Sunday 13 December 2020

स्वभाव वर्तणूक (Behavior)

 

नमस्कार मित्रहो

आजचे कुंडली विश्लेषण हे नेहमी प्रमाणे नाही, म्हणजे नोकरी, व्यवसाय, विवाह वगैरे सारखं नसून ते स्वभाव वर्तणूक या विषयी आहे. बाजूला दिलेल्या कुंडलीवर टिचकी मारून बघता येईल.


जन्म कुंडलीतील राशी व नक्षत्र याचा परिणाम स्वभावावर जास्त असतो कि लग्नाचा हे या कुंडलीवरून अधिक  स्पष्ट होईल. बऱ्याच म्हणण्यापेक्षा जवळ जवळ सर्वच टीव्ही च्यानेलच्या माध्यमातून जन्म राशीवरून जे दैनिक भविष्य कथन केले त्यामध्ये बहुदा जातकांचा गोंधळच होतो. 

हि कुंडली कन्या राशीची असून जन्म नक्षत्र चित्रा आहे. कन्या राशीची स्वभाव वैशिष्टे काय आहेत ? या व्यक्ती प्रमाणापेक्षा जात बडबड करणाऱ्या असतात. गप्पिष्ट असतात. झटपट कामे उरकण्याकडे कल असतो. अजून बरीच वैशिष्टे आहेत पण आपल्या या कुंडलीसाठी एव्हढी पुरेशी आहेत.

चित्रा नक्षत्राची प्रमुख वैशिष्टे (पदचरण २) – संभाषण चतुर, हसतमुख, स्पष्टवक्ता, धडपड्या स्वभाव, कला कौशल्याची आवड इ.

थोडक्यात या जातकाचा स्वभाव वरील प्रमाणे असायला पाहिजे. पण प्रत्येक्षात परिस्थिती याउलट आहे. हा मुलगा अगदी कमी बोलतो. अभ्यासात हुशार, पण फालतू बडबड करत नाही. हसतमुख नाही, शांत व धीरगंभीर स्वभाव.  

हि कुंभ लग्नाची कुंडली आहे. लग्नात एकही ग्रह नाही. लग्नावर शनीची दृष्टी.

कुंभ राशीचे स्वभाव वैशिष्टे – शांत व धीमिवृत्ती, गंभीरता, आळशी, एकलकोंडेपणा, वैराग्यावृत्ती, चिंतामग्नता असे गुण या राशीमध्ये  प्रामुख्याने अनुभवायला मिळतात. इतरही अनेक गुण वैशिष्टे आहेत. जसे अभ्यासूवृत्ती, उदारमतवादी, व्यवहार चतुर, तत्वज्ञानी, नम्र सहनशील इत्यादी.

प्रथम भावाचा उपनक्षत्र स्वामी केतू असून तो शनीच्या दृष्टीत आहे. केतू म्हणजे संन्यस्थ, विरक्त. अश्या या छायाग्रहावर शनीची दृष्टी आहे. शनी स्वतः मंदग्रह आहे. त्यामुळे मुलाचा स्वभाव उथळ बडबड्या नसून शांत व धीरगंभीर आहे.

सध्यास्थितीत मात्र या तरुण मुलावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. कारण हा मुलगा कमी बोलतो. म्हणजे अगदीच कमी. कधी कधी दिवस दिवस तो कोणाशी बोलत नाही. जेवण खूप हळू हळू करतो, त्याला जेवायला दोन दोन तास लागतात. प्रत्येक गोष्ट तो अशीच करतो. अक्षरशः चालणं सुद्धा हळूवार, संथपणे... मग अस का... म्हणून डॉक्टरला दाखवणं आल.. उपचार सुरु झालेत (हे गरजेच होते). डॉक्टर त्याची कारणमीमांसा करतील.  उपचार एका बाजूला होत राहतील.

हा असा विचित्र का वागायला लागला, त्याला काही बाहेरची बाधा झाली का म्हणून तेही पाहण व उपाय तोडगे सुरु केलेत. असो.  

सध्या जातकाला राहूची दशा सुरु आहे. राहू वास्तुस्थानात म्हणजे चतुर्थ भावात. त्यामुळे राहण्याची जागा पिडीत, बाधित असते.

शनी चतुर्थात व्ययेश व लग्नेश आहे.  व्ययात व लग्नात एकही ग्रह नाही. त्यामुळे शनी व्ययाचा व लग्नाचा बलवान कार्येश झाला आहे.

राहूच्या दशेत असे विचित्र अनुभव येतात कि त्यावर विश्वास ठेवणे कठीण होवून बसते. वैद्यकीय उपचाराला सुद्धा यश मिळत नाही. काय उपचार करावा हे नीट ठरत नाही कारण निदानच होत नाही.

या जातकास राहूची दशा सुरु आहे. दशास्वामी शनीच्या युतीत, शनी व्ययेश व लग्नेश, त्यामुळे एकांतवास, कमी बोलणे, संथपणा, अंगात आळस भरने, जीवनातील उत्साह कमी होणे, नैराश्याने भरून जाणे  अश्या गोष्टी या दशकालावधीत जातकास अनुभवास येतीलच यात काही शंका नाही. पण हाच शनी मंगळाच्या नक्षत्रात असून मंगळ पंचमात आहे. त्यामुळे आरोग्य बिघडून जातक आयुष्यातून उठणार नाही हेही तितकाच खरं. पण आणखी चार वर्ष हे भोग मात्र भोगावेच लागतील. कारण राहूची महाभयंकर दशा २०२५ पर्यंत कार्येश आहे. त्यानंतर गुरूची दशा सुरु होणार आहे.

गुरु पंचमात, लाभेश व धनेश असून तो शुक्राच्या उपनक्षत्रात, शुक्र पंचमात, चतुर्थेश व नवमेश. मग या दशेत काय होईल... शिक्षणात उत्तम यश मिळेल... सर्व प्रकारची इडा पिडा जावून चिरंजीव जोमात व घरचे कोमात... अशी परीस्थिती निर्माण होईल. 

शुभं भवतु  !

आपला
नानासाहेब 

 

  

 

Friday 14 August 2020

विशेष काळजी

नमस्कार मित्रांनो 

ज्या लोकांच्या कुंडलीत दशास्वामी व अंतर्दशास्वामी सहा आठ बाराचा मजबूत कार्येश झाला असेल त्यांना सध्याच्या परिस्थितीत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 

अर्थातच ज्यांच्या कुंडलीत पंचम भाव मजबूत लागलाय त्यांनाही आरोग्याबद्दल नाही पण जॉब जाण्याच भय आहेच. काळजी घ्या.  

अर्थातच सुरक्षतेचे सर्व नियम सर्वांनी पाळा.  

धन्यवाद 

शुभं भवतु |