Monday 27 July 2015

शेअर बाजार - दारुण अपयश Astrology & Success In Stock Market

नमस्कार मित्रहो


बऱ्याचदा विचारणा केली जाते की शेअर्स मधे गुंतवणुक केली तर चालेल का ? शेअर्स मार्केट मधे ट्रेडिंग करू   का ? शेअर बाजारा मधे ट्रेडिंग, लॉटरी, सट्टा, जुगार इत्यादिचे आकर्षण पंचम भावामुळे निर्माण होते. पंचम भाव लाभात असेल तर चांगभल नाहीतर आयुष्याच वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. पूर्वी लॉटरी, सट्टा, जुगारात बरबाद झालेत. आता शेअर्स मधे होत आहेत. असो.

ही अशाच एका जातकाची कुंडली आहे. जातकाचे नाव नेहमी प्रमाणे गुप्त ठेवन्यासाठी कुंडलीतुन त्याच नाव तसेच जन्मा संबंधिचा तपशील काढून टाकला आहे. तपशील न दयायला आणखी एक कारण आहे. बऱ्याच ज्योतिष विषयक हिंदी, इंग्रजी मासिकांमधे ब्लॉग वरचे लेख कॉपी करून वापरले जातात. या लेखांचा उपयोग ज्योतिष विषयक नियतकालीकांमधे करायला हरकत नाही परंतु परवानगी तर घेत जा.

प्रश्न होता मी शेअर्स मधे ट्रेडिंग करू का ? मला त्यात यश मिळेल का ?

कुंडलीला 2008 पासून राहुची दशा सुरु आहे. ही दशा 2026 पर्यंत आहे.

महादशा स्वामी राहु पंचमात असून तो चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात आहे. चन्द्र नवमात व अष्टमेश. अष्टमात एकही ग्रह नाही.

दशास्वामी राहु पंचमात असल्यामुळे शेअर्स मार्केटच आकर्षण निर्माण झाल. इथ पर्यंत ठीक आहे. परंतू दशा स्वामी राहु नवमातील व अष्टमेष चंद्राच्या नक्षत्रात असल्यामुळे अष्टम भावाचा बलवान कार्येश झाला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होणारच.

या जातकाच्या बाबतीतही तेच घडल. लाखो रूपयाचे नुकसान झाल्यावर जाग आली.

प्रश्न मोठ्या आशेने विचारला होता. पण दशास्वामी कुठल्याही प्रतिने यशाचा कार्येश होत नाही त्यामुळे मी त्याला स्पष्टच सांगीतल "अजुन काही दिवस जर या शेअर्स ट्रेडिंग मधे घलाविले तर घर दार विकून देशोधडीला लागाव लागेल."

उत्तर एकून तो नाराज झाला असता पण तो म्हंटला "हे आधीच विचारल असत तर बर झाल असत. माझ एव्हढ नुकसान झाल नसत."

"देशोधडीला लागण्यापेक्षा झाल ते गंगेला मिळाल अस समजा. अन पुन्हा या गोष्टींच्या नादी लागू नका." अस म्हणून मी त्यांना निरोप दिला.



शुभं भवतु ।

आपला
नानासाहेब