ब्लॉगच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या !
हि दिवाळी आपण सर्वांना सुखसमृद्धीची, भरभराटीची जावो !
अभ्यंग स्नान
बुधवारी म्हणजे उद्या पहाटे ५.१६ नंतर अमावस्या सुरु होत आहे. अभ्यंग स्नान दिवाळीतील महत्वाचे स्नान आहे. जसं सिंहस्थात साधूंच शाही स्नान तसच आपलं नरक चतुर्थीच्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर केलेल्या अभ्यंग स्नानाला महत्व आहे .
उद्या ब्राह्म मुहूर्त पहाटे ४ वाजेचा आहे. या मुहूर्तावर जर आपण अभ्यंग स्नान केले तर आपण पुण्याचे वाटेकरी व्हाल . पुण्याचा लाभ होईल.
अभ्यंग स्नान करून पहाटे ५.१६ च्या आतच, घरातील तसेच जवळच्या मंदिरातील देवांना फराळाचा नैव्यद्य दाखवावा व त्यानंतरच स्वत: फराळावर ताव मारावा, तसेच आपले मित्र, स्नेही, आप्तेष्टांना फराळाचे आमंत्रण द्यावे.
आपला शुभेच्छुक
नानासाहेब पाटील
No comments:
Post a Comment