Wednesday 3 August 2011

गुण मेलनावरून विवाह करण्याचा प्रकार - भाग 2

सध्याची विवाह जमविण्याची पद्धत ग्रामीण भागातील लोकांच्या मनात खोलवर रुजली आहे.  शहरी भागातील लोक मात्र या विषयाकडे चौकस नजरेने पहायला लागलेत. जातकाच्या  जीवनात वैवाहिक सौख जर चांगले असेल तर त्याच प्रकारची वैवाहिक सौख्य उत्तम असलेली कुंडली त्याच्याशी जुळवायला हवी.

ज्या कुंडलीत वैवाहिक जीवन बिघडलेले असेल अश्या जातकाने  ज्योतीर्विदाने सुचविलेले उपाय करून वैवाहिक जीवन सुखकारक कसे होईल हे बघावे. काही जण तात्पुरती सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. पण काही काळानंतर शक्य होत नाही. 

अर्थात ज्याच लग्न ठरत त्याला वैवाहिक जीवन बिघडते म्हणजे काय होत याचा अंदाजच नसतो. ब-याच लोकांना स्वतःबद्धाल नको तेव्हढा आत्मविश्वास असतो. ते बिनधास्त लग्न करतात. आणि ज्यावेळेस वैवाहिक जीवन बिघडते तेंव्हा मात्र त्याच खापर जोडीदाराच्या माथी फोडतात. 

विवाह काळात महादशा स्वामी जर अष्टमाचा बलवान कार्येश असेल तर त्या मुलीने सासर कडील इतर व्यक्ती उदा. सासू, नणंद, दीर वगैरे मंडळींशी जमवून घेतले नाही तर वैवाहिक जीवन बिघडून जाते. पती-पत्नीचे एकमेकावर प्रेम असते पण पतीच्या घरच्या लोकांमुळे वैवाहिक जीवन उपभोगता येत नाही. अनेक मुली याच कारणामुळे पतीपासून दूर राहतात व शेवट घटस्फोट घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. 

एखाद्या मुलाच्या पत्रिकेत चतुर्थेश जर बलवान असेल तर असा मुलगा मातृभक्त असतो. म्हणजे जरा अतीच असतो. तो बायकोच काहीएक ऐकून घेत नाही. तिची चूक असो नसो तो तिला झापनारच. दोष त्याचा नसतो. 

अशा वेळेस आपले वैवाहिक जीवन कसे असेल हे जर अगोदरच  माहित झाले तर त्याप्रमाणे मानसिक, शारीरिक तयारी करता येते व एकमेकांचे दोष न बघता वैवाहिक जीवन जास्तीतजास्त सुखकारक कसे राहील यासाठी प्रयत्न करता येतात.


वैवाहिक जीवनात लैंगिक सौख्य हा विषय खूप महत्वाचा आहे. जातकाच्या पत्रिकेवरून त्याची लैंगिक सुख उपभोगण्याची पद्धती व क्षमता याचा अंदाज बांधता येतो.


या भावावर जर रविग्रह, सिंह राशीचा प्रभाव असेल तर अशी व्यक्ती विषय सुख उपभोगताना आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर राखते. सामान्य नैसर्गिक पद्धतीने सुख देते व घेते.

मंगळ  ग्रहाचा संबंध जर प्रभावी असेल तर असे लोक फार रांगडे असतात. त्यांना नेहमी घाई असते. आपल्या जोडीदाराच्या भावनांचा ते फारसा विचार करत नाही. शरीरसुख उपभोगताना विचित्र पद्धतीचा अवलंब करतात. नैसर्गिक सुखाबरोबरच अनैसर्गिक पद्धतीने सुख ओरबाडण्याची मानसिकता असते. जोडीदाराला शारीरिक वेदना देण्यात त्यांना आनंद वाटतो.
 
बुध ग्रहाचा परिणाम अधिक असेल तर असे लोक उन्मादकता कमी व  बालिश चाळेच जास्त करतात. जर बुध कन्येत असेल तर  जोडीदाराला नेहमीच अतृप्त ठेवतात.


चंद्राचा किंवा जलतत्वाच्या राशीचा संबंध अधिक प्रभावी असेल तर असे लोक विषयसुखात अत्यंत भावनाशील असतात. संभोगावस्थेत याचं मन अनेक विचारात गुंतलेले असते. कधी कधी अपूर्णावस्थेत संभोग क्रिया सोडून देतात. अशावेळेस हे लोक उन्मादक प्रेमाऐवजी सात्विक प्रेमाची उधळण करतात.

असा सर्वांगीण विचार करूनच पत्रिका जुळवायला हव्यात. 

शुभं भवतु !

नानासाहेब पाटील