नमस्कार मित्रानो !
घटना घडायची ती घडल्या शिवाय राहत नाही हेच खर.. २०१५ मध्ये या जातकाला त्याचे
कुंडली विश्लेषण पाठवले. त्यात त्याला स्पष्ट सांगितले होते कि नोव्हेंबर २०१९
मध्ये जॉब जाणार. काळजी घ्या.. मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला. म्हंटला नव्हेंबर मध्ये जॉब गेला. कुंडलीचा दशास्वामी पहिला तर विश्वास बसणार नाही
अशी काही घटना घडू शकते म्हणून.

वर वर पहिले तर कळणार नाही. नवीन अभ्यासकांचा गोंधळ उडू शकतो. कारण दशास्वामी
गुरु नक्षत्रस्वामी चंद्राच्या माध्यमातून लाभाची व दशमाची फले देणार म्हंटल्यावर
या जातकाचा जॉब जाऊच शकत नाही अस चित्र दिसत.. पण अस नाही...
आता खरी मेख काय आहे ती समजून घेऊ.. कुंडलीत पंचम भाव कार्येश असेल तर अपवाद
वगळता जॉब जातो असा नियम आहे. आता भावचलित कुंडलीत बघा, शुक्र, मंगल, रवी असे तीनही ग्रह त व गुरूची मीन राशी पंचमात आहे..
दशास्वामी गुरु लाभात, तृतीयेश व पंचमेश.. चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र लाभात
व दशमेश
वर वर पाहिले तर पंचमात तीन तीन ग्रह असल्याने पंचमेश गुरु क्षीण कार्येश वाटतो
अन इथेच ती ग्यानबाची मेख आहे. रवी, शुक्र, मंगळ हे तीन्ही ग्रहांच्या नक्षत्रात
एकही ग्रह नाही. त्यामुळेच पंचमेश गुरु बलवान कार्येश झाला आहे. उपनक्षत्रस्वामी राहू
नवमात. तात्पर्य... या जातकाला या
दशकालावाधित अनेकदा जॉबलेस व्हावे लागणार आहे. त्याच्या अंतर्दशेचा अभ्यास करून
नोव्हेंबर २०१९ मध्ये जॉब जाणार हे त्याला आधीच सांगितले होते....
शुभं भवतु !
आपला
नानासाहेब
2 comments:
Khup divsani lekh lihila.anand jhala vachun.
Dhanyavad
Khup divasani lekh vachayla milala. Dhanyavad
Post a Comment