Thursday, 4 January 2024

उपउप नक्षत्रस्वामीचे फल

नमस्कार मित्रांनो

 

या  कुंडलीचे वैशिष्ठे म्हणजे या कुंडलीचा उप उप नक्षत्र स्वामी त्याचे जातकाला मिळणारे अचूक फल हे होय. गुरुजींनी स्वनक्षत्री ग्रहांविषयी जो नियम सांगितलाय त्याचे हे उदाहरण.

या जातकाची कुंडली बाजूला दिलेली आहि. त्यावर टिचकी मारून मोठी करून पाहता येईल. कुंडलीचा दशास्वामी शनि लग्नात,  सप्तमेश अष्टमेश असून तो स्वतःच्याच नक्षत्रात स्वतःच्याच उपनक्षत्रात आहे. त्यामुळे या दशाकालात जातकाला आर्थिक नुकसान होणे अपेक्षित आहे, नोकरीत हॅरॅसमेंट वगैरे.. पण असे होणार नाही कारण जर दशास्वामी स्वनक्षत्री स्वतःच्या उपनक्षत्रात असेल तर अशा वेळी उप उप नक्षत्र स्वामी कार्येश  होतो. या केस मध्ये दशास्वामी शनी शुक्राच्या उपनक्षत्रात आहे शुक्र षष्ठात लाभेश आहे. त्यामुळे शनी या ग्रहाच्या दशाकावधीत जातकाला नोकरीच्या माध्यमातून उत्तम धनार्जन होईल. वशिल्याने बढती वगैरे मिळेल,  एकंदरीत ऐषआरामाचे जीवन असेल.   अगदी या प्रमाणेच जातकाचे जीवन चाललेले आहे. जातक  एका एमएनसी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. तसेच   पुढील येणाऱ्या बुधाच्या दशेत जातक औषधे विक्री संबंधी व्यवसाय तसेच  कमिशनच्या माध्यमातून धनार्जन करणार असे मी त्या जातकास सांगितल्यावर त्यांनी मला जे सांगितले ते असे ... त्यांच्या पत्नीचा नुट्रीशन प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय आहे   पुढे जाऊन त्यांना त्या व्यवसायात मदत करायची आहे.  


शुभं भवतू  !

आपला 

नानासाहेब 


Sunday, 13 December 2020

स्वभाव वर्तणूक (Behavior)

 

नमस्कार मित्रहो

आजचे कुंडली विश्लेषण हे नेहमी प्रमाणे नाही, म्हणजे नोकरी, व्यवसाय, विवाह वगैरे सारखं नसून ते स्वभाव वर्तणूक या विषयी आहे. बाजूला दिलेल्या कुंडलीवर टिचकी मारून बघता येईल.


जन्म कुंडलीतील राशी व नक्षत्र याचा परिणाम स्वभावावर जास्त असतो कि लग्नाचा हे या कुंडलीवरून अधिक  स्पष्ट होईल. बऱ्याच म्हणण्यापेक्षा जवळ जवळ सर्वच टीव्ही च्यानेलच्या माध्यमातून जन्म राशीवरून जे दैनिक भविष्य कथन केले त्यामध्ये बहुदा जातकांचा गोंधळच होतो. 

हि कुंडली कन्या राशीची असून जन्म नक्षत्र चित्रा आहे. कन्या राशीची स्वभाव वैशिष्टे काय आहेत ? या व्यक्ती प्रमाणापेक्षा जात बडबड करणाऱ्या असतात. गप्पिष्ट असतात. झटपट कामे उरकण्याकडे कल असतो. अजून बरीच वैशिष्टे आहेत पण आपल्या या कुंडलीसाठी एव्हढी पुरेशी आहेत.

चित्रा नक्षत्राची प्रमुख वैशिष्टे (पदचरण २) – संभाषण चतुर, हसतमुख, स्पष्टवक्ता, धडपड्या स्वभाव, कला कौशल्याची आवड इ.

थोडक्यात या जातकाचा स्वभाव वरील प्रमाणे असायला पाहिजे. पण प्रत्येक्षात परिस्थिती याउलट आहे. हा मुलगा अगदी कमी बोलतो. अभ्यासात हुशार, पण फालतू बडबड करत नाही. हसतमुख नाही, शांत व धीरगंभीर स्वभाव.  

हि कुंभ लग्नाची कुंडली आहे. लग्नात एकही ग्रह नाही. लग्नावर शनीची दृष्टी.

कुंभ राशीचे स्वभाव वैशिष्टे – शांत व धीमिवृत्ती, गंभीरता, आळशी, एकलकोंडेपणा, वैराग्यावृत्ती, चिंतामग्नता असे गुण या राशीमध्ये  प्रामुख्याने अनुभवायला मिळतात. इतरही अनेक गुण वैशिष्टे आहेत. जसे अभ्यासूवृत्ती, उदारमतवादी, व्यवहार चतुर, तत्वज्ञानी, नम्र सहनशील इत्यादी.

प्रथम भावाचा उपनक्षत्र स्वामी केतू असून तो शनीच्या दृष्टीत आहे. केतू म्हणजे संन्यस्थ, विरक्त. अश्या या छायाग्रहावर शनीची दृष्टी आहे. शनी स्वतः मंदग्रह आहे. त्यामुळे मुलाचा स्वभाव उथळ बडबड्या नसून शांत व धीरगंभीर आहे.

सध्यास्थितीत मात्र या तरुण मुलावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. कारण हा मुलगा कमी बोलतो. म्हणजे अगदीच कमी. कधी कधी दिवस दिवस तो कोणाशी बोलत नाही. जेवण खूप हळू हळू करतो, त्याला जेवायला दोन दोन तास लागतात. प्रत्येक गोष्ट तो अशीच करतो. अक्षरशः चालणं सुद्धा हळूवार, संथपणे... मग अस का... म्हणून डॉक्टरला दाखवणं आल.. उपचार सुरु झालेत (हे गरजेच होते). डॉक्टर त्याची कारणमीमांसा करतील.  उपचार एका बाजूला होत राहतील.

हा असा विचित्र का वागायला लागला, त्याला काही बाहेरची बाधा झाली का म्हणून तेही पाहण व उपाय तोडगे सुरु केलेत. असो.  

सध्या जातकाला राहूची दशा सुरु आहे. राहू वास्तुस्थानात म्हणजे चतुर्थ भावात. त्यामुळे राहण्याची जागा पिडीत, बाधित असते.

शनी चतुर्थात व्ययेश व लग्नेश आहे.  व्ययात व लग्नात एकही ग्रह नाही. त्यामुळे शनी व्ययाचा व लग्नाचा बलवान कार्येश झाला आहे.

राहूच्या दशेत असे विचित्र अनुभव येतात कि त्यावर विश्वास ठेवणे कठीण होवून बसते. वैद्यकीय उपचाराला सुद्धा यश मिळत नाही. काय उपचार करावा हे नीट ठरत नाही कारण निदानच होत नाही.

या जातकास राहूची दशा सुरु आहे. दशास्वामी शनीच्या युतीत, शनी व्ययेश व लग्नेश, त्यामुळे एकांतवास, कमी बोलणे, संथपणा, अंगात आळस भरने, जीवनातील उत्साह कमी होणे, नैराश्याने भरून जाणे  अश्या गोष्टी या दशकालावधीत जातकास अनुभवास येतीलच यात काही शंका नाही. पण हाच शनी मंगळाच्या नक्षत्रात असून मंगळ पंचमात आहे. त्यामुळे आरोग्य बिघडून जातक आयुष्यातून उठणार नाही हेही तितकाच खरं. पण आणखी चार वर्ष हे भोग मात्र भोगावेच लागतील. कारण राहूची महाभयंकर दशा २०२५ पर्यंत कार्येश आहे. त्यानंतर गुरूची दशा सुरु होणार आहे.

गुरु पंचमात, लाभेश व धनेश असून तो शुक्राच्या उपनक्षत्रात, शुक्र पंचमात, चतुर्थेश व नवमेश. मग या दशेत काय होईल... शिक्षणात उत्तम यश मिळेल... सर्व प्रकारची इडा पिडा जावून चिरंजीव जोमात व घरचे कोमात... अशी परीस्थिती निर्माण होईल. 

शुभं भवतु  !

आपला
नानासाहेब 

 

  

 

Friday, 14 August 2020

विशेष काळजी

नमस्कार मित्रांनो 

ज्या लोकांच्या कुंडलीत दशास्वामी व अंतर्दशास्वामी सहा आठ बाराचा मजबूत कार्येश झाला असेल त्यांना सध्याच्या परिस्थितीत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 

अर्थातच ज्यांच्या कुंडलीत पंचम भाव मजबूत लागलाय त्यांनाही आरोग्याबद्दल नाही पण जॉब जाण्याच भय आहेच. काळजी घ्या.  

अर्थातच सुरक्षतेचे सर्व नियम सर्वांनी पाळा.  

धन्यवाद 

शुभं भवतु |


 


Wednesday, 18 December 2019

शेवटी जॉब गेलाच Job lost as predicted


नमस्कार मित्रानो !

घटना घडायची ती घडल्या शिवाय राहत नाही हेच खर.. २०१५ मध्ये या जातकाला त्याचे कुंडली विश्लेषण पाठवले. त्यात त्याला स्पष्ट सांगितले होते कि नोव्हेंबर २०१९ मध्ये जॉब जाणार. काळजी घ्या.. मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला. म्हंटला नव्हेंबर मध्ये जॉब गेला. कुंडलीचा दशास्वामी पहिला तर विश्वास बसणार नाही अशी काही घटना घडू शकते म्हणून.

बाजूला दिलेल्या कुंडलीवर टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. २००९ तो २०२५ गुरु या ग्रहाची दशा सुरु आहे. गुरु लाभात, तृतीयेश व पंचमेश असून तो चंद्राच्या हस्त नक्षत्रात, चंद्र लाभात व दशमेश तसेच राहूच्या उपनक्षत्रात, राहू नवमात.

वर वर पहिले तर कळणार नाही. नवीन अभ्यासकांचा गोंधळ उडू शकतो. कारण दशास्वामी गुरु नक्षत्रस्वामी चंद्राच्या माध्यमातून लाभाची व दशमाची फले देणार म्हंटल्यावर या जातकाचा जॉब जाऊच शकत नाही अस चित्र दिसत.. पण अस नाही...

आता खरी मेख काय आहे ती समजून घेऊ.. कुंडलीत पंचम भाव कार्येश असेल तर अपवाद वगळता जॉब जातो असा नियम आहे. आता भावचलित कुंडलीत बघा, शुक्र, मंगल, रवी असे तीनही ग्रह त व गुरूची मीन राशी पंचमात आहे..

दशास्वामी गुरु लाभात, तृतीयेश व पंचमेश.. चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र लाभात व दशमेश

वर वर पाहिले तर पंचमात तीन तीन ग्रह असल्याने पंचमेश गुरु क्षीण कार्येश वाटतो अन इथेच ती ग्यानबाची मेख आहे. रवी, शुक्र, मंगळ हे तीन्ही ग्रहांच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही. त्यामुळेच पंचमेश गुरु बलवान कार्येश झाला आहे. उपनक्षत्रस्वामी राहू नवमात.  तात्पर्य... या जातकाला या दशकालावाधित अनेकदा जॉबलेस व्हावे लागणार आहे. त्याच्या अंतर्दशेचा अभ्यास करून नोव्हेंबर २०१९ मध्ये जॉब जाणार हे त्याला आधीच सांगितले होते....

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब

Wednesday, 11 January 2017

अष्टम भावातून आर्थिक नुकसान Financial losses astrology


नमस्कार मित्रहो

आयुष्यात ऐन तारुण्यात संघर्षाचा कालावधी असेल व तो काही वर्षाकरिता असेल तर हरकत नाही. परंतु तो कालावधी निवृत्तीच्या वयापर्यंत असेल तर...

खालील कुंडली टिचकी मारून बघा. कुंडलीतील जातकाचे नाव गुप्ततेसाठी काढून टाकले आहे.
या कुंडलीला सध्या बुधाची दशा सुरु आहे ती 2022 पर्यंत असेल.


दशास्वामी बुध शनीच्या उ.भाद्रपदा नक्षत्रात. शनी अष्टमात, अष्टमेश व नवमेश आहे. दशा स्वामी अष्टम भावाचा व नवम भावाचा बलवान कार्येश झाल्यामुळे या कालावधीत शिक्षणात अडचणी येतील, हा जातक इंजिनियरिंग मधील शाखेत शिक्षण घेईल. परंतु शिक्षण पूर्ण करताना एक ते दोन वर्षे जास्त लागतील.

अर्थात या कुंडलीचा फार खोलात जाऊन अभ्यास करण्याची गरजच नव्हती. जातकाने मला व्यवसायबद्दल प्रश्न विचारला होता पण कुंडलीचे निरीक्षण करताना जातकाच्या शिक्षणाची स्थिती कसे असेल याची कल्पना आली. तस मी त्याला विचारताच त्यांन विषय राहिल्याच सांगितलं.

दशास्वामी बुध अष्टम कार्येश असल्यामुळे व्यवसायात आर्थिक नुकसान होणार हे नक्की परंतु नवमाचा कार्येश असल्यामुळे व्यवसायात बदल सुद्धा होतील. स्थिरत्व येणार नाही.

मी त्याला नुकसानी बद्दल विचारताच त्यानं सांगितलं की त्याचे आतापर्यत 20 ते 25 लाख रुपयांचा व्यवसायात घाटा झाला. नवीन कर्ज काढून व्यवसाय पुढे चालू ठेवू कि बंद करू असा त्याचा प्रश्न होता.

मी त्याच्या पुढील येणाऱ्या महादशा बघितल्या. त्या दशा बघितल्यावर काय बोलावे कळेना. पुढील सर्व दशा म्हणजे केतू , शुक्र , रवी शनीच्याच नक्षत्रात. म्हणजे अष्टम व नवम भाव निवृत्त होई पर्यंत बलवानच राहतील. म्हणजेच स्वतंत्र व्यवसाय करून फायदा होणार नाही. पण पुढे आयुष्य कस चालायचं. 

मी त्याला व्यवसाय न करण्याचं सांगितलं. परिस्थिती समजून सांगितली. तो सुन्नच झाला, म्हंटला यावर काही उपाय नाही का ?

मी त्याला उपाय सांगितला व भागीदारीत 20 ते 30 टक्यांनी व्यवसाय करायला सांगितला. यानंतर जवळ जवळ एक वर्षांनी तो आला होता. त्याच्या भागीदाराला घेऊन. आता त्याच बर चाललंय म्हणाला.

शनी अष्टम भावाचा जर मजबूत कार्येश होत असेल तर तो कर्जबाजारी करून स्थावर जंगम मालमत्ता विकायला भागच पाडतो.  हा अनुभव अनेक जातकांच्या बाबतीत खरा झालाय.

शुभं भवतू ।


आपला 
नानासाहेब 

Wednesday, 13 January 2016

नॉट फिलिंग वेल - गोचर भ्रमण

नमस्कार मित्रांनो


सकाळी उठलो तर अंगात कणकण जाणवत होती. डोक जड़ वाटत होत. तसच आवरायला घेतल. आंघोळ करून बाथरूमच्या बाहेरच आलो तर एका मागे एक सटासट दोन शिंका आल्या. नाश्ता करून कपडे घाले पर्यन्त शिंका येण्याच प्रमाण वाढल. मग मात्र ऑफिसला जाण्याचा विचार सोडून दिला. आणखी त्रास करुन घेण्यापेक्षा आज सुट्टी घेऊ म्हणजे निदान उद्या तरी बर वाटेल हा हेतू.

सर्दिच्या गोळया घेतल्या व आराम करत कै. अण्णाभाऊ साठेंची फकीरा कादंबरी वाचायाला घेतली. रात्रि पुन्हा गोळयांचा डोस घेतला कारण रात्रि चांगलाच ताप अंगात भरला होता. म्हंटल सर्दी झालीय ताप येणारच.

दुस-या दिवशी सकाळी उठण्याची इच्छाच होईना. अंगात कणकण होतीच. वाटल आंघोळ करून फ्रेश वाटेल. पण कसल काय, डोळे टोपसले होते. निर्णय घेतला आजही आरामच करू. दुपार नंतर घरचे मागे लागले दवाखान्यात जा म्हणून. मी म्हंटल सर्दिचा ताप आहे काय दवाखान्यात जायच. अस म्हणून मी ते टाळल.

रात्रि नऊ साडे नऊ झाले असतील. घरच्यांच चालूच, दवाखान्यात जाऊन ये. आमच ऐकल असत तर कालच बर वाटल असत वगैरे. मग मात्र मी लगेचच दवाखान्यात जायच ठरवल. डॉक्टराना फोन केला तर डॉक्टर साहेब गेस्ट आलेत म्हणून क्लिनिक बंद करून घरी निघून गेले होते. उद्या सकाळी बघू म्हणून पुन्हा एकदा गोळयांचा डोस घेऊन गुड नाईट म्हंटल.

अखेर तिस-या दिवशी क्लिनिक, डॉक्टर, इंजेक्शन, प्रिस्क्रिप्शन, पुन्हा गोळयांचा डोस वगैरे गोष्टी झाल्या. दुपारनंतर मात्र सर्दी जुकाम कणकण गायब. बर वाटायला लागल. दुपारच जेवण झाल्यावर जरा आराम करावा म्हणून पडलो, डोळा लागत असतानाच विचार आला की आपल्या कुंडलित ग्रहांच गोचर भ्रमण काय म्हणतय. आजारी पडण्याच कारण तरी शोधुया म्हणून पंचांग उघडल.

मी आजारी पडलो त्या दिवशी तारीख होती 7 जानेवारी 2016.  पंचांग बघा त्या दिवशी चन्द्र वृश्चिक राशीत व  अनुराधा नक्षत्रात होता. मंगळ तूळेत, शुक्र, शनि वृश्चिक राशीत , रवि धनु राशीत.

माझी मेष लग्नाची कुंडली आहे. मेष लग्नाला वृश्चिक रास अष्टमात येते. अष्टम स्थान हे त्रिक स्थानापैकी एक आहे. मेष लग्न हे चर लग्न असल्याने बाधकेश शनि येतो तसेच परम मारकेश होतो शुक्र.

याचाच अर्थ हा की परम मारकेश शुक्र अष्टमात, बाधकेश शनि अष्टमात, लग्नेश मंगळ तुळेत मारक स्थानात अशी मजबूत कुस्थिति. आता  घटना घडून येण्यासाठी फ़क्त गोचरिने चंद्राच अष्टमातून भ्रमण हेच काय ते बाकी होत.

आणि हे भ्रमण सुरु झाल ६ जानेवारीला. या दिवशी चन्द्र वृश्चिक राशीत आला. पण ७ जानेवारीला अनुराधा नक्षत्रातून त्याच  भ्रमण सुरु झाल आणी त्यादिवशी मी आजारी पडलो. नाकातून पाणी वाहतंय , डोळ्यातून पाणी वाहतंय , डोक भनभन करतंय, अंगात सडकून  ताप भरलेला.  म्हणजे अगदी बेड रेस्ट.  

हिवताप किंवा कुठलाही किरकोळ तात्पुरत्या स्वरूपाचा आजार चंद्राच गोचर भ्रमण ठरवत. त्याकरिता महादशा बगण्याची आवश्यकता नाही.पण अंतर्दशा किंवा विदशा त्रिक स्थानाची कार्येश असायला हवी

ग्रह गोचरीचा असा विस्मय कारक अनुभव अभ्यासकांनी स्वताच्या बाबतीत कधीतरी निश्चित घ्यायला हवा.

शुभं भवतु ।

आपला
नानासाहेब

Thursday, 22 October 2015

विजयादशमी





नमस्कार मित्रहो 

आपणा सर्वांस 
विजयादशमीच्या 
हार्दिक शुभेच्छा

आपला
नानासाहेब