!! श्री !!
मित्रानो परवा एका जातकाचा फोन आला. म्हंटला "धन्यवाद सर ! नवीन नोकरीवर रुजू झालो".
"अरे वा s s गुड न्यूज" मी कसाबसा म्हणालो कारण त्यावेळेस मी नेमका कोर्टात होतो. एका खटल्याच्या काम काजा निमित्त मी गेलो होतो. फोन वाजताच तिथला शिपाई ओरडला "लांब जावून बोला नाहीतर मोबाईल जप्त होईल तुमचा"
दुपारी एक - दोनच रण रणत उन, कोर्टातील गर्दी, घामाच्या धारा, घाम पुसून पुसून पांढरा शुभ्र हात रुमाल संशयास्पद पांढरा
राहिलेला . या सर्वांशी सोयरे सुतक नसलेलं कोर्टाचं चाललेलं संथ गतीच काम काज. अक्षरशः वीट आलेला होता. पण म्हणतात ना अडला हरी........ अन अश्या परीस्थित सुनीलचा फोन आनंदाची बातमी सांगणारा .... सगळा वैताग गायब.
"अभिनंदन जॉब मिळाल्या बद्धल" मी त्या शिपायाच्या म्हणण्या प्रमाणे खरोखरच बाजूला येऊन बोललो. हो s s उगाचच जप्त बिप्त व्हायचा. नाहीतर हा स्वतः जप्त करायला बसला.
"अगदी तुमी सांगितल्या प्रमाणेच मार्च नंतर व जुलै च्या आत नोकरी मिळाली" त्याचा आनंद ओसंडून वाहत होता. आणि का नसणार, अचानक जॉब गेल्यानंतर घरी बसण्याची जेंव्हा वेळ येते तेंव्हा चांगले चांगले रथी महारथी परेशान होऊन जातात. तीन चार महिने मेहनत घेऊनही जॉब मिळत नसेल तर अक्षरशः वेड लागण्याची पाळी येते. नवीन जॉब कधी मिळणार, कुठे मिळणार, कसा मिळणार काही अंदाज नसतो. अश्या वेळेला मिळेल त्या पगारावर काम करायला माणूस तयार होतो. कारण ज्याचा जॉब गेलाय तो कंपनीच्या व्यवस्थापना बरोबर बार्गेनिगच्या मूड मध्ये नसतोच, करूच शकत नाही तो. त्यावेळची तातडीची आणि निकडीची गरज ताबोडतोब जॉब मिळण हि असते. नुसतच घरात बसून राहून घर खायला उठत. बायको, मुले असा संसारी माणूस असेल तर रात्र रात्र झोप येत नाही. मुलांकडे पाहून भयाण वाटत. रात्रीच्या भेसूर अंधारात उद्याच भविष्यही भेसुरच वाटायला लागत. वर वर कितीही पॉझीटीव थिंकिंग करा आतुन येणारा आवाज निगेटीवच असतो.
त्याची पत्रिका मी बाजूला दिलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल.
"फक्त घरा पासून दूर जाव लागतंय सर ! " त्याच्या बोलण्यातून खंत डोकावत होती. दूर जायचं म्हणजे कुटुंबासह स्थलांतर
"काही हरकत नाही. बचेंगे तो और भी लढेंगे ..." मी त्याला प्रोत्साहित करत म्हंटल.
"मग सगळ्यांना घेऊन जावू कि कस करू ?" त्याने त्याच्या काळजीचा प्रश्न विचारला.
"मी ऑफिस ला बसलो कि मग तुझी कुंडली बघून सांगतो" मी पांढरा शर्ट झटकत बोललो. तोही आता पांढरा राहिलेला नव्हता. त्यावेळी कोर्टाच्या बाहेर आलो होतो व तितक्यात एक रिक्षा प्रचंड धूळ उडवत निघून गेली होती.
बुध
महादशा मार्च २०२२ पर्यंत आहे. बुध ३ ११ २ असून तो मंगळाच्या
नक्षत्रात आहे व मंगळ १ ९ ४. जॉब गेला ती अंतर्दशा शुक्राची होती व ती मे २०
११ पर्यंत कार्यरत. शुक्र ३ ३ १०, शुक्र गुरूच्या नक्षत्रात. गुरु २ ५ ८. म्हणजे शुक्र पंचमाचा कारक झाला अन जॉब गेला. त्यानंतर रवीची अंतर्दशा, रवी २ एप्रिल २०१२ पर्यंत कार्यरत. रवी २ १, रवी मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ १ ९ ४. म्हणजे रवी या अंतर्दशेत नोकरी मिळणार नाही. त्यानंतर चंद्राची अंतर्दशा सुरु झाली. चंद्र ११ १२, चंद्र राहूच्या नक्षत्रात, राहू ८ , राहूवर मंगळाची दृष्टी, मंगळ शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र ३ ३ १०, म्हणजेच मंगळ दशमाचा कार्येश झाला. याच दशेत नोकरी मिळणार अस मी त्याला सांगितले होते.
हा प्रश्न मी डिसेंबर २०११ मध्ये सोडवला होता. तो आधी कुठल्या तरी आय टी कंपनीत होता.
नवम भावामुळे नोकरीत सारखे बदल होत राहणार. स्थैर्य हव असेल तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित नोकरीच टिकू शकेल असही मी त्याला बजावले होते. दुसरीकडे मात्र पुन्हा नोकरीत बदल पुन्हा तीच लफडी.
अर्थात नवम भावामुळे तो एका शिक्षण संस्थेतच प्रिन्सिपल म्हणून रुजू झाला. पेशांतर.. व तृतीय भावामुळे घरापासून दूर जावे लागले. स्थलांतर. ...........
शुभं भवतु !
आपला
नानासाहेब
1 comment:
Uttam blog...!!! Tumhi ek uttam lekhak suddha aahat.....
Post a Comment