।। श्री ।।
नमस्कार मित्रानो !
आमच्या कामात अनेक वेगवेगळे
अनुभव येत असतात. प्रत्येक कुंडली हि नवीन, वैशिष्ठ पूर्ण असते. काही
विस्मयकारक, विशेष घटना असली कि ती लिहावी अस मला वाटत. म्हणून हा लेखन प्रपंच.
काही
दिवसांपूर्वी आमच्या बंधूंच्या मित्राचा फोन आला. त्याच्या कंपनीतील
त्याचे वरिष्ठ अधिकारी येणार आहेत. त्याचं काही महत्वाच काम आहे तर
त्यांना तातडीने भेटीची वेळ हवी आहे. म्हंटल ठीक आहे. दुपारी १ नंतर या.
बरोबर वेळेवर बंधू मित्र व त्याचे वरिष्ठ अधिकारी आलेत. त्यांच्या सोबत आणखी
दोघेजण. त्यातला एक केरळी किंवा आपल्या भाषेत दक्षिणात्य वाटत होता.
साहेबांची
कुंडली बघून त्यांना सविस्तर माहिती वगैरे दिली. साहेब मुस्लिम समाजाचे
होते. त्यांचा या शास्त्रावर नुसताच विश्वास नव्हता तर अभ्यासही होता. तस
या आधीही मुस्लिम समाजाचे बरेच लोक माझे जातक आहेत. ग्रहांचा परिणाम हा
कुठल्याही जाती , धर्मानुसार वेगवेगळा नसतो. तासाभराने ते गेलेत.
त्यांच्या सोबत जे इतर दोघेजण आले होते त्यांच्या पैकी एकाचा दुस-या दिवशी
फोन आला कि आम्हाला आज वेळ द्या आमचेही काही प्रश्न आहेत. म्हंटल ठीक आहे
या.
सोबत बाजूला जी कुंडली दिलेली आहे ती त्यावर क्लिक करताच मोठी होईल. गोपानियतेमुळे जातकाचे नाव वगैरे डीटेल्स काढून टाकलेत.
सध्या या कुंडलीस बुधाची महादशा सुरु आहे. हि दशा २००७ ते २०२४ पर्यंत
कार्यरत राहील. बुध तृतीयात, चतुर्थेश व लग्नेश, बुध रवीच्या नक्षत्रात
रवि तृतीयात व तृतीयेश.
सध्या या गृहस्थाच वय ५० च्या आसपास. दशास्वामी २०२४ पर्यंत तृतीय भावाचा
मजबूत कार्येश. २०२४ साली या गृहस्थाच वय ६० असेल. तो पर्यंत हि व्यक्ती
घरा पासून दूरच राहणार. मी त्यांना तसं म्हणताच त्या व्यक्तीने जे सांगितल ते अस.....
हि व्यक्ती कारखानदार होती. २०० ते २५० कामगार त्याच्या कारखान्यात काम करायची. भरपूर पैसा मिळत होता. बंगला, गाडी, नोकर, चाकर वगैरे वगैरे सर्व गोष्टी...... ज्याला ऐश्वर्य म्हणतात असं सगळ होत. .....अचानक दृष्ट लागली....होत्याच नव्हत झाल.... आणि दिल्ली सोडून महाराष्ट्रात याव लागल .... देशोधडीला लागण यालाच म्हणतात..... अचानक काही घडत नाही. ग्रह दशा आधीच हे सगळ सांगतात... हे सगळ का घडलं कसं घडलं हि सगळी चर्चा मी त्याच्याशी केली. मुख्य मुद्धा हे सगळ का घडलं हे सांगायचं नसून सध्या हि व्यक्ती घरा पासून दूर राहणार. घराच सुख याला मिळणार नाही.
मग हि व्यक्ती मला म्हंटली कि "व्यवसायात मुलाला मदतीला घेवू का ?". म्हंटल त्याची कुंडली बघितल्याशिवाय सांगता येणार नाही. म्हंटला "देखो" !
मी मराठीत लिहितोय पण प्रत्येक्ष चर्चा हिंदीत चालू होती. हिंदीत सलग तीन तास बोललो तर अक्षरश: तोंड दुखायला लागत हा अनुभव मला नवा होता.
मुलाची कुंडली बाजूला दिलीय.
त्याची गुरु महादशा २००७ ते २०२३ पर्यंत कार्येश.
गुरु तृतीयात, दशमेश, गुरु चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र व्ययात व षष्टेश.
हि जंत्री पाहून मी त्या जाताकास प्रश्न विचारला "हा मुलगा सुद्धा घरापासून दूरच आहे का व आयटी, कॉल सेंटर किंवा इ मार्केटिंग करतो का ? ".
यावर तो म्हंटला " हो ! तो नोकरी निमित्ताने हरियानात आहे व कॉल सेंटर मध्ये नोकरी करतो ."
"याला व्यवसायात आणू नका. हा नोकरीतच योग्य आहे" मी त्याची दशा पाहून सांगितलं
यावर तो म्हंटला "माझ्या लहान मुलाची कुंडली बघा. तो बी.टेक करतोय. त्याची काय ग्रहदशा ते तरी कळू देत. "
मग मी त्याच्या लहान मुलाची कुंडली संघानाकावर छापली. ती बाजूलाच दिलेली आहे.

सध्या या मुलास शुक्राची महादशा सुरु आहे. हि दशा २०३२ पर्यंत कार्यरत राहील.
शुक्र द्वितीयात, तृतीयेश व दशमेश आहे. शुक्र रवीच्या नक्षत्रात रवि तृतीयात व लग्नेश आहे.
मी म्हंटल "तुमचा हा मुलगासुद्धा तुमच्या जवळ नाही का ?"
तर तो म्हंटला "तो कर्नाटकात इंजिनीअरिंग कॉलेजला आहे ".
हे ऐकून त्याने काही प्रश्न विचारण्या ऐवजी मीच त्यांना प्रश्न केला"तुमची बायको तरी तुमच्या बरोबर आहे का? "

तर यावर त्याच उत्तर ऐकून "तुका झालासी कळस ऐवजी 'तृतीया' झालासी कळस" असंच म्हणावसं वाटल.
त्याची बायको उत्तर प्रदेश मध्ये घरी आहे. घरात चार सदस्य . एक महाराष्ट्रात, दुसरा हरियानात, तिसरा कर्नाटकात व चौथा उत्तरप्रदेश. चौघे चार वेगवेगळ्या राज्यात.
जाता जाता शेवटी त्याने मला विचारल "तुम्ही म्हणता त्या प्रमाणे मी मुलाला इकडे व्यवसायात आणणार नाही. पण आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र कधी राहू कि नाही?"
"तुम्ही फक्त दिवाळी दसरा अस सणासुदीलाच एकत्र येणार. कायमचे एकत्र राहू शकणार नाही."
तिन्ही कुंडल्या मध्ये तीन, बारा मजबूत लागलेत म्हंटल्यावर मी आणखी काय सांगणार
"ठीक है जी. भगवान कि यही मर्जी है तो उसमे हमे परेशान होणे कि जुरुरत नही है !"
अस म्हणून त्यान नियतीचा कौल मान्य केला व मी कृष्णामुर्तीना सलाम.

तो गृहस्थ केबिन च्या बाहेर पडला, त्याच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत असतांनाच मनाच्या पटलावर गाण उमटलं
ना घर है S S ! ना ठिकाना S S S ! युंही चलते S जाना रे .
शुभं भवतु !
आपला
नानासाहेब
No comments:
Post a Comment