Monday, 21 November 2011

मला नोकरीतून कमी करतील का ?


मित्रानो !

मागे पंधरा वीस दिवसांपूर्वी सुनील पाटीलने त्याचा प्रश्न ई पत्राने पाठवला. तो बंगळूरू स्थित एका आय टी कंपनीत आहे. सध्या तो टेन्शन मध्ये होता. त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या कंपनीची स्थिती अचानक खालावली. अस झाल कि मग गदा येते ती एम्प्लोयीच्या नोकरीवर. बरेचजण त्याच्या कंपनीतून कमी करण्यात आले. त्यालाही त्याच्या  जॉबची खात्री राहिली नव्हती. असो. 

त्याचा प्रश्न होता ' मला नोकरी कधी मिळणार ? कुठे मिळणार ? किंवा मिळणारच नाही ?'. तो फोन करून विचारायचा पण मला त्याची पत्रिका बघायला वेळच मिळायचा नाही. मध्यंतरी त्याच्याकडून के पी सीड घेऊन ठेवला होता. पण हार्ड डिस्कला प्रॉब्लेम  आला.  ती रिपेर झाली यात पाच सहा दिवस गेलेत. एक दिवस तोही येऊन गेला. पण तो दिवाळीचा कालावधी असल्यामुळे निवांत वेळ मिळालाच नाही. त्याचे बेंगलोरहून फोन. 'माझ काय झाल ? कधी सांगणार ?'. 

एक दिवस रात्री १० पर्यंत कार्यालात बसलो. आज कुठल्याही परिस्थितीत सुनीलचा प्रश्न   हातावेगळा करायचाच अस म्हणून इतर सर्व हातातील पत्रिका बाजूला ठेवल्या. कारण त्याचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत महत्वाचा व गंभीर होत  चालला होता. 

वाचकांसाठी त्याची पत्रिका बाजूलाच दिलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. 

हि प्रश्न कुंडली आहे. या पत्रिकेनुसार दशमाचा उप नक्षत्र स्वामी गुरु  लग्नात असून नवमेश व व्ययेश आहे. गुरु शुक्राच्या नक्षत्रात. शुक्र षष्टात तसेच सप्तमेश व द्वितीयेश   आहे. त्यामुळे सुनीलला कंपनीतून  कमी करण्यात येणार नाही हे नक्की. मी त्याला सांगितलं ' तुला कंपनीतून कमी करणार नाहीत. मात्र गुरु नवमेश असल्यामुळे नोकरीत बदल होणार. तसेच लग्नातील गुरु  नवमेश  असल्यामुळे तू स्वताहून राजीनामा देशील.' हे सगळ सांगितल्यावर त्याने विचारल  किती दिवसात हा बदल होईल ?'. मी पुढील दशा, सुक्ष्मदशा बघितल्यावर त्याला सांगितलं  कि १४/१२/२०११ च्या आत हा बदल होईल.

त्यानंतर  त्याचा फोन आला. म्हंटला ' सर ! तुमची पद्धती अचूक आहे. मी राजीनामा दिलाय व  १०.१२.२०११ ला दुसरी कंपनी जॉईन करतोय.' 


आपला
नानासाहेब पाटील 
 

No comments: