Sunday 22 January 2012

आजाराने लावला जीवाला घोर ....

नमस्कार !

परवा सायंकाळी पाटील मावशी कार्यालयात आल्या. जरा टेन्स मधेच दिसत होत्या. त्यांना मी बसायला सांगितलं. त्यावेळी समोर जातक बसलेले होते. त्यांना निदान पंधरा  मिनिट तरी लागणार होती.  चाललेल्या   कन्सलटन्सी  तून  मोकळा होताच मी मावशीला त्यांचा प्रॉब्लेम विचारला. 

त्या म्हंटल्या "काकांच्या तोंडाची सारखी आग होते. तोंड आल म्हणाव  तर तसही  काही दिसत नाही. जीभ लाल झालेली नाही, तोंड आल्याच एकही लक्षण दिसत नाही, गालांचीच आग होते, पण तिथेही काही जखम वगैरे नाही, स्कीन स्पेशालीस्टलाही  दाखवलं, पण गुण आला नाही."

मी आणखी काही न विचारता टोकन ची पिशवी     त्यांच्या पुढे केली. त्यांनी १०५ नंबर काढला. पत्नीने पती बद्दल  प्रश्न विचारला म्हणून पत्रिका फिरवून घेतली. ती प्रश्न कुंडली बाजूला दिलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. 

या पत्रिकेत चंद्र अष्टमात असून तो कन्या राशीत आहे. तसेच चंद्राची कर्क राशी षष्टात आहे. म्हणजेच प्रश्न आजारा बद्दलच आहे व प्रश्न मनात न धरताही अगदी मनापासून होता हे दिसून येत.

ब-याचदा लोक  प्रश्न विचारत असतात. पण ते  अगदी वरवर असतात. प्रश्नाची तीव्रता असल्याशिवाय खर तर प्रश्न विचारू नये. कारण हे दैवी मार्गदर्शन आहे. प्रश्नाला भावनेची जोड असल्याशिवाय तो तीव्र व गंभीर असू शकत नाही, अश्या वेळेस आलेले उत्तर चुकण्याची शक्यता असते. असो. 

षष्टाचा उप नक्षत्र स्वामी शनी अष्टमात, व्ययेश व लग्नेश आहे, शनी मंगळाच्या नक्षत्रात असून मंगळ षष्टात, दशमेश व तृतीयेश  आहे. 

उप नक्षत्र स्वामी शनी कन्या राशीत आहे म्हणजेच द्विस्वभावी राशीत आहे. याचा अर्थ आजाराच निदान नीट  झालेलं  नाही. पुन्हा एकदा तपासणी करावी लागेल. 

मंगळ षष्टात म्हंटल्यावर तीव्र वेदनादायी आजार. तसेच मंगळ मज्जा तंतू  यांचे विकाराचाही कारक आहे. म्हणजे आजार नक्की काय झाला असेल बर. ..?

एकच नाव डोक्यात येत होत .. अल्सर . मी मावशींना सांगितलं  " काळजी करू नका. पुन्हा एकदा तपासणी करावी लागेल. आता तपासणी करताना अल्सर आहे का ते बघा ?"

त्या म्हंटल्या " आणखी काही नाही ना ?" . 

मी म्हंटल "काही नाही. झालेला अल्सर लवकर बरा होईल" 

कारण पंचमाचा  उप नक्षत्र  स्वामी चंद्र असून तो अष्टमात तसेच चंद्राची कर्क राशी षष्टात आहे. चंद्र राहूच्या नक्षत्रात. राहू स्वतः भाग्यात. राहूवर मंगळाची दृष्टी. मंगळ रवीच्या नक्षत्रात. रवी लाभात व सप्तमेश आहे. राहूचा राशिस्वामीही  मंगळच आहे. लाभातील  रवी शंभर टक्के आजार नीट होणार अस सांगतोय.

मावशीला सर्व समजावून सांगितलं. दुस-या दिवशी ते लगेचच काकांना घेऊन डॉक्टरांकडे गेले. मावशींचा मुलगा सचिन व त्याचा मित्र गणेश बरोबर होते. संपूर्ण तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्यांना अल्सर असल्याचच सांगितलं व तो अल्सर शंभर टक्के बरा होणार अशी खात्रीही दिली. 

डॉक्टरांनी काय निदान केल वगैरे माहिती मला गणेशने दिली. ते ऐकून या शास्त्राचे जनक कै. ज्योतिष शिरोमणी  कृष्णमुर्ती यांना मी मनापासून नमस्कार केला. 

शुभं भवतु   

आपला 
नानासाहेब

Thursday 12 January 2012

आगीतून निघून फुफाट्यात....

नमस्कार   

बाजूला दिलेली पत्रिका एक मुलीची आहे. अर्थात गोपानियतेमुळे तीच नाव  टाकल नाही. 

एका मुलाने हि पत्रिका दिली. त्याने हि मुलगी पाहिली. त्याचा पुनर्विवाह असल्यामुळे आता तो लग्न करताना खूपच काळजी घेतोय. 

जी  मुलगी पाहिली तिचाही पुनर्विवाहच. 

सप्तमाचा उप नक्षत्रस्वामी बुध असून तो धनु या द्विस्वभावी राशीत आहे. म्हणजेच या पत्रिकेला पुनर्विवाहाचा योग आहे.  याचा अर्थ या मुलीच्या आयुष्यात दोन लग्न होतील. 

याचाच  अर्थ असाही होतो कि पहिल्या लग्नाची वाट लागल्याशिवाय दुसर लग्न होणार नाही. 

सध्या पत्रिकेला शनीची महादशा असून ती २०२२ पर्यंत आहे. शनी नवमात, प्रथमेश तसेच द्वितीयेश आहे. शनी राहूच्या नक्षत्रात. राहू षष्टात. राहू रवीच्या दृष्टीत, रवी १२  ८, रवी शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र १२  ५  १०,  राहूचा उप नक्षत्रस्वामी गुरु १०  १२  ३ . राहूचा राशीस्वामी   बुध १२  6  ९, बुध रवीच्या नक्षत्रात, रवी १२  ८ 

वरील जंत्री अभ्यासल्यानंतर कोण ह्या मुलीशी लग्न करण्याची  डेअरिंग करील ? 

याच महादशेत या मुलीच पाहिलं लग्न मोडल असणार. या महादशेत एकही ग्रह वैवाहिक सुखाचा कारक नाही. त्यामुळे हि मुलगी लग्न झाल्यानंतर हार्डली महिना, दोन महिना नव-याच्या घरी राहिली असेल. त्यानंतर लगेचच घटस्फोट. त्याला असा सांगितल्यावर त्याने लगेचच होकार भरला. म्हंटला ' आम्ही ह्या मुलीच लग्न कधी मोडल याची चौकशी केली. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हि मुलगी नांदलीच नाही.'

तीच जंत्री अजूनही कायम आहे. अश्या मुलीशी लग्न करून  आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारख होईल. 

त्याला तसं  सांगितलं. पुन्हा लग्नाची काशी करून घ्यायची नसेल तर हे स्थळ रीजेक्ट कर नाहीतर आहेच मग येरे माझ्या मागल्या... 


आपला 
नानासाहेब पाटील