।। श्री ।।
नमस्कार मित्रानो !
बाजूला ज्याची कुंडली दिलेली आहे त्या व्यक्तीला तो जो नवीन व्यवसाय सुरु करू इच्छित होता त्याबद्दल मार्गदर्शन हव होत.त्या कुंडलीवर क्लिक करताच ती वाचण्या योग्य मोठी होईल.
सध्या कुंडलीला गुरूची महादशा व बुधाची अंतर्दशा सुरु आहे. महादशा २००७ ते २०२३ पर्यंत आहे व बुध अंतर्दशा - मे २०१४ पर्यंत आहे. नंतर केतूची अंतर्दशा लागेल .
गुरु अष्ठ्मात, चतुर्थेश आहे, गुरु केतूच्या नक्षत्रात, केतू दशमात, केतूवर शनीची दृष्टी चतुर्थात, द्वितीयेश व तृतीयेश, शनि बुधाच्या नक्षत्रात, बुध तृतीयात व दशमेश आहे. तसेच केतू राविच्याही दृष्टीत आहे. रवि चतुर्थात व नवमेश, रवि बुधाच्या नक्षत्रात व बुध वरील प्रमाणे कार्येश. केतू मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ पंचमात, व्ययेश व लग्नेश आहे. केतू बुधाच्या राशीत बुध वरील प्रमाणे कार्येश व बुध गुरूच्या नक्षत्रात, गुरु अष्ठमात व चतुर्थेश.
वरील जंत्री खालील प्रमाणे कार्येश होईल.
गुरु ८ ४ नक्षत्रस्वामी केतू १०
दृष्टी शनि ४ २ ३ नक्षत्रस्वामी बुध ३ १०
दृष्टी रवि ४ ९ नक्षत्रस्वामी बुध ३ १०
नक्षत्रस्वामी मंगळ ५ १२ १
राशीस्वामी बुध ३ १० नक्षत्रस्वामी गुरु ८ ४
मित्रानो हि कुंडली एका बांधकाम व्यवसायकाची आहे. केतू वर शनीची दृष्टी असून शनि चतुर्थात आहे. तसेच तो बुधाच्या नक्षत्रात, बुध ३ १० चा बलवान कार्येश, त्यामुळे कष्टमर चिकार, अनेक "Flat system" चे प्रोजेक्ट त्याने यशस्वी केलेत.
आपण अस म्हणू कि गुरु च्या दशेत त्याला यश मिळाल, चांगला पैसा मिळाला कारण आजच्या काळात तृतीय भाव सर्वात जास्त पैसा मिळवून देणारा भाव आहे. पूर्वीच्या काळी तृतीय भावाला फारशी किमत नव्हती पण आज मात्र तृतीय भाव फॉर्म मध्ये आहे. असो !
गुरु जसा ३, १० चा बलवान कार्येश आहे तसाच तो ५, १२, ८ चा सुध्दा मजबूत कार्येश आहे. आता पाच, बारा, आठ लागल्यानंतर भल्या भल्यांची कशी वाट लागते हे के. पी. च्या अभ्यासकांना माहित आहे. भले मग तो कितीही शहाणा असो.
सध्या बुधाची अंतर्दशा चांगली जात आहे कारण बुधाचा उपनक्षत्र स्वामी शुक्र ६, ७, ११ चा कार्येश आहे. त्यामुळे आणखी एक नवीन व्यवसाय करण्याची इच्छा निर्माण झाली. पण बुध अंतर्दशा कितीही चांगली असली तरी पुढे येणारी केतूची अंतर्दशा त्याच नुकसान करणार कारण केतू ५, १२, ८ चा बलवान कार्येश होणार आहे.
पुढे येणारी केतूची अंतर्दशा खरच नुकसान करणार का ? याची खात्री करण्यासाठी मी गुरु महादशेवर लक्ष केंद्रित केल. गुरु महादशा २००७ ला सुरु झाली, गुरु केतूच्या नक्षत्रात आहे म्हणजेच गुरूची दशा लागल्या लागल्या या व्यक्तीला जबरदस्त नुकसान झाले असेल यात काही शंका नाही.?
मग मी त्या बिल्डरला विचारल "२००७ ते २००९ या काळात तुम्हची काही आर्थिक हानी झाली का ?"
तर तो म्हंटला "माज्या आजवरच्या आयुष्यात सगळ्यात मोठ नुकसान २००७ ते २००९ च्या दरम्यानच झाल आहे. एक कोटी रुपयाच्या आसपास नुकसान झालय"
गुरूची दशा सुरु झाल्या झाल्या या व्यक्तीला एका प्रोजेक्ट मध्ये जवळ पास कोटी रुपयांचा फटका बसला. कोटी रुपयाच नुकसान होण म्हणजे बाजारात रुपया हरवण नव्हे.
२००९ नंतर पुन्हा गाडी रुळावर आली. आता सर्व मार्गी लागून नवीन Drinking Water चा प्लान आहे. जवळ जवळ ५० ते ६० लाखाच्या आसपास गुंतवणूक करावी लागेल ? करू का नको ? हा खरा प्रश्न आहे.
येणारी केतूची दशा पुन्हा एकदा याला झटका देणार याची खात्री झाली. मी म्हंटल " गुंतवणूक करायची कि नाही ते तुमच तुमी ठरवा, पण २०१४ ते २०१५ या दरम्यान आर्थिक हानी होणार म्हणजे होणार त्या दरम्यान डोळ्यात तेल घालून व्यवसायात लक्ष घाला व जेव्हढ वाचवता येईल तेव्हढ वाचवायचं बघा अन्यथा थांबून घ्या व २०१५ नंतरच नवीन व्यवसाय सुरु करा."
शुभं भवतु !
आपला
नानासाहेब