प्रश्न कुंडली किती अचूक व बोलकी असते त्याच हे उदाहरण. २६ नोवेंबर २०१२ ची गोष्ट, त्या दिवशी कदम मावशीनी विचारल की घरी आपल्या
बंगल्यात बोर केल तर पाणी लागेल का ? मी त्यांच्या समोर टोकन ची पिशवी
ठेवली. त्यांनी १७९ नंबरच टोकन काढल. बाजूलाच १७९ नंबरची कुंडली दिली आहे
कुंडली बघताच लक्षात येईल कि प्रश्न किती मनापासून विचारला आहे व या जातकास त्याच उत्तरही किती अचूक मिळेल ते.
कुंडलीत चंद्र चतुर्थात म्हणजेच प्रश्न मनापासून विचारला आहे. चतुर्थाचा उप नक्षत्र स्वामी शनि दशमात, द्वितीयेश व तृतीयेश आहे. शनि राहूच्या नक्षत्रात, राहू लाभात, राहू गुरूच्या दृष्टीत, गुरु पंचमात, लग्नेश व चतुर्थेश, गुरु चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र चतुर्थात व अष्ठमेश.
वरील जन्त्रीवरून लक्षात येते कि बोर होलला चांगले पाणी लागणारं. कारण चतुर्थाचा उप नक्षत्र शनि ज्या राहूच्या नक्षत्रात आहे तो स्वत: लाभात असल्यामुळे बोरला पाणी लागणारच. तस मी कदम मावशीला सांगितलं. त्यानंतर आठ दहा दिवसांपूर्वी त्यांनी फोन करून सांगितलं कि खूप चांगल पाणी लागल.
शुभं भवतु !

आपला
नानासाहेब
No comments:
Post a Comment