Wednesday 7 March 2012

दिलेल्या तारखेच्या आतच लग्न ठरलं

नमस्कार !

सध्या जिकडे तिकडे मंगल कार्य चालू आहेत. लग्नाची धावपळ जोरात सुरु आहे. ज्याचं लग्न नुकतच झालं ते खुश, ज्याचं ठरलं ते खुश पण या गर्दीत काही लोक मात्र आनंद हरवून बसतात. त्याचं लग्न जमत नाही. कुठे मुलाच जमत नाही, कुठे मुलीच जमत नाही. त्यामुळे पालक, त्यांचे नातेवाईक, स्नेही, मित्र मंडळी या सर्वाना ती चिंता  लागून  राहते. मग अश्यावेळेस,  इतर  वेळी  ज्योतिष  शास्त्राला  नाव ठेवणारे, नाक मुरडणारे लोक सुद्धा  ज्योतिर्विदांकडे जातात असो. ज्योतिष शास्त्राला नाव ठेवणारे  आणि त्याला मानणारे हा वाद पुरातन आहे.

तर असाच एक जातक नोव्हेंबर  महिन्यात त्याच्या भाचीची पत्रिका घेऊन आला होता. त्या मुली साठी वर संशोधन गेल्या २ ते ३ वर्षांपासून सुरु होत वगैरे माहिती जातकाने दिली. पत्रिका के. पी. पद्धतीची नसल्यामुळे मी नव्याने ती तयार केली. हि पत्रिका मी त्या मुलीच नाव न टाकता बाजूला दिलेली आहे.  वाचक ती बघू शकता.

या पत्रिकेला राहू महादशा १९९३ पासून सुरु होती व ती डिसेंबर २०११ पर्यंत कार्यरत. राहू बुध, रवी, शनीच्या दृष्टीत. बुध, रवी षष्ठाचा मजबूत कार्येश तसेच शनी दशमात,व्ययेश व लग्नेश . बुध शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र चतुर्थाचा कार्येश व नवमेश, रवी व शनी केतूच्या नक्षत्रात, केतू सप्तमात, केतूचा नक्षत्रस्वामी शुक्र व तो रवीच्या राशीत. तसा रवी सप्तमाचाही क्षीण कार्येश आहे. हा क्षीण कार्येश सोडला तर वरील जंत्रीतील ग्रह कुठल्याही पद्धतीने लग्नाचे कार्येश नाहीत. तसेच हि महादशा संपत आली तरी लग्न ठरल नाही. त्यामुळे तो क्षीण कार्येश काही कामाचा नाही हे लक्षात येत.

जानेवारी पासून गुरूची महादशा सुरु होणार होती. गुरु तृतीयात, लाभेश तसेच द्वितीयेश आहे गुरु चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र सप्तमात व षष्ठाचा कार्येश आहे, चंद्र जरी षष्ठाचा कार्येश असला तरी त्यापेक्षा तो सप्तमाचा बलवान कार्येश आहे त्यामुळे या महादशेत विवाह होणार यात शंकाच नाही. पहिली अंतर्दशा गुरूचीच. 

एकंदरीत काय तर अश्या प्रकारे कुंडलीचे सूक्ष्म निरीक्षण करून मी त्या जातकाला त्याच्या भाचीचे लग्न ४ मार्च २०१२ पर्यंत जमेल अस सांगितलं. त्यानंतर डिसेंबर गेला, जानेवारी, फेब्रुवारी हेही गेलेत. त्यानंतर          २ मार्चला हा जातक पुन्हा सकाळी कार्यालयात आला व म्हणाला "भाचीच लग्न ठरलं. १ तारखेला सगळी बोलणी झाली. तारीख फक्त जूनची घेतली. तुम्ही सांगितल्या प्रमाणे ४ मार्चच्या आतच लग्न ठरलं. आम्हाला सगळ्यांना हे खूपच विशेष वाटलं. तुम्ही ग्रेट आहात." 

मी फक्त हसलो आणि म्हणालो (मनातल्या मनात हं ) " आम्ही कसले ग्रेट ? जे संशोधन गुरुवर्य ज्योतिष मार्तंड श्री कृष्णमुर्तिनी ४० वर्ष केल, त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी रक्त आटवल, ते खरे ग्रेट. आम्ही त्या दिंडीतले एक वारकरी हेच काय आमच कर्तुत्व. आम्ही फक्त त्यांचे नियम पाळतो. खरी प्रचीती त्यांच्या नियमांची येते"
त्यांच्या नियमांना च्यालेंज करून उगाचच स्वतःची टिमकी मिरवण्यात काय अर्थ आहे, नाही का ?

आपला 
नानासाहेब
   

1 comment:

Anonymous said...

mag rahu chya mahadashet lagna hotach nahi ka?