Wednesday 6 February 2013

झट मंगनी पट ब्याह......

।। श्री ।।


नमस्कार मित्रानो !

काही कुंडल्यांमध्ये झट मंगनी पट ब्याह टाईपचे योग असतात.अगदी महिन्या दोन महिन्यात लग्न. एका जातकाच्या मेव्हणीची हि कुंडली. हा जातक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आला होता.

सप्तमाचा उप नक्षत्र स्वामी गुरु आहे. गुरु  अष्ठमात , द्वितीयेश व पंचमेश , गुरु शनीच्या नक्षत्रात, शनि कुटुंब स्थानी ,तृतीयेश व  चतृर्थेश.

सप्तमाचा  उ.न.स्वामी गुरु सहा, बारा या विवाह विरोधी भावांचा कार्येश नाही तसेच सध्या महादशा  गुरूचीच चालू आहे. हि दशा २०२४ पर्यंत आहे. नंतर पुढील  येणारी महादशा शनिची आहे. शनि महादशा २०४३ पर्यंत कार्येश आहे. शनि द्वितीयात, तृतीयेश व चतुर्थेश तसेच शनि चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र लाभात, नवमेश

त्यामुळे वैवाहिक, कौटुंबिक सौख्य उत्तम राहणार यात काही शंकाच नाही.    

गुरु महादशेत बुधाची अंतर्दशा सुरु आहे. बुध पंचमात, अष्टमेष, लाभेश आहे. तसेच बुध शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र अष्टमात, व्ययेश,  व सप्तमेश आहे.

बुध अंतर्दशा २०१५ पर्यंत कार्येश आहे. मग लग्न नक्की कधी होणार ? मग मी विदशा  निवडली, सध्या बुध अंतर्दशेत बुधाचीच विदशा  सुरु आहे.  रुलिंग मध्ये  बुध दोनदा आलेला नाही. त्यामुळे बुधाच्या पूढची केतूची विदशा निवडली 

केतू अष्टमात, गुरूच्या नक्षत्रात, गुरु वरील प्रमाणे कुटुंब स्थानाचा  कार्येश. 

केतूची विदशा १५  मार्च  २०१३ ते ३ मे २०१३ पर्यंत आहे. मी त्या जातकाला सांगितलं कि या मुलीचा विवाह १५ मार्च ते ३ मे २०१३ या दरम्यान होईल.

त्यानंतर तो जातक काही दिवसांनी त्याच्या बहिणीची कुंडली घेऊन आला त्यावेळी त्याने सांगितलं कि माझ्या मेव्हणीच लग्न जमलं व  ३ मे २०१३ हि  लग्नाची तारीख ठरली. 

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब