नमस्कार मित्रानो
ब-याच कालावधीनंतर
लिहिण्यासाठी वेळ मिळाला. म्हणून लिहितोय. अर्थात सध्या कुंडली मध्ये काही
विशेषता: जाणवली कि मगच मला लिहायला बर वाटत. असो.
मागे एकदा असाच एका
परीचीताचा फोन आला. मला म्हणाले “माझे एक स्नेही जरा अडचणीत आहेत त्यांना वेळ द्या. मीही त्यांच्या सोबत येतोय.”
सायंकाळी ठरल्या
वेळेवर ते आले. मी त्यांची कुंडली मांडली जरा निरीक्षणं केल्यावर त्यांना विचारल “ तुम्ही जमिनी संबंधी काही व्यवसाय करता का,
म्हणजे बांधकाम, जमीन खरेदी विक्री वगैरे ?”.
ते म्हंटले “हो... पण तुम्ही कस ओळखल ?“
मी म्हंटल “हे काही विशेष नाही. आमच्या शास्त्राचे कोणीही
अगदी सुरुवातीचे अभ्यासक सुद्धा अशा गोष्टी सांगू शकतात. तुम्ही तुमचे प्रश्न काय आहेत ते विचारा?”.
त्यांनी त्यांचे
प्रश्न विचारले. त्यावर आमची चर्चा झाली. त्याबद्द्ल मी इथे काही सांगत नाही.
त्यांच्या एका प्रश्नावर वर आपण फोकस करू. त्यांनी त्यांचा व्यवसाय भविष्यात कसा
राहील
याबाबत विचारणा केली.
ती कुंडली बाजूला
देत आहे. त्या कुंडलीवर टिचकी मारून मोठी करून पाहता येईल. अर्थातच मी जातकाचे नाव
गुप्त ठेवण्यासाठी कुंडलीतून काढून टाकले आहे.
वर सुरुवातीला
सांगितल्या प्रमाणे ते बांधकाम व्यावसायिक आहेत. तसेच जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय
ते करतात. हाच व्यवसाय ते का करतात बघू या.....
दशमाचा उपनक्षत्र
स्वामी राहू असून तो नवमात आहे. राहू रवीच्या दृष्टीत, रवी तृतीयात, लग्नेश व
द्वीतीयेश, रवी चित्रा नक्षत्रात, मंगळ पंचमात व चतुर्थेश, राहू मेषेत.
दशमाचा उप नक्षत्र स्वामी मंगळाचा व चतुर्थ भावाचा
कार्येश झाला आहे.
दशास्वामी शनी २००८
ते २०२९ पर्यंत कार्येश आहे. म्हणजेच शनीची महादशा आहे.
दशास्वामी शनी ८, ६,
७ दशास्वामी
शनी स्वनक्षत्रात असल्यामुळे नियमाप्रमाणे त्याचा उप नक्षत्र कार्येश होईल. दशास्वामी शनी ८, ६, ७ उप
नक्षत्रस्वामी राहू ९ दृष्टी रवी ३ १ २ नक्षत्रस्वामी मंगळ ५, ४ , दृष्टी
बुध ३, ३, ११, बुध गुरूच्या नक्षत्रात, गुरु १,५,९. राहू केतूच्या नक्षत्रात. केतू ३ , युती रवी ३ १
२ नक्षत्रस्वामी मंगळ ५, ४, राशी स्वामी शुक्र १, १०, नक्षत्रस्वामी
गुरु १,५,९
वरील प्रमाणे दशा
स्वामी शनीचे कार्यश्वत्व बघता असा लक्षात येईल कि शनीच्या नक्षत्रात एकही ग्रह
नसल्यामुळे व शनी ज्या भावांच प्रतिनिधित्व करतोय त्या भावात एकही ग्रह नाही
त्यामुळे शनी ८, ६, ७ या भावांचा बलवान
कार्यश झाला व राहूच्या माध्यमातून २,४,६,७,८,१०,११ या भावांचाही मजबूत कार्येश
झालाय.
वरील विश्लेषणाचा
अभ्यास झाल्यानंतर मी त्यांना म्हंटल कि आणखी पुढील १३ वर्ष तुम्ही करोडो रुपये कमावणार. एकाच वेळी २, ६, १०, ११ कार्येश झाल्यानंतर
काय होणार हे अभ्यासकांना सांगायला नको. नाही का ?
आणखी एक गोष्ट
तुमच्या लक्षात आलीय का ? दशास्वामी शनी अष्टमात असून जलतत्वाच्या राशीत आहे. आहे कि नाही चमत्कार ?
मी त्या जातकाला
विचारल “ तुम्ही जमिनीखालील बांधकाम करता का ? जसे भूमिगत गटारी वगैरे?” तर त्याने काय उत्तर दिल असेल ?
“हो मी जमिनी खाली बांधकामही करतो. खर म्हणजे माझ्या व्यवसायातील एक प्रमुख घटक
तोच आहे. परंतु सध्या तरी गटारी वगैरे नाही तर पेट्रोल पंपाचे बांधकाम, दुरुस्तीचे
काम करतो.”
आता कळलं का ? मी
चमत्कार का म्हंटल ते ? अहो शनी तेलाचा कारक नाही का ? अर्थात नसेल लक्षात आल तरी हरकत नाही. पेट्रोल
पंपाच मलाही क्लिक झाल नव्हत. असो.
एकूण काय तर हि व्यक्ती
याच व्यवसायात चिकार पैसा कमावणार आहे.
शुभं भवतु !
आपला
नानासाहेब
नानासाहेब
9 comments:
Good
कृष्णमुर्ती पद्धती मध्ये स्पर्धा परीक्षेत यश बाबत ब्लॉग बनवा
This is also good blog like yours on astrology
http://suhasgokhale.wordpress.com
Mi ek business karto mala 31st paryant kahi laabh she ka
Mi ek business karto mala tyat Yash 31 paeyant milal ka
good
I like it your articles are very useful
I like your articles.
Post a Comment