Wednesday 20 July 2011

गुण मेलनावरून विवाह करण्याचा प्रकार बकवास आहे - भाग १

ज्योतिष शास्त्रात 'गुण मेलन' करून विवाह करण्याचा प्रकार आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. नाडी, राशी, योनी व गुण यांपैकी कोणतेही तीन भाग जुळले कि कुंडली जुळते.

नाडी ८, योनी ४, गण ६ राशी ७ असे गुणांचं वाटप केल  जात

नाडी ८ + योनी ४  + गण ६ = १८ गुण
नाडी ८ + योनी ४ + राशी ७ = १९ गुण
गण ६ + नाडी ८ + राशी ७ = २१ गुण

याचाच अर्थ वरील चार मुख्य भागांपैकी कोणतेही तीन भाग जुळले कि कुंडली जुळते. कारण कमीत कमी १८ गुण मिळताच वर्ण, वश्य, तारा, ग्रहमैत्री, यातून २-४ गुण मिळतातच.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या नक्षत्र व राशीचा आधार गुण मेलनासाठी घेतला जातो त्या नक्षत्र राशींचे सर्व गुणधर्म जातकाच्या अंगी असतात का? देव गणाचा जातक खरोखरच देवासारखा सत्वगुणी असतो का ? निदान वैवाहिक जोडीदाराशी तरी सत्वगुणी धर्म पाळतो का ?  अनेक देव गणांच्या जातकांचे विवाहबाह्य संबंध दिसून येतात.  अस का ? राक्षसगणी खरोखरच राक्षसी प्रवृतीचा असतो का ?

एकाच नक्षत्र राशीतच नव्हे तर एकाच नवमांशात जन्माला आलेल्या दोन भिन्न व्यक्तीचे गुणधर्म जर वेगवेगळे दिसून येतात तर त्याच आधारे केलेले गुण मेलन हे विवाह जुळविण्यासाठी निश्चितच कुचकामी आहे.

याकरिता वधूवरांच्या दोन्ही कुंडल्यांचा संपूर्ण अभ्यास करूनच निर्णय घ्यायला हवा. काही कुडमुड्या ज्योतिषांना पंचांगा पलीकडे ज्ञान नसते पण तेही ३२ गुण जुळतात म्हणून छातीला माती लावून सांगतात 'बिनधास्त लग्न करा ! काही अडचण नाही ' .

खर तर वर किंवा वधू  दोघांनी कुंडली जुळवताना विचार करायला हवा. हि कुंडली माझ्याशी जुळते का ? म्हणजे या व्यक्तीचा स्वभाव माझ्याशी जुळेल का ? थोडक्यात वेव्ह लेंग्थ जुळेल का ? मला मानसिक, शारीरिक समाधान देईल का ? नोकरी करील का ? वगैरे वगैरे .

या सर्वांची उत्तरे १० सेकंदात केल्या जाणा-या गुण मेलनातून देता येऊ शकत नाही.

कुंडलीतून जातकाचे वैवाहिक जीवन कसे राहील हे कळते. त्याच अर्थार्जन, त्याचे नसते उद्योग, त्याची प्रवृत्ती वगैरे सगळ्या गोष्टी कळतात.

समजा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत वैवाहिक जीवन उपभोगण्याची क्षमता नसेल तर ?

उदा. समजा एखादा पुरुष नपुंसक असेल त्याला वैषयिक सुख उपभोगण्याची क्षमताच नसेल आणि त्याचा विवाह रंभा, उर्वशी, मेनकेशी जुळवून  दिला तरी त्याला किंवा तिला त्याचा काय उपयोग?

एखाद्या स्त्रीला मुलच होणार नसेल तर पुरुषाच्या पौरुषत्वाचा तिथे काय उपयोग ?   

एकाच लेखात हा विषय संपत नाही म्हणून हा विषय पुढील भागात घेणार आहे. .....



शुभंभवन्तु !

आपला
नानासाहेब पाटील
 

No comments: