Monday 3 October 2011

मुलगा कि मुलगी ?

माझा मित्र प्रकाश चौधरी यांचा आपल्या शास्त्रावर चांगलाच विश्वास बसलेला होता. कारण यापूर्वी त्यांना तसा अनुभव येऊन शास्त्राची सत्यता पटली होती. मी त्याला विचारलं ' काय रे काही विशेष ?'  तो म्हंटला 'बायको डिलिवरी साठी माहेरी गेली. काय होईल? काळजी वाटते म्हणून आलो. 

मी विचारलं 'डॉक्टरने कुठली तारीख सांगितली ?' तो म्हंटला  '२२.०९.२०११'
मी लगेच Ruling planet  घेतलं.  

L: शनी 
S: मंगल 
R:  बुध 
D: बुध 

रुलिंग मध्ये शनी आला म्हणून मी त्याला सांगितलं कि २२.०९.२०११ या तारखेला डिलिवरी होणार नाही.उशीर होईल. 

तो म्हंटला मला दिवस सांग. 

मी तो दिवस काढला व त्याला सांगितलं कि २४.०९.२०११ तारखेला  शनिवारी डिलिवरी होईल. नॉर्मल डिलिवरी होणार नाही काळजी घावी लागेल. डिलिवरीच्या वेळेस क्रिटीकल सिचुएशन येऊ शकते. 

तो म्हंटला ' ठीक आहे. आता हे सांगा सर कि मुलगा होईल कि मुलगी ? '

अवघड जागीचं दुखन म्हणतात ते हेच. त्याला म्हटलं कि मुलगा किंवा मुलगी काही झालं तरी काय फरक पडतो. 

तो म्हंटला ' मला काही फरक पडत नाही फक्त उत्सुकता म्हणून विचारतो.'     

मी रुलिंगच्या प्रश्न कुंडलीत  बघितलं पंचमाचा उप नक्षत्रस्वामी मंगळ भाग्यात. 

त्याला म्हटलं 'विष्णू डेअरीत पेढे काय किलो मिळतात.?' 

'का रे ?'

'अरे मुलगा झाल्यानंतर पेढे वाटतात आपल्याकडे ?'

'काय सांगतोस ? खरच का? '

'झाल्यावर सांग ' मी त्याला तसं सांगितलं.
काय झाल असेल ? वाचकांच्या मनात कदाचित प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही. मीही जास्त न ताणता त्यांची उत्सुकता शमवतो. 

प्रकाशचा मला २५.०९.२०११ ला सकाळी सकाळी फोन आला. 

म्हटला 'तू सांगितलं तसच झाल. २४ तारखेच्या शनिवारीच डिलिवरी झाली. चार टाके पडले. आणि मुलगाच झाला'.

त्याच्या फोनने  मलाही आनंदच झाला. मी मनातल्या मनात माझे मानस गुरुवर्य सोतीधामानन  श्री कृष्णमुर्ती यांना नमस्कार केला व त्यांनी किती  अचूक संशोधन करून ठेवलं  याच नेहमी प्रमाणे आजही विस्मय वाटला.


आपला 
नानासाहेब पाटील





No comments: