Thursday 7 July 2011

अनेक व्यवसाय करूनही अपेक्षित यश नाही...

काल माझा एक जुना मित्र मला भेटायला आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर म्हंटला माझ नोकरी व्यवसायाच  बघ  जरा. सध्या म्हणाव तस अर्थार्जन नाही. मी त्याची कृष्णमुर्ती पद्धतीने पत्रिका मांडली व पुढील येणारा काल त्याच्यासाठी कसा असेल ते बघितले. वर दिलेली पत्रिका त्याची आहे. टिचकी मारताच मोठी करून बघता येईल. नाव गोपनीय ठेवले आहे. उगाच त्याला अडचण नको.

जातक गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी करत आहे, त्याच्या म्हणण्यानुसार अनेक व्यवसायही केलेत. पण अपेक्षित यश मिळाले नाही. व्यवसायात अपयशच आल व नोकरीतही म्हणाव तसा उत्कर्ष किंवा प्रगती झाली नाही. अनेक उपायही करून बघितलेत पण परिस्थिती जैसी थे !

पत्रिका जरा वेगळी आहे म्हणून ज्योतिष वाचकांना व अभ्यासकांना तीच विवेचन करता याव तसेच वाईटातून चांगले आउटपूट कसे काढता येते ते कळावे म्हणून हि पत्रिका महत्वाची वाटली.

जातकाला सध्या राहूची महादशा आहे व ती २०२१ पर्यंत आहे.  राहू तृतीयात असून शुक्राच्या दृष्टीत आहे. शुक्र नवमात तसेच व्ययेश व सप्तमेश आहे.

नवम भाव नोकरी व्यवसायात अत्यंत त्रासदायक ठरतो. त्याच कारण म्हणजे जातकाची सतत बदल करण्याची वृत्ती. कोणतेही कारण नसताना नोकरी बदलणे, तसेच व्यवसाय बदलणे, या दोन प्रवृत्तींमुळे सातत्य रहात नाही. दुसरे असे कि या लोकांना सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागते.

नवम भावामुळे देवदर्शन, अनेक धार्मिक स्थळांना भेटी देणे असे प्रकार वाढतात,  इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती, म्हणजेच प्रसंग आलाच तर कासेची लंगोटी सोडून देतील. समाज कार्यात, धार्मिक कार्यात सतत भाग घेणे.  म्हणजे काम धंदा सोडून लष्कराच्या भाकरी भाजणे. या सर्व बाबींचा नोकरी व्यवसायावर सतत विरोधात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे नोकरी व्यवसायात स्थिरता लाभात नाही.

वरील भावामुळे नोकरीला प्रोब्लेम आलाच तसेच व्यवसायातही अपयश आल. पण त्याने निवडलेले व्यवसाय त्याच्या पत्रिकेला अनुसरून नसल्यामुळे अडचणी आल्या. मी त्याला कुठला व्यवसाय करावयाचा ते सांगितले. तसेच राहूचा तोडगा व दैवी उपायही सांगितला.

त्याला सांगितले कि आता जोही व्यवसाय करशील तो रिटेल स्वरूपाचाच असला पाहिजे. घाऊक व्यापारात वाट लागेल. व्यवसाय स्वतंत्र न करता भागीदारीत करावा. सगळ्यात महत्वाची अट म्हणजे भागीदारी एखाद्या स्री बरोबर करावी.

हि अट ऐकून तो उडालाच ! तो म्हंटला हे कस शक्य आहे ?

मी म्हंटल का नाही ? बायको, बहिण, आई अस आपल्याच घरातील कुठल्याही स्री बरोबर भागीदारी कर. बाहेर नको.

शुक्र सप्तमेश असल्यामुळे स्री बरोबर केलेली भागीदारी उत्तम प्रतीची ठरते. रोखीच्या व्यवहारात चांगलाच फायदा होतो. घाऊक व्यापार टाळावा.

शुक्र व्ययेश असल्यामुळे खर्चिक वृत्ती वाढणार यात शंकाच नाही पण त्याच शुक्रामुळे कर्जफेडहि होणार.      
 
त्याला आणखी एक महत्वाची सूचना केली कि २०५६ पर्यंत व्यवसायात बदल करू नको.

शुभंभवन्तु  !

आपला
नानासाहेब पाटील

No comments: