Wednesday 28 March 2012

विवाह बाह्य संबंध आणि मनस्ताप

ऑन लाईन कंसलटन्सी संपवून मी पाणी पिण्यासाठी पाण्याची बाटली हातातच घेतली होती इतक्यात  एक तरुण माणूस माझ्या कार्यालयात आला. मी त्याला बसायला सांगितलं. चेह-यावरून तो बराच त्रस्त दिसत होता. त्याच्या शारीरिक हालचालीवरून तो या क्षणी प्रचंड तणावात आहे हे लक्षात आल. अश्या वेळेस माणूस थोडक्यात आपली समस्या सांगूच शकत नाही हे गेल्या कितेक जातकांच्या अनुभवांती मला माहित झालेलं आहे. म्हणून मी त्याला आधी शांत करण्या करिता पाणी दिल. त्याच नाव, गाव विचारल, कोणी रेफरंस दिला वगैरे सारखे प्रश्न विचारले. हेतू हा होता कि आहे त्या मनस्थीतून थोडावेळ का होईना त्याला बाहेर काढण  आणि हेतू सफलही झाला बर का.   

मी त्याला विचारल "बोला काय अडचण आहे ?".

"आत्महत्या करण्याचे विचार डोक्यात चालू आहेत, गेल्या चार दिवसांपासून मी झोपलेलो नाही ?"

"का ? अस  काय भयंकर घडल कि असे नको ते विचार डोक्यात यायला लागलेत ?" मी अगदी फ्रीज

"सांगायला लाज वाटते. पण सांगितलं पाहिजे. तुम्ही मला यातून बाहेर काढा."  तो दडपणाखाली बोलला.

"काय असेल ते सांगा. संकोच करू नका " 

त्यान बोलायला सुरवात केली. त्याच्या एकंदरीत बोलण्यावरून जे काही कळल ते अस.....

त्याच लग्न झालेल आहे. त्याला दोन  मुल आहेत. बायकोही खूप चांगली सोज्वळ आहे. सर्व काही उत्तम चाललेलं असताना अचानक सहा सात महिन्या पूर्वी तो आणखी एका बाईच्या प्रेमात पडला. त्या बाई बरोबर जे काही संबंध होते ते चांगले चाललेले होते. अचानक  पाच सहा दिवसापूर्वी त्याचं टोकाच भांडण झाल. संबंध संपुष्टात आले आणि त्याची झोप उडाली. 

हे सगळ ऐकून मी म्हंटल " चांगल झाल. अश्या संबंधातून वाईटच निष्पन्न होत. आणखी काही वाईट घडण्या  अगोदर प्रकरण मिटल. आता नेमका प्रॉब्लेम काय आहे ?"

तो म्हंटला "मी तिला विसर म्हणता विसरू शकत नाही. रात्रं  दिवस तीच डोळ्यासमोर दिसते" 

"मग ? " मला कळेना मी काय मदत करू शकतो ते. 

"हे किती दिवस चालायचं ? मी यातन कधी बाहेर पडणार ? हे प्रकरण इथेच थांबेल कि परत पुढे चालू राहील ?"

अच्छा ! अस आहे होय. मला त्याची तीव्र इच्छा काय आहे ते कळल. पुनर्मिलन !

मी त्याची पत्रिका संघनकावर छापली व निरीक्षणाला सुरुवात केली.  
     
पत्रिका अभ्यासून झाल्यावर मी त्याला विचारल "या आधी पत्रिका कोणाला दाखवली  होती का ?"

तो म्हंटला "हो ब-याच जणांना दाखवली होती"

"त्यांनी काय सांगितलं होत " 

"तेच तर समजत नाही, प्रत्येकाने सांगितलं होत कि तुमच भविष्य उज्वल आहे. खूप जबरदस्त ग्रहबल का काय म्हणता ते आहे, पण प्रत्येक्षात तस काहीच घडल नाही. लग्ना आधी माझ कुठेही अस काही प्रकरण नव्हत. आताच कस झाल ते कळत नाही. काम धंदा सुद्धा धड चालत नाही. त्यामुळे जाम वैतागलोय मी"

मित्रहो  हि धनु लग्नाची कुंडली आहे. जे लोक लग्न कुंडली पाहून ज्योतिष सांगतात त्या फलिताची कशी काशी होते ते या पत्रिकेवरून आपल्या लक्षात येईल. पत्रिका बाजूलाच दिलेली आहे. नियमित वाचकांना सांगायची जरुरी नाही कि त्यावर टिचकी मारून मोठी करून पहा.

आधी लग्न कुंडली पहा. धनु लग्नाची पत्रिका आहे. लग्नेश  गुरु  लग्नात, त्याची सप्तमस्थानावर पूर्ण दृष्टी, सप्तमात शुक्र मिथुन राशीत. शुक्राची लग्नावर पूर्ण दृष्टी, चंद्र चतुर्थात तोही मीन या जल तत्वाच्या  राशीत,  मंगल भाग्यात,   रवी भाग्यात तेही स्वराशीत. अहाहा ! अशी पत्रिका म्हंटल्यावर माणूस कुटच्या कुठ जायला पाहिजे. नशीबवान आहेस पोरा !  अस त्यावेळी निव्वळ लग्न कुंडली मांडून ज्योतिष सांगणं-यांनी नक्कीच सांगितलं असणार. 

आता भाव चलित पत्रिका पहा. भाव चलित पत्रिका गणिताने तयार होते. गणित चुकल कि पत्रिका चुकते. असली गणित करायला ज्यांच्याकडे दरबार भरतो त्यांना वेळ मिळणार कधी ? असो . पूर्वी अस चालायचं. आता संघनकामुळे गणित करायची वेळ येत नाही. 

भाव चलित पत्रिकेत लग्नात राहू , धनु हि राशी द्विस्वभाव राशी आहे. त्यामुळे धनु लग्नाला सप्तम स्थान हे बाधकेश आणि मारकेश होत. सप्तमाचा स्वामी बुध अष्टमात. म्हणजेच सप्तमेश अष्टमात. गुरु व्ययात. काय होणार ? स्पष्ट आहे विवाह बाह्य संबंध किंवा अनैतिक संबंध  येणारच.

तसे आलेत, पण बुध अष्टमात  कर्क राशीत व सप्तमेश त्यामुळे वैवाहिक सौख्य अस्थिर,  मंगळ पंचमेशही  आहे. मंगळ पंचमेश असल्यामुळे प्रेम प्रकरणात मनस्ताप, चंद्र अष्टमेश त्यामुळे  मानसिक  संतुलन बिघडलेलं व कळस म्हणजे लग्नातील विषारी राहू डोक खराब करणार. चांगला विचारच सुचणार नाही, अविचारही  अविचार !  शिवाय लग्न धनु, धनु राशी म्हंटल म्हणजे असे  लोक नेहमी टोकाचीच भूमिका घेतात. एखाद्याच चांगल करायचं अस ठरलं तर लंगोटी सोडून देतील व वाईट करायचं ठरवलं तर जीव घेतील.

मी सर्व अभ्यास करून त्याला सांगितलं कि अजून चार वर्ष तुमचे संबंध टिकून राहतील. तोपर्यंत मंगळ पंचमेश आहे. नंतर शुक्राची महादशा लागेल व शुक्र सप्तमात मजबूत लागणार त्यामुळे वैवाहिक संबंध चांगले बळकट होतील. शुक्र गुरूच्या नक्षत्रात आहे व गुरु चतुर्थेश. एकदा का हि दशा लागली कि विषय संपला. 

यावर तो म्हंटला "आमचा संबंध आज न उद्या संपणार असेल तर आजच थांबायला काय हरकत आहे. मी आजच हे थांबवून टाकतो. अनायशा कारणही मिळाल आहे."

"वा वा क्या बात है ? जरूर जरूर ! असा पुरुषार्थ दाखवला पाहिजे " मी त्याला प्रोत्साहन देत म्हंटल खरी पण.. ? शक्य होत का हे त्याला ?

बोलता बोलता त्याला अचानक फोन आला आणि तो मग बोलतच राहिला. त्याचा तणाव ग्रस्त चेहरा नॉर्मलला येऊ लागला. हळू हळू तो विसरून गेला कि थोड्यावेळापूर्वी कसल्या भयंकर तणावातून गेलोय आपण. 

बोलतच तो उठला व खिशात हात घालून माझी फी दिली माझ्याकडे पाहून हातानेच परत येतो वगैरे सारख्या खुणा करून तो ऑफिस च्या बाहेर पडला. 

कोणाचा बर असेल तो कॉल ? येतोय का गेस करता? 

शुभं भवतु !

आपला 
नानासाहेब 

Saturday 24 March 2012

संतती सौख्य आणी प्रारब्ध

नुकतीच एक कंसलटन्सी संपवून मी जरा निवांत होतो न होतो तोच एक महिला जातक आल्या. अर्थात त्या   अपॉइंटमेंट घेऊनच आल्या  होत्या व अगदी वेळेवरही आल्या होत्या. मी त्यांना बसायला सांगितलं.

त्या जरा निवांत होताच मी म्हंटल "बोला काय अडचण आहे ?"

यावर त्यांनी काही क्षण विचार केला व सांगायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या "माझा संतती बद्दल प्रश्न आहे. द्वितीय संततीचा योग आहे किंवा नाही ते सांगा व असलाच तर कधी ?" .

मी संघणकावर  लगेचच त्यांची कुंडली छापून घेतली . ती बाजूला दिलेली आहे. गोपनियतेमुळे  मी नाव काढून टाकलय. 

पत्रिकेस शनीची  महादशा सुरू असून ती २०३० पर्यंत कार्यरत आहे. 

शनी  षष्टात,    लग्नेश  व  द्वितीयेश , शनी शनिच्याच नक्षत्रात त्यामुळे त्याचा उप नक्षत्र कार्येश होईल. शनी बुधाच्या उप नक्षत्रात, बुध चतुर्थात, षष्टात व नवमेश. म्हणजेच हि महादशा संततीस अजिबात पोषक नाही. शनी कुटुंब स्थानाचा क्षीण कार्येश आहे. म्हणजे संतती होणार पण सहजा सहजी नाही. कारण बुध चतुर्थाचा मजबूत कार्येश आहे.  अश्या स्थितीत गर्भपात होण, मुल न राहण वगैरे घटना घडतात.

या आधीची महादशा पहिली, ती गुरूची होती. 
गुरु ३  १२     गुरु - शुक्राच्या नक्षत्रात,  शुक्र ४  ५  १० 

म्हणजे प्रथम संततीस सुद्धा त्रास झाला असणार. मी तस त्या महिलेस विचारल. त्यांनी ते कबुल केल. त्या म्हणाल्या "पहिल्या संततीस सुद्धा खूप अडचणी आल्या. मेडिकल  ट्रीट मेंट घेतल्या नंतरच २००२ - २००३ मध्ये मुल झाल. त्या आधी ब-याच वेळा ट्रीटमेंट फेल सुद्धा  गेल्या. पाण्यासारखा पैसा खर्च झाला.  पहिल्या अपत्या नंतर आम्ही पुन्हा त्या डॉक्टरांकडून दुस-या अपत्या साठी  ट्रीट मेंट घेतली पण या वेळेस मात्र अपयश आल. अस  का ? "

अस का च उत्तर मी शोधल. गुरूच्या महादशेत त्यांना केतूची अंतर्दशा असताना पाहिलं अपत्य  झाल. 

केतू गुरूच्या युतीत, गुरु ३  १२,  व गुरु शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र ४  ५  १०     असा आहे.  केतूच्या अंतर्दशेत शुक्र पंचमेश आहे. त्यामुळे पहिलं मुल झाल. 

केतू नंतर एकही  अंतर्दशा पंचमाची कारक नाही. त्यामुळे द्वितीय संततीस त्रास. आता शनीच्या महादशेत व केतुच्याच अंतर्दशेत त्यांना दुसरे अपत्य होईल. हि केतूची अंतर्दशा अजून दोन वर्षांनी येणार. त्यात शुक्रच  कार्यरत, तो चतुर्थाचा मजबूत कार्येश त्यामुळे याहीवेळेस सहजा सहजी मुल होणार नाही हे नक्की. वैद्यकीय उपचार करावेच लागतील पण शुक्र पंचमेशही आहे त्यामुळे दुसर अपत्य  होणारच.

वरील जंत्रीच अवलोकन करून मी त्यांना सांगितलं कि अजून दोन वर्ष संतती योग नाही. त्या म्हंटल्या अजून दोन वर्ष ? आधीच उशीर झालाय.

मी म्हंटल "ना इलाज को क्या इलाज. जर कोणी डॉक्टर ग्यारंटी घेत असेल तर उपचार चालू ठेवा."  

त्या म्हंटल्या "कुठलाच डॉक्टर अशी ग्यारंटी घेत नाही. लाखो रुपये पाण्यात जाण्या पेक्षा एकदा नशिबात काय आहे ते बघून घ्याव म्हणून मी आले होते"

मी म्हंटल "जेंव्हा योग असतील त्याच वेळेस उपचार केले तर यश नक्की येईल, पैसाहि वाया जानार नाही, शारीरिक ,मानसिक  त्रासातूनही सुटका "  

त्या म्हंटल्या " तुम्ही म्हणता तेच योग्य अस  अनुभवांती पटतय. दोन वर्ष थांबणेच योग्य राहील"


शुभ भवन्तु !

आपला
नानासाहेब
------------------------------------------------------------------------------------------------------
लेख आवडला तर लेखाच्या खाली असलेल्या Face book, Google+  चिन्हावर क्लिक करून शेअर करा. 
Keywords to search this blog  jotish, atrology, horoscope, bhavishya, kp,  rashi, krishnamurti paddhati

Friday 23 March 2012

नवसंवत्सरारंभ - अमृत मुहूर्त गुढी पाडवा

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
हे वर्ष तुम्हाला सुखाचे आनंदाचे आणि समृद्धिचे जावो !

वर्षाच्या शुभारंभी येणारा हा सण अमृत मुहूर्त म्हणून समजला जातो. ब्रम्ह देवाने ज्य़ा दिवशी सृष्टि निर्माण करण्याचे ठरविले, त्याने याच दिवशी निवड केलि होती असा उल्लेख ब्रम्ह पुराणात  आहे. 

याच दिवशी शालिवाहन राजाने हिन्दुस्थानावर आक्रमण करून लुट करना-या हुन टोळ्यांचा  नायनाट केला. 

रावणाचा नाश करून प्रभु रामचंद्र राज्यभिषेकासाठी याच दिवशी आगमन केले.  विजयाचे प्रतिक म्हणून व रामराज्य आल्याची खुण म्हणून जो सोहळा अयोध्येत साजरा झाला तो हाच दिवस होता. 

असा त्रिवेणी संगम या दिवशी साधला जात असल्याने याला अमृत मुहूर्त असेही म्हणतात.

त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ समजला जातो.




  गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

Friday 16 March 2012

विहिरीला पाणी लागेल का ?

ऑफिसला जाण्याची  तयारी करत होतो.  इतक्यात माझे  मित्र  निंबाळकर आले.

म्हंटल "या निंबाळकर  एव्हढ्या सकाळी सकाळी कस काय येण केल, काही विशेष ? "

ते म्हणाले "विशेष काही नाही द्राक्ष घेऊन आलो. वानोळा.". 

चहा पाणी झाल्यानंतर आम्ही दोघेही निघालो. त्यांना सलूनमध्ये दाढी करायची होती व मला ऑफिसला जायचं होत. रस्त्याने चालता चालता ते बोलले "विहीरीच काम चालू आहे मळ्यात. विहिरीला पाणी लागल."

मी म्हंटल " अरे वा !  गुड  न्यूज,  अभिनंदन "

"विहिरीला पाणी लागेल का ? असा प्रश्न मी विचारला होता. आठवत का ?". निंबाळकर बोलले.

मला आठवेना. मी त्यांना विचारलं "मी काय उत्तर दिल होत.?"

"पाणी लागेल. काळजी करू नका."

ऑफिसला आल्या आल्या मी निंबाळकर यांची प्रश्नकुंडली उघडली व मी काय लिहील होत ते पाहिलं तसा मला त्या वेळचा प्रसंग आठवला.   

"विहिरीला पाणी लागेल का ? " हा प्रश्न श्री विजय निंबाळकर यांनी २४ जानेवारी २०१२ ला सकाळी ११:३० वा. विचारला होता.

ते म्हणाले हा प्रश्न माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजकाल विहीर खोदण म्हणजे खूप खर्चिक काम झालय.

"जुनीच विहीर खाली खोदायची कि नवीन विहीर काढायची " मी विचारल

"नवीन "

हे ऐकल्यावर मी टोकन ची पिशवी त्यांच्या पुढे ठेवली.  त्यांनी त्यातील १३७ नम्बरच टोकन काढल.

हा प्रश्न २४ जानेवारी २०१२ ला सकाळी ११:३० मी. विचारला होता.

मी के पी सिड घेतला वा प्रश्न कुंडली तयार केली. चंद्र चतुर्थात पाहिल्यानंतर प्रश्न अगदी मनापासून विचारला हे कळल.

ती प्रश्न कुंडली मी बाजूला दिली आहे. त्यावर टीचकी  मारून ती मोठी करून पाहता येईल.

लाभाचा उप नक्षत्र स्वामी गुरु असून तो षष्टात, तृतीयेश तसेच गुरु केतूच्या नक्षत्रात. केतू अष्टमात. केतूवर कोणाचीही दृष्टी नाही, केतू चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र चतुर्थात व दशमेश, केतू शुक्राच्या राशीत, शुक्र चतुर्थात, लग्नेश.

चंद्र हा ग्रह जलतत्वाचा कारक आहे. शिवाय तो चतुर्थात आहे. चतुर्थ भावाचा  जमीन, जागा इत्यादी संदर्भात प्रश्न  पाहताना विचार केला जातो. याचा अर्थ लाभाचा उप नक्षत्र स्वामी गुरु चतुर्थाचा कारक आहे. 

चतुर्थाचा उप नक्षत्र बुध ३  ९  १२ आहे, बुध रवीच्या नक्षत्रात, रवी ३  ११ आहे. म्हणजेच चतुर्थाचा उप नक्षत्र बुध लाभाचा कारक आहे.

मी हे  सगळ विश्लेषण करून त्यांना सांगितलं कि अपेक्षित पाणी लागेल व चांगल जोरदार लागेल.  काम चालू करा.

त्यानंतर आज जेंव्हा निंबाळकर भेटले तेंव्हा त्यांनी खुलासा केला. त्यांनी सांगितलं कि "तुम्ही सांगितलेल्या भविष्याचा आम्हाला एक चांगला अनुभव आला. अगदी २० फुटालाच १० फुट पाणी लागल. काळजी मिटली."  

शुभम भवतु 

आपला 
नानासाहेब 

Saturday 10 March 2012

छाया ग्रहाचा खेळ जमवी लग्नाचा मेळ !

समोर बसलेला जातक जेंव्हा त्याच्या लग्नाची चिंता व्यक्त करत होता तेंव्हा मला आश्चर्यच वाटलं. अर्थात मला जे वाटलं तेच त्याच्याकडे पाहिल्यानंतर कुणालाही वाटलच असत. रुबाबदार देखणा तरुण, सरकारी भरपूर पगाराची नोकरी, लग्नाच्या आधीच स्वतःच्या मालकीचा मोठा बंगला, ४० लाखाची अद्ययावत कार, स्थावर जंगम वगैरे वगैरे आणि अस असूनही लग्न जमत नाही. मग आश्चर्य वाटणार नाहीतर काय ?

हा जातक  ऑक्टोबर २०११ मध्ये आला होता.  त्याची पत्रिका मी बाजूला दिलेली आहे. ती वाचकांना टिचकी मारून बघता येईल. गोपनियतेमुळे त्याच  नाव वगैरे  माहिती मी काढून टाकली आहे.    

जातकास  सध्या  शुक्राची  महादशा  सुरु असून  ती २०२२ पर्यंत आहे. तसेच  राहूची  अंतर्दशा  सुरु आहे. ती २००९ ते ०६.०३.२०१२ अशी आहे. त्यानंतर गुरूची अंतर्दशा ती नोव्हेंबर २०१४ पर्यंत 

शुक्र व्ययात  तृतीयेश  तसेच  दशमेश, शुक्र केतूच्या नक्षत्रात. केतू  चतुर्थात, केतूवर कुठल्याही ग्रहाची दृष्टी नाही, तो कुणाच्याही युतीत नाही. केतू शुक्राच्याच नक्षत्रात. केतू गुरूच्या राशीत, गुरु कुटुंब स्थानी, पंचमेश तसेच अष्टमेश, गुरु राहूच्या नक्षत्रात. राहू दशमात, राहू  गुरु व शनीच्या दृष्टीत, शनी लग्नेश, षष्टेष आणि सप्तमेश, शनी मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ कुटुंब  स्थानी, चतुर्थेश व लग्नेश, राहू बुधाच्या राशीत, बुध लग्नात, द्वितीयेश व लाभेश, बुध चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र सप्तमाचा मजबूत कार्येश तसेच व्ययेश.

वरील जंत्रीच अवलोकन करून मी त्याला सांगितले  कि " तुझे  यंदा  कर्तव्य  पूर्ण  होईल. काळजी  करू  नको "   तो म्हंटला "कधी होईल ते सांगा. जर योग नसेल तर उगाचच मुली बघत फिरण्यात काय अर्थ आहे. कारण प्रत्येक वेळेस असच होत. एकतर मला मुलगी पटत नाही किंवा मुलीवाले मला नापसंत करतात. " 

मी रुलिंग प्लानेट बघितले. रुलिंग मध्ये शुक्र लग्नाचा स्वामी व चंद्र नक्षत्र स्वामी गुरु. म्हणून रवी जेंव्हा शुक्राच्या नक्षत्रातून व गुरूच्या उप नक्षत्रातून भ्रमण करीन त्या दरम्यान लग्न होईल. मेषेत शुक्राचे नक्षत्र  २७ एप्रिल  ते ५ मे दरम्यान आहे. म्हणून मी त्याला सांगितले कि तुझे लग्न २७ एप्रिल ते ५ मे च्या आत होईल. 

त्यानंतर  काल  मला त्याचा फोन  आला. लग्न जमलय  व  24 एप्रिल २०१२ या  तारखेला   लग्न आहे. मी त्याच अभिनंदन केल व सहज त्याची पत्रिका उघडून पहिली. विचार केला, दोन  दिवस आधी लग्न होतंय. अस का बर ? 2७ ते ५ मे दरम्यान लग्न न होता २४ ला का होईल ? पत्रिकेत त्यावेळच रुलिंग होतच.  ते पाहिलं अन घोळ लक्षात आला.  रुलिंग मध्ये केतुही आहे. व केतूचे अश्विनी नक्षत्र १४ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान आहे.  रुलिंग मध्ये चंद्र राशी स्वामी शनी आहे. शनी या उप नक्षत्राची व्याप्ती ९:२० ते ११:२६ अंश आहे.  म्हणजेच 'रवी ज्या वेळी  केतूच्या नक्षत्रातून शनीच्या उप नक्षत्रात प्रवेश करीन त्या कालावधी मध्ये लग्न होईल. हा कालावधी २3 ते २5 एप्रिल असा आहे. आणखी पुढे जाऊन अस म्हणता येईल कि रवी जेंव्हा केतूच्या नक्षत्रातून शनीच्या उप नक्षत्रातून व शुक्राच्या उप उप नक्षत्रातून (शुक्राच्या  उप उप नक्षत्राची व्याप्ती १०:२६ अंश इतकी आहे)  भ्रमण करील त्या दिवशी म्हणजेच २४ एप्रिल २०१२ या तारखेला या तरुणाच लग्न होईल.    

एकूण काय तर पुन्हा एकदा ज्योतिष मार्तंड श्री कृष्णमुर्तिनी सांगितल्या प्रमाणे त्यांच्या 'छाया ग्रह हे इतर ग्रहांपेक्षा नेहमीच व जास्त बलवान असतात'  या नियमाच  प्रत्येंतर आल. 


शुभं भवन्तु !

आपला
नानासाहेब 

Wednesday 7 March 2012

दिलेल्या तारखेच्या आतच लग्न ठरलं

नमस्कार !

सध्या जिकडे तिकडे मंगल कार्य चालू आहेत. लग्नाची धावपळ जोरात सुरु आहे. ज्याचं लग्न नुकतच झालं ते खुश, ज्याचं ठरलं ते खुश पण या गर्दीत काही लोक मात्र आनंद हरवून बसतात. त्याचं लग्न जमत नाही. कुठे मुलाच जमत नाही, कुठे मुलीच जमत नाही. त्यामुळे पालक, त्यांचे नातेवाईक, स्नेही, मित्र मंडळी या सर्वाना ती चिंता  लागून  राहते. मग अश्यावेळेस,  इतर  वेळी  ज्योतिष  शास्त्राला  नाव ठेवणारे, नाक मुरडणारे लोक सुद्धा  ज्योतिर्विदांकडे जातात असो. ज्योतिष शास्त्राला नाव ठेवणारे  आणि त्याला मानणारे हा वाद पुरातन आहे.

तर असाच एक जातक नोव्हेंबर  महिन्यात त्याच्या भाचीची पत्रिका घेऊन आला होता. त्या मुली साठी वर संशोधन गेल्या २ ते ३ वर्षांपासून सुरु होत वगैरे माहिती जातकाने दिली. पत्रिका के. पी. पद्धतीची नसल्यामुळे मी नव्याने ती तयार केली. हि पत्रिका मी त्या मुलीच नाव न टाकता बाजूला दिलेली आहे.  वाचक ती बघू शकता.

या पत्रिकेला राहू महादशा १९९३ पासून सुरु होती व ती डिसेंबर २०११ पर्यंत कार्यरत. राहू बुध, रवी, शनीच्या दृष्टीत. बुध, रवी षष्ठाचा मजबूत कार्येश तसेच शनी दशमात,व्ययेश व लग्नेश . बुध शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र चतुर्थाचा कार्येश व नवमेश, रवी व शनी केतूच्या नक्षत्रात, केतू सप्तमात, केतूचा नक्षत्रस्वामी शुक्र व तो रवीच्या राशीत. तसा रवी सप्तमाचाही क्षीण कार्येश आहे. हा क्षीण कार्येश सोडला तर वरील जंत्रीतील ग्रह कुठल्याही पद्धतीने लग्नाचे कार्येश नाहीत. तसेच हि महादशा संपत आली तरी लग्न ठरल नाही. त्यामुळे तो क्षीण कार्येश काही कामाचा नाही हे लक्षात येत.

जानेवारी पासून गुरूची महादशा सुरु होणार होती. गुरु तृतीयात, लाभेश तसेच द्वितीयेश आहे गुरु चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र सप्तमात व षष्ठाचा कार्येश आहे, चंद्र जरी षष्ठाचा कार्येश असला तरी त्यापेक्षा तो सप्तमाचा बलवान कार्येश आहे त्यामुळे या महादशेत विवाह होणार यात शंकाच नाही. पहिली अंतर्दशा गुरूचीच. 

एकंदरीत काय तर अश्या प्रकारे कुंडलीचे सूक्ष्म निरीक्षण करून मी त्या जातकाला त्याच्या भाचीचे लग्न ४ मार्च २०१२ पर्यंत जमेल अस सांगितलं. त्यानंतर डिसेंबर गेला, जानेवारी, फेब्रुवारी हेही गेलेत. त्यानंतर          २ मार्चला हा जातक पुन्हा सकाळी कार्यालयात आला व म्हणाला "भाचीच लग्न ठरलं. १ तारखेला सगळी बोलणी झाली. तारीख फक्त जूनची घेतली. तुम्ही सांगितल्या प्रमाणे ४ मार्चच्या आतच लग्न ठरलं. आम्हाला सगळ्यांना हे खूपच विशेष वाटलं. तुम्ही ग्रेट आहात." 

मी फक्त हसलो आणि म्हणालो (मनातल्या मनात हं ) " आम्ही कसले ग्रेट ? जे संशोधन गुरुवर्य ज्योतिष मार्तंड श्री कृष्णमुर्तिनी ४० वर्ष केल, त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी रक्त आटवल, ते खरे ग्रेट. आम्ही त्या दिंडीतले एक वारकरी हेच काय आमच कर्तुत्व. आम्ही फक्त त्यांचे नियम पाळतो. खरी प्रचीती त्यांच्या नियमांची येते"
त्यांच्या नियमांना च्यालेंज करून उगाचच स्वतःची टिमकी मिरवण्यात काय अर्थ आहे, नाही का ?

आपला 
नानासाहेब