Friday 4 January 2013

रूलींग ग्रह आणि अचूकता ...

नमस्कार

काल  सकाळी ऑफिसला येताना  सुलेखा   डॉट कॉम च्या मार्केटिंग च्या माणसाचा फोन आला. तुमची जाहिरात द्या अशी अशी ऑफर चालू आहे, अशान अस होईल वगैरे वगैरे.

म्हंटल "मला त्याची गरज नाहीये, मी  जाहिरात देणार नाही." 
तो म्हंटला "जाहिरात द्यायची किंवा नाही हे नंतर ठरवा  आमची ऑफर तर ऐका, मी आमचा बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर तुमच्याकडे  पाठवतो"

ओके ! पाठव अस म्हणून मी ऑफिसला आलो सकाळच्या  दोन कन्सलटन्सी आवरून बसलोच होतो इतक्यात त्या  बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसरचा फोन आला. त्यावेळी तो माझ्या ऑफिस पासून २५ - ३०  किलोमीटर दूर  कुठेतरी होता. त्याने माझा पत्ता घेतला व  येतोय अस म्हणून  फोन ठेवला.

नंतर दहाएक मिनिटे आजची  पेंडिंग कामं काय काय आहेत ती  पाहीली.  इतक्यात मला आठवल नेट  कनेक्टर रिचार्ज करायचं आहे, नवीन वर्षाच पंचांग घ्यायचय, माउस मध्ये मध्ये बंद पडतो तो बदलायचा आहे. म्हणजे बराच वेळ जाणार. त्यात त्या बहाद्दरान कधी येणार काय हे काही सांगितलं नव्हत.  तशी मला त्याची चिंता  करायचं काही कारण नव्हत. आला तर वाट पाहत बसेल. पण मला अस कुणाला  ताटकळत ठेवण आवडत  नाही. 

म्हंटल चल रुलिंग ग्रहांचा उपयोग करूया. हा बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर  किती वाजे पर्यंत  येणार ते पाहू.

कालची  तारीख .३.०१.२०१३ वेळ ११.३१ सकाळी
            रूलींग ग्रह
लग्न मीन        - स्वामी गुरु
चंद्र नक्षत्र पूर्वा  - स्वामी शुक्र
चंद्र राशी सिंह  - स्वामी रवि
वार गुरुवार     - स्वामी गुरु

प्रश्न वेळेस मीन हे द्विस्वभावी लग्न सुरु होते. म्हणजे याची येण्याची  वेळ  बदलू शकते. त्यामुळे त्याच्या येण्याबद्दल काही शंका निर्माण झाल्या त्या अशा...

एकतर हा लंचून  येईल किंवा लंच न घेता  येईल,  बाईकवर येईल किंवा बसने,  सध्या महामार्ग विस्तारीकरणाच काम जोरात सुरु आहे. त्यामुळे ब-याचदा ट्राफिक जामला तोंड द्याव लागत वगैरे 

मीन हे लग्न सकाळी ११:१५ ते १२:५१ पर्यंत, मीनेत गुरु , शनि व बुधाची नक्षत्रे आहेत,  मी रुलिंग घेतलं ती वेळ ११:३१.  त्यावेळी गुरूच नक्षत्र संपून शनीच सुरु झाल होत. शनि ,बुध रुलिंग मध्ये नाही.  त्यानंतर मेष लग्न सुरु होईल , मेषेचा स्वामी मंगळ  रुलिंग मध्ये नाही. मेष लग्न २:३६ पर्यंत, नंतर वृषभ लग्न सुरु होईल. वृषभेचा स्वामी शुक्र रूलींग  मध्ये आहे. वृषभेत रवी, चंद्र व मंगळाची नक्षत्र येतात. त्यापैकी रवि रुलिंग मध्ये आहे. त्याची व्याप्ती  १:१३:२० ते ३:०:० अशी आहे. त्यात गुरूचा सब  आहे. गुरु रुलिंग मध्ये आहे. म्हणजेच वृषभ  लग्नी शुक्राच्या नक्षत्रात व  गुरूच्या सब मध्ये तो 'बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर' येणार. वृषभ लग्न २:३७ ला सुरु  झाले ते लग्न ३ अंशावर अंशावर येईल त्यावेळी ती  व्यक्ती येईल. २:३७ मध्ये ३ अंश  मिळवले. २:४९ ला तो यायला पाहिजे.

म्हणजे त्याला यायला बराच  अवधी आहे. पण मीन लग्न द्विस्वभावी असल्यामुळे आणखी एक वेळ निश्चित करायला हवी. पण कोणती ? कारण मीनेत गुरु, शनि, व बुधाची नक्षत्र आहेत, शनि बुध रुलिंग मध्ये  नाहीत.  नाहीत ...?   अहो बुध रवि धनेत होते. बुध रवीच्या युतीत. म्हणजेच बुध सुद्धा रुलिंग ग्रह होतो व मीनेत बुधाच नक्षत्र आहे. म्हणून मीन लग्नी,  बुधाच्या नक्षत्रात व शुक्राच्या सब मध्ये 'ती व्यक्ती येईल' . शुक्र का  घेतला तर शुक्र प्रथम प्रतीचा आहे म्हणून. शुक्राचा सब १९:२०:० ते २१:३३:२० विकला पर्यंत  आहे. म्हणजेच ११:१६ मध्ये २१ अंश मिळविले तर १२:४० ला ती व्यक्ती येणार अस म्हणायला हरकत  नाही. पुढील  सब सुद्धा रवीचा आहे व रवि सुद्धा रुलिंग मध्ये आहे. म्हणजे १२:४० ते १२:५०  या दरम्यान तो  'बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर' यायला  हवा.

वरील प्रकारे मी दोनी वेळा निश्चित करून व ऑफिस मधून आता १२:५० नंतरच बाहेर पडू असा विचार करून मी इतर कामात गुंतलो.. 

बरोबर १२:४९ ला त्यान फोन केला "तुमच ऑफिस कुठे आहे ? मी आलोय."
म्हंटल "एन. डी. सी समोर"
मी केबिन च्या बाहेर पाहिलं एक तरुण  फोन बंध करून इकडेच येत होता. १२:५० ला तो केबिन मध्ये आला व त्यान त्याच बिझनेस कार्ड माझ्या टेबलवर ठेवत तो म्हंटला  "मी गणेश कदम, सुलेखा डॉट काम कडून  आलोय.......... "     

आपला
नानासाहेब 

3 comments:

ketaki said...

Khupach chan lekh aahe

nanasaheb said...

Thank you

padmanabh said...

U R Great!