Saturday 17 December 2011

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात..

नमस्कार !

आजकाल आपल्या लहान मुलांच्या शिक्षणाबद्दल मला विचारणा होत असते. मुलगा किंवा मुलगी अगदी  बाळ  असतानाच म्हणजे २ ते ३ वर्षाची असतानाच असा प्रश्न विचारला जातो. आपल्याकडे एक म्हण अगदी खूपच जुनी आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ती म्हण काही खोटी नाही. जसे ते पाय पाळण्यात दिसतात तसेच कुंडलीतही दिसतात. म्हणजे ' हे बालक  आपले शिक्षण पूर्ण करू शकेल का? ' उच्च शिक्षण करणार का ? डॉक्टर, होणार कि कम्पुटर , सिविल इंजिनिअर वगैरे वगैरे.?'

अर्थात आता पुर्वीसारख फक्त शिकायचं एवढाच विषय राहिलेला नाही तर शिक्षणा नंतर कुठल करियर निवडाव हे नुसतच  महत्वाच नाही तर अत्यंत महत्वाच झालेलं आहे.

नाहीतर मेक्यानिकल  इंजिनिअर कुठेतरी साईटवर बांधकाम करताना दिसतो किंवा एखादा डॉक्टर कलाकार होतो नाहीतर हॉटेल चालवतो.  असो.

एका महिला जातकाने माझ्याकडे  आपल्या मुला बद्दल तक्रार केली. मुलगा फार त्रास देतो, तो कोणाचे ऐकत नाही वगैरे. अशा तक्रारी तशा नेहमीच्याच असतात. मी त्यांना तसा बोललोही. पण त्यांनी पत्रिकेत काही दोष आहे का ते बघा म्हणून सांगितलं. मुलाच वय चार वर्ष.  

मी त्याची कृष्णमुर्ती पद्धतीने  पत्रिका तयार केली. 
चतुर्थाचा सब गुरु केतूच्या नक्षत्रात केतू . केतू  शनीच्या दृष्टीत तसेच शुक्राच्या नक्षत्रात. शनी तृतीयात नवमेश व दशमेश  आहे. शुक्र पंचमात व षष्टेश. केतूचा राशी    स्वामी रवी असून रवी षष्टात व चतुर्थेश तसेच रवी बुधाच्या नक्षत्रात. बुध षष्टात, लग्नेश, पंचमेश.

सध्या जाताकास शुक्राची महादशा चालू आहे. शुक्र पंचमात तसेच षष्टेश. शुक्र राहूच्या नक्षत्रात. राहू पुन्हा शनिच्याच दृष्टीत व शनी शुक्राच्या नक्षत्रात. राहूचा राशीस्वामीहि शनीच. राहूचा नक्षत्रस्वामी बुध आहे व तोही पंचमेश आहे.
 शुक्राची महादशा २०२० पर्यंत आहे. नंतर रवीची महादशा रवी बुधाच्या नक्षत्रात व बुध पंचमेश. रवीची महादशा २०२६ पर्यंत.  त्यानंतर चंद्राची महादशा २०३६ पर्यंत आहे. चंद्र केतूच्या नक्षत्रात. केतू शुक्र व बुधाच्या  माध्यमातून  पंचमेश झालाय.  त्यानंतर मंगळाची महादशा आहे. ती २०४३ पर्यंत आहे. मंगल राहूच्या नक्षत्रात. राहू बुध व शुक्राच्या माध्यमातून पंचम. नंतर येणारी महादशा राहूची. ती २०६१ पर्यंत आहे. म्हणजे राहूच्या महादशेत वरील ग्रहच  कार्येश असणार. 

 हि पत्रिका बाजूला दिलेली आहे. वाचकांना ती टिचकी मारून मोठी करून बघता येईल.

वरील जंत्रीच अवलोकन संपवल्यानंतर मी त्या बाईंना म्हंटल तुमचा मुलगा कलाकार होणार. व तो कलेच्या माध्यमातूनच करियर करणार. शुक्र व बुधाची पंचमातील उपस्थिती आणखी काय सांगणार.  

माझ  बोलन ऐकून त्यांना  आश्चर्याचा  धक्काच बसला. त्या म्हंटल्या 'अहो काय सांगताय काय ? . याचे पप्पा दोन तीन दिवसांपूर्वीच सांगत होते कि याला संगीताचा क्लास लावून देवू व एक हार्मोनियम सुद्धा घेवून देवू म्हणून. कारण हा सारखा एकटाच दिसेल त्या वस्तूवर हाताने वाजवत असतो,. गाणे गुणगुणतो,  पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल अश्याने म्हणून मीच नको म्हंटल.'
'काळजी करू नका. चतुर्थ व नवम भावही कार्येश आहे. तो यथावकाश त्याच शिक्षण पूर्ण करीन. पण त्याला तुम्ही जबरदस्तीने आमुक एकच शिक्षण घे अस करू नका. तो कलाकार आहे त्याच्या मूड प्रमाणे घ्या. 

त्या हसल्या व म्हणाल्या ' आता त्याची पत्रिकाच जर तो संगीतकार, कलाकार  होणार अस सांगतेय तर आता आम्ही त्या दृष्टीकोनातून त्याचा विचार करू...
यालाच म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात    कि   काय दिसतात ते वगैरे वगैरे...... 

आपला 
नानासाहेब पाटील