Wednesday 7 September 2011

घटस्फोट मिळाला.... आनंद झाला !

जूलै महिन्याच्या चार तारखेला साधारणता सकाळी तो माझ्याकडे आला. पत्रिका घेऊनच आला होता. म्हणजेच त्याच्या कामाच स्वरूप स्पष्ट होत. तसा त्याच्या प्रश्नाचाही अंदाज मला आला होता. मी त्याला बसता केला.  


म्हंटल 'काय रे ? काही विशेष ?' . म्हणाला "विशेष काही नाही.आपल्या कोर्ट केसेस कधी निकालात निघतील ? ते बघण्यासाठी आलो." 


 तसा तो वैतागलेलाच होता. लग्न झाल्यानंतर त्याची बायको काही महिने नीट वागली. काही महिन्यानंतर त्याचं एकमेकांशी पटेनास झाल. एकदा भांडण विकोपाला गेल. बायको माहेरी निघून गेली तसी परत आलीच नाही. नंतर अनेक प्रयत्न करूनही ते दोघे पुन्हा एकत्र आले नाहीत. 


मग कालांतराने तिने त्याच्यावर पोटगी मिळण्यासाठी दावा दाखल केला. त्याच्यानंतर आणखी हुंडा बळीचा दावा दाखल केला. यात तो तसच त्याच्या घरचे लोकही अडकलेत. एकूण काय तर या सर्व प्रकारात त्या सगळ्यांना खूपच त्रास भोगावा लागला. असो.


 तो म्हंटला या सगळ्यातून कधी सुटका होईल ते बघ.  वाचकांनी हि कुंडली पहावी. कुंडलीवर टिचकी मारून ती पाहता येईल. गुप्ततेमुळे मी त्याच नाव मात्र  पत्रिकेतून काढून टाकल आहे. अर्थात त्याच्याच परवानगीने मी त्याची पत्रिका ब्लॉग वर टाकत आहे. जातकाची परवानगी असले तर आणि तरच मी पत्रिका ब्लॉगवर टाकतो.


जातकाला १०.११.२०१४ पर्यंत रवीची महादशा असून  गुरूची अंतर्दशा १६.०९.२०११ पर्यंत आहे.


महादशास्वामी रवी नवमात व सप्तमेश असून राहूच्या नक्षत्रात आहे. राहू स्वतः सप्तमात व गुरूच्या युतीत. गुरु सप्तमात तसेच लाभेश व द्वितीयेश. गुरु केतूच्या नक्षत्रात. केतू  गुरु, शनी, मंगळाच्या दृष्टीत. शनी सुद्धा सप्तमात.


मंगळ षष्टात अगदी दबंग होऊन बसलेला. तसेच तो दशमातही बलवान झालाय. शिवाय मंगळ बुधाच्या नक्षत्रात. मंगळ बुधाच्या माध्यमातून अष्ठमातही मजबूत लागलेला. 


अंतर्दशास्वामी गुरु वरीलप्रमाणेच कार्येश झाला. थोडक्यात हि जंत्री खालीलप्रमाणे कार्येश झाली आहे.
 गुरु ७  ११  २  शनी ७  १२  १  ९  मंगळ ६  १०  ५  ८  


वरीलप्रमाणे ग्रहांच कार्येश्वत्व बगता. कुठल्याही परिस्थितीत पुनर्मिलन होऊ शकत नाही. पण हिच  महादशा व अंतर्दशा दोन्ही, घटस्फोट मिळण्यासाठी पोषक आहेत. 


पत्रिकेच अवलोकन संपवून मी त्याला सांगितलं कि तुझा सगळा प्रॉब्लेम १६.९.२०११ पर्यंत मिटेल. सर्व कोर्ट केसेस मधून तू मोकळा होशील. अस ऐकल्यावर त्याचा लगेचच विश्वास बसला नाही. कारण तोपर्यंत हा सगळा प्रकार मिटण्याच कुठलही चिन्ह दिसत नव्हत. .....


......आणि कालच या सर्व प्रकारातून तो मुक्त झाला. म्हणजेच १६.९.२०११ च्या आत.




आपला 
नानासाहेब पाटील