Monday 24 October 2011

नोकरी बदलली ...

नमस्कार मित्रानो !

एक दिवस शरद आला. बहुतेक सुटीच होती  त्या दिवशी त्याला. जरा घरगुती गप्पा टप्पा झाल्यानंतर त्यान मुख्य विषयाला हात घातला 
म्हंटला 'मला नोकरीत स्थैर्य कधी आहे ते बघ. सध्या जी नोकरी करतोय ती नकोशी झालीय. दुस-या नोकरीचे काही चान्सेस आहेत का तेही सांग.'

म्हंटल ठीक आहे. काढ टोकन. त्याने १७ नंबरच टोकन काढलं. त्याची जन्म तारीख नक्की नसल्यामुळे प्रश्न कुंडली काढावी लागली. ती कुंडली बाजूला दिली आहे. टिचकी मारून ती बघता येईल. 

प्रश्न कुंडली प्रमाणे षष्टाचा उप नक्षत्र स्वामी शनी असून तो चंद्राच्या नक्षत्रात आहे. शनी षष्टात असून दशमेश व लाभेशही आहे. शनी चंद्राच्या माध्यमातून फळे देणार. चंद्र द्वितीयात असून लाभेश आहे.  म्हणजेच नोकरीला मरण नाही.


पत्रिकेला मंगळ महादशा चालू आहे मंगळ २ ८ १ असा आहे व मंगळ बुधाच्या नक्षत्रात आहे. बुध ४  ६  ३ लागलाय.  बुध षष्टात असल्यामुळे नोकरीत बदल होणार हे निश्चित. तसेच  पालेभाज्या, लहान आकाराची फळे या माध्यमातून धनार्जन. त्याला हे सांगितलं  तस तो काही बोलला नाही. त्याला म्हंटल ह्या पंधरा दिवसात तुझी नोकरी बदलणार. 

त्यानंतर आठ दहा दिवसांनी त्याचा फोन आला. म्हंटला  'नोकरी बदलली. पिंपळगाव च्या आडतवर नोकरी सुरु केली आहे. 

ब-याच वाचकांना आडत म्हणजे काय हे माहित नसेल. आडत म्हणजे जिथे शेतकरी आपला शेती माल दलाला मार्फत व्यापा-यांना विकतात ती कंपनी. 

शेवटी महत्वाच काय तर टोम्याटो, द्राक्ष, भाजीपाल्याचा व्यापार करणा-या ठिकाणीच शरदला नोकरी लागली. 
धन्यवाद !


आपला 
नानासाहेब पाटील




No comments: