नमस्कार मित्रांनो
या कुंडलीचे
वैशिष्ठे म्हणजे या कुंडलीचा
उप उप नक्षत्र
स्वामी व त्याचे
जातकाला मिळणारे अचूक फल
हे होय. गुरुजींनी
स्वनक्षत्री ग्रहांविषयी जो नियम
सांगितलाय त्याचे हे उदाहरण.
या जातकाची कुंडली बाजूला दिलेली आहि. त्यावर टिचकी मारून मोठी करून पाहता येईल. कुंडलीचा दशास्वामी शनि लग्नात, सप्तमेश व अष्टमेश असून तो स्वतःच्याच नक्षत्रात व स्वतःच्याच उपनक्षत्रात आहे. त्यामुळे या दशाकालात जातकाला आर्थिक नुकसान होणे अपेक्षित आहे, नोकरीत हॅरॅसमेंट वगैरे.. पण असे होणार नाही कारण जर दशास्वामी स्वनक्षत्री व स्वतःच्या उपनक्षत्रात असेल तर अशा वेळी उप उप नक्षत्र स्वामी कार्येश होतो. या केस मध्ये दशास्वामी शनी शुक्राच्या उपनक्षत्रात आहे व शुक्र षष्ठात व लाभेश आहे. त्यामुळे शनी या ग्रहाच्या दशाकावधीत जातकाला नोकरीच्या माध्यमातून उत्तम धनार्जन होईल. वशिल्याने बढती वगैरे मिळेल, एकंदरीत ऐषआरामाचे जीवन असेल. व अगदी या प्रमाणेच जातकाचे जीवन चाललेले आहे. जातक एका एमएनसी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. तसेच पुढील येणाऱ्या बुधाच्या दशेत जातक औषधे विक्री संबंधी व्यवसाय तसेच कमिशनच्या माध्यमातून धनार्जन करणार असे मी त्या जातकास सांगितल्यावर त्यांनी मला जे सांगितले ते असे ... त्यांच्या पत्नीचा नुट्रीशन प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय आहे व पुढे जाऊन त्यांना त्या व्यवसायात मदत करायची आहे.
शुभं भवतू !
आपला
नानासाहेब