचदा संभ्रम निर्माण होतो. काही वेळा नको ते रत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो अन ते अंगाशी येत. 

समजा चंद्र दशमात  आहे व चंद्राच्या मालकीची कर्क रास तृतिय भावारंभी आहे. गुरु पंचमात असून अष्टमेश व लाभेश आहे.  चंद्र दशमात म्हणजे नोकरीचा सुकाळ. अनेक नोक-या मिळतात, मानसन्मान, सामाजिक जीवनात यश मिळते, धंदा व्यवसायात उर्जितावस्था येते. 

एखाद्याच चांगभल असेल तर तो ज्योतिष्याकडे जाणार नाही. पत्रिकेत चंद्र दशमात असूनही  तो ज्योतिषाकडे येतो व नोकरी गेल्याच किंवा व्यवसायात अडचणी निर्माण झाल्याच सांगतो. 

चंद्र दशमात असूनही नोकरी जाते, नोकरी मिळत नाही किंवा व्यवसायात अडचणी निर्माण व्हायला लागतात का होत अस ?  वर सांगितल्या प्रमाणे चंद्र जरी दशमात असला तरी तो गुरूच्या मालकीच्या नक्षत्रात आहे व गुरु पंचमात असून तो अष्टमेश व लाभेश आहे म्हणजेच ५,८,११ आहे व चंद्र १०, ३ आहे. म्हणजेच चंद्र ज्या भावस्थानाचा कार्येश आहे त्याच्या ऐवजी गुरु ज्या भावस्थानाचा कार्येश आहे त्याचीच  फळे मिळतील व त्यानंतर जमल्यास चंद्र ज्याठिकाणी आहे त्याची फळे मिळतील.     

गुरु पंचमात म्हणून तो षष्टाच्या व्यय स्थानाचा  बलवान कार्येश झाला अशा अवस्थेत नोकरी जाणारच, नोकरी मिळणारच नाही किंवा धंदयाची पार वाट लागेल.

मग अशा जातकाला कुठले रत्न धारण करावे लागेल कळले का ?  पुष्कराज ? कारण धंदयात बरकत म्हंटल कि बरेच व्यावसायिक पुष्कराज धारण करताना दिसतात. पण  जर या जातकाने  पुष्कराज रत्न धारण केले तर धंदयात ऊर्जितावस्थेऐवजी मोठा तोटा होऊन दिवाळखोरीच दिसेल.

रत्न धारण करूनही त्याला रिझल्ट्स मिळत नाही व जातकाचा मात्र जोतिष शास्त्रावरचा विश्वास उडून जातो.

मग अशावेळेस चंद्रबल वाढवण्याकरिता मोती रत्न धारण करण्याचा सल्ला त्याला दिला जातो व तेच योग्य आहे. 

कुठलेही रत्न धारण करताना एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा सहा, आठ,  बारा  या स्थानांचे रत्न कधीच धारण करू नये.

कारण सहावे रोग स्थान आहे, आठवे मृत्यू स्थान आहे व बारावे व्यय स्थान आहे. या स्थानांचे ग्रह नकारात्मक भूमिका निभावत असतात. यास्थानांची रत्ने वापरणे म्हणजे शत्रूची ताकद वाढवण्यासारख होईल.  

लग्नात मंगळ असलेल्या व्यक्तीने जर पोवळे वापरले तर तो स्वतःच भांडणे करीन व सांगेन सध्या माझ  कुणाशीच पटत नाही. कस पटणार मेषेचा मंगळ म्हणजे अग्नी. पोवळे धारण करून आगीत तूप ओतल्यासारखच  होईल.

शुक्र कलेशी  निगडीत आहे कलेचा कारक आहे. एखादयाचा कलेशी संबंधित व्यवसाय असेल तर अश्या व्यक्तीला हमखास शुक्राचे रत्न  हिरा वापरायला सांगतात. ब-याच बायकांना हि-याचे दागिने वापरण्याची हौस असते. 

समजा जातक जर स्त्री असेल व शुक्र चतुर्थात असेल तर ती  अविवाहित आहे तोपर्यंतच त्या जातकाने हिरा धारण केला तर लाभदायक ठरेल. लग्न झाल्यानंतर मात्र ते रत्न वापरू नये. कारण शुक्र चतुर्थेश असल्यामुळे पंचमाचा व्ययेश आहे व तो संतती होण्यास अडथळे निर्माण करणारच. 

मग पुन्हा ज्योतिष्याकडे ! संतती होत नाही म्हणून !

आपला 
नानासाहेब पाटील

Monday 20 June 2011

राहू - केतूची महादशा

कृष्णामुर्तिनी सांगितले आहेच कि  छायाग्रह हे दृश्य ग्रहांपेक्षा बलवान असतात. ज्या कुंडलीस राहू किंवा केतूची महादशा असते किंवा दशा स्वामी राहू किंवा केतूच्या नक्षत्रात असतो. अशा लोकांचे प्रश्न देखील विचित्र असतात.

योग्य प्रकृती असूनसुद्धा संतती होत नाही.
मुलांच्यात काही विचित्र दोष असणे
संततीचा अचानक मृत्यू, घरात नेहमीच भांडणे होणे
व्यक्ती घरातून पळून जाणे
स्रियांच्या बाबतीत तारुण्यातच मासिक पाळी बंद होणे
सतत गर्भपात होणे
घरातल्या सर्वच व्यक्तींना विक्षित चिंता असणे उदा. नोकरी न लागणे, व्यवसायात तोटा होणे, विवाह न होणे किंवा मुल न होणे
कानात गुं गुं आवाज होत असल्याचा भास होणे
वेड लागणे
नेहमी झोपावसे वाटणे
आळसाने कोणतेही काम करण्याची इच्छा न होणे
अंगात पैशाचिक संचार होणे इ. 

यासारखे अनेक प्रश्न येतात. जे सर्व साधारण व्यावहारिक प्रश्नांच्या पलीकडचे आहेत. 
राहू केतूच्या अधिपत्याखाली कुंडली असताना अनेक लोक डॉक्टरी उपचार करून थकलेले असतात. म्हणून त्यांना व्यवहारिक किंवा वैद्यकीय उपचारांच्या पलीकडील उपायांची गरज असते.
अशा जातकांना भयंकर मानसिक अवस्थेतून जावे लागले नाही तर नवलच !

आपला 
नानासाहेब पाटील 


Sunday 19 June 2011

नव ग्रहांपैकी फक्त मंगळ ग्रहाचाच दोष का असतो ?

नव ग्रहांपैकी फक्त मंगळ ग्रहाचाच दोष का असतो ? इतर ग्रहांचा दोष का मानत   नाहीत ? कारण मंगळ हा पाप ग्रह आहे, अविचारी आहे,  अग्नी प्रकृती आहे, जलद गतीने परिणाम करणारा आहे. वैवाहिक सुखात बाधा निर्माण करतो.  

हा मंगळ जर १ ४ ७ ८ १२ पैकी असेल तर मंगळ दोष मानला जातो किंवा मंगळाची पत्रिका समजली जाते.  

शनी सुद्धा पाप ग्रह आहे पण तो अकस्मात हानी करीत नाही. तो नियोजनबद्ध वाट लावतो.

या पाचच भावात मंगळ दोष का? सौम्य व कडक मंगळ केंव्हा समजावे ? 

ज्या भावात मंगळ असतो त्यापेक्षाही जास्त परिणाम तो दृष्टी असलेल्या ठिकाणी करतो. 

जर मंगळ 1st house मध्ये असेल किंवा लग्नात असेल तर त्याची दृष्टी सप्तमावर म्हणजे विवाह स्थानावर असते. जातकाचा स्वभाव तापट असतो. त्याची चौथी दृष्टी चतुर्थ स्थानावर असते. या भावावरूनच सर्व सुखे बघितले जातात. सुखाची हानी करतोच व वैवाहिक सुखाचीही हानी करतो. स्रियांना वैवाहिक सुखाचा कारक मंगळ आहे. त्यामुळे त्यांना तो जास्तच त्रासदायक ठरतो. पुरुषांपेक्षाही स्रियांना मंगळ दोष जास्त त्रास देतो. 

पुरुषाच्या कुंडलीत मंगळ जर सप्तमात असेल तर पत्नी कर्कश, तापट, कैदासीन मिळते. म्हणजेच सप्तमात मंगळ असेल तर वैवाहिक जोडीदाराचा स्वभाव तापट असतो. 

अष्टमात मंगळ असेल तर आकस्मित मृत्यू , पूर्ण आयुष्य नाही, घातपात, अपघात, घर सोडून जाणे, दूरदूर रहाणे असे भोग वाट्याला येतात. एकंदरीत काय तर वैवाहिक सुख मिळत नाही. 

व्यय स्थानात जर मंगळ असेल तर मंगळाची आठवी दृष्टी सप्तमावर असते. व्ययात मंगळ म्हणजे अशुभ. हे शैयासुखाचे स्थान आहे. अनेक अपप्रकार निर्माण होतात. शैयासुख नष्ट होते. लग्नबाह्य संबंध स्थापित होतात. म्हणून मंगळ दोष मानला जातो. 
       
जर मंगळ १ ८ १० ४ ३ ६ या राशीचा असेल तर सौम्य असतो. मेष व वृश्चिक या स्वराशी आहेत. उच्च राशी मकर असेल तर मंगळ दोष नाही . मंगळ जर शत्रूराशीत असेल म्हणजे ३ ६ असेल तर मंगळ दोष नाही. जर मंगळ निचीचा असेल तर बलहीन असतो. उदा. कर्क राशी. मंगळ दोष नाही. मंगळ जर रविजवळ असेल किंवा एकाच अंशात्मक युतीत असेल तर सौम्य मंगळ. याचाच अर्थ मंगळ दोष नाही.

आयुष्यात २०-५० हे वैवाहिक सुखाचे वर्ष समजले जातात. या दरम्यानच जर मंगळाची दशा  येत असेल तर मंगळ दोष समजावा. दशा भयंकर परिणाम करते. जातकची अक्षरश: दशा दशा होते.

सप्तमेश मंगळ अष्टमात किंवा अष्टमेश मंगळ सप्तमात असेल तर महादोष. स्रीजातक असेल भयंकर दोष. वैधव्य येण्याची दाट  शक्यता. 

मंगळाच्या पत्रिकेत जर गुरु ६ ८ १२ असेल तर गुरूच बल मिळणार नाही. वैवाहिक आयुष्याची धूळदान होते.

आपला
नानासाहेब पाटील