Thursday, 16 February 2012

अनुभवाशिवाय शहाणपण नाही..

नमस्कार !

काल माझे मित्र ज्ञानेश्वर पल्हाळ यांचा सकाळी फोन आला. म्हंटले ' ज्ञानेश्वर कदम यांना तुम्हाला काही सांगायचं आहे,  भेटण्याची वेळ द्या ' मी म्हंटल ठीक आहे, कारण मीही त्यांना जातक म्हणून ओळखतो. मागे एकदा ते माझ्याकडे येऊन गेलेत. हि अगदी साधी गोष्ट पण तरीही काहीतरी चुकतंय अस त्या वेळी मला जाणवलं. जरा विचार करता लक्षात आल कि माझ्याकडे प्रत्येक जन काहीतरी विचारायला आलेला असतो  अशी भेट वगैरे  ठरवून  काही सांगण्यासाठी  तर  नाहीच.  मामला  नक्कीच  गंभीर  असावा  अस  मला वाटल .

ठरल्या  वेळेप्रमाणे  ज्ञानेश्वर कदम आलेत . मी त्यांना विचारल  "काय ?  काही विशेष   ?"
ते म्हंटले "माझ  फार  मोठ  नुकसान  झाल .  पाच  ते सहा  लाखाला  झोपलो ."
"काय  सांगताय  काय  ? कस  काय  ?" मी.
 "सगळ्या  द्राक्ष  बागेच  नुकसान  झाल.   मागे  दोन  तीन दिवस  जी  थंडी  पडली, तिन वाट लावली माझी "
मलाही आठवल अगदी ०.२ डिग्री सेल्सिअस तापमान झाल  होत. 
"अरेरे ! खूपच वाईट झाल " मी बोललो .
"माझं एव्हढ नुकसान झाल कि वर्तमान पत्रातही छापून आलय. त्या द्राक्ष बागेचा फोटोही आलाय "
वाईटच वाटल.  वर्षभराची मेहनत व हात तोंडाशी आलेला घास असा अनपेक्षित निघून जावा हे वाईट,  अगदी वाईट.

मी अधिक काही न बोलता त्यांची पत्रिका उघडली. ती बाजूला दिलेली आहे.

हि पत्रिका मी डिसेंबर मध्ये केली होती. त्यावेळी त्यांनी व्यवसाया बद्धल विचारलं होत. काय सल्ला दिला असेल बर त्यावेळी मी त्यांना.... ?

कुंडलीस शुक्राची महादशा सुरु असून ती २०२४ पर्यंत आहे. नंतर रवीची महादशा लागणार आहे, ती २०३० पर्यंत आहे.

शुक्र १२ ३ १० असून तो केतूच्या नक्षत्रात आहे. केतू भाग्यात. केतूवर कोणत्याही ग्रहाची दृष्टी नाही, युती नाही, केतू रवीच्या नक्षत्रात, रवी १२  १, केतू शुक्राच्या वृषभ राशीत असून शुक्र पुन्हा केतूच्या नक्षत्रात. हि महादशा  संपल्यानंतर रवीची महादशा, रवि १२  १ तसेच तो केतुच्याच नक्षत्रात.


वरील जंत्री बगता शुक्र हा एकमेव ग्रह व्यवसायाचा कारक ग्रह आहे हे लक्षात येईल. शुक्र दशमेश आहे तसेच तृतीयेश हि आहे. म्हणजेच वाहन, फळांचा व्यापार, कपडे, इत्यादी संबंधित व्यवसायात जातकाला यश येईल.  

वरील व्यवसाय सोडून जर दुसरे व्यवसाय केलेत तर भाग्यातील केतू यश मिळू देणार नाही. इतर व्यवसायात नुकसान होईल.

शेती हा तुमचा पारंपारिक व्यवसाय आहे. स्व निर्मित नाही.  त्यामुळे शेतीला तुम्ही पूरक व्यवसाय म्हणूनंच ठेवा. हे सगळ मी त्यांना डिसेंबर मधेच सांगितले होते. पण  म्हणतात ना अनुभवाशिवाय शहाणपण नाही.

शुभंभवतु

आपला
नानासाहेब 

No comments: