नुकतीच एक कंसलटन्सी संपवून मी जरा निवांत होतो न होतो तोच एक महिला जातक आल्या. अर्थात त्या अपॉइंटमेंट घेऊनच आल्या होत्या व अगदी वेळेवरही आल्या होत्या. मी त्यांना बसायला सांगितलं.
त्या जरा निवांत होताच मी म्हंटल "बोला काय अडचण आहे ?"
यावर त्यांनी काही क्षण विचार केला व सांगायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या "माझा संतती बद्दल प्रश्न आहे. द्वितीय संततीचा योग आहे किंवा नाही ते सांगा व असलाच तर कधी ?" .
मी संघणकावर लगेचच त्यांची कुंडली छापून घेतली . ती बाजूला दिलेली आहे. गोपनियतेमुळे मी नाव काढून टाकलय.
पत्रिकेस शनीची महादशा सुरू असून ती २०३० पर्यंत कार्यरत आहे.
शनी षष्टात, लग्नेश व द्वितीयेश , शनी शनिच्याच नक्षत्रात त्यामुळे त्याचा उप नक्षत्र कार्येश होईल. शनी बुधाच्या उप नक्षत्रात, बुध चतुर्थात, षष्टात व नवमेश. म्हणजेच हि महादशा संततीस अजिबात पोषक नाही. शनी कुटुंब स्थानाचा क्षीण कार्येश आहे. म्हणजे संतती होणार पण सहजा सहजी नाही. कारण बुध चतुर्थाचा मजबूत कार्येश आहे. अश्या स्थितीत गर्भपात होण, मुल न राहण वगैरे घटना घडतात.
या आधीची महादशा पहिली, ती गुरूची होती.
गुरु ३ १२ गुरु - शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र ४ ५ १०
म्हणजे प्रथम संततीस सुद्धा त्रास झाला असणार. मी तस त्या महिलेस विचारल. त्यांनी ते कबुल केल. त्या म्हणाल्या "पहिल्या संततीस सुद्धा खूप अडचणी आल्या. मेडिकल ट्रीट मेंट घेतल्या नंतरच २००२ - २००३ मध्ये मुल झाल. त्या आधी ब-याच वेळा ट्रीटमेंट फेल सुद्धा गेल्या. पाण्यासारखा पैसा खर्च झाला. पहिल्या अपत्या नंतर आम्ही पुन्हा त्या डॉक्टरांकडून दुस-या अपत्या साठी ट्रीट मेंट घेतली पण या वेळेस मात्र अपयश आल. अस का ? "
अस का च उत्तर मी शोधल. गुरूच्या महादशेत त्यांना केतूची अंतर्दशा असताना पाहिलं अपत्य झाल.
केतू गुरूच्या युतीत, गुरु ३ १२, व गुरु शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र ४ ५ १० असा आहे. केतूच्या अंतर्दशेत शुक्र पंचमेश आहे. त्यामुळे पहिलं मुल झाल.
केतू नंतर एकही अंतर्दशा पंचमाची कारक नाही. त्यामुळे द्वितीय संततीस त्रास. आता शनीच्या महादशेत व केतुच्याच अंतर्दशेत त्यांना दुसरे अपत्य होईल. हि केतूची अंतर्दशा अजून दोन वर्षांनी येणार. त्यात शुक्रच कार्यरत, तो चतुर्थाचा मजबूत कार्येश त्यामुळे याहीवेळेस सहजा सहजी मुल होणार नाही हे नक्की. वैद्यकीय उपचार करावेच लागतील पण शुक्र पंचमेशही आहे त्यामुळे दुसर अपत्य होणारच.
वरील जंत्रीच अवलोकन करून मी त्यांना सांगितलं कि अजून दोन वर्ष संतती योग नाही. त्या म्हंटल्या अजून दोन वर्ष ? आधीच उशीर झालाय.
मी म्हंटल "ना इलाज को क्या इलाज. जर कोणी डॉक्टर ग्यारंटी घेत असेल तर उपचार चालू ठेवा."
त्या म्हंटल्या "कुठलाच डॉक्टर अशी ग्यारंटी घेत नाही. लाखो रुपये पाण्यात जाण्या पेक्षा एकदा नशिबात काय आहे ते बघून घ्याव म्हणून मी आले होते"
मी म्हंटल "जेंव्हा योग असतील त्याच वेळेस उपचार केले तर यश नक्की येईल, पैसाहि वाया जानार नाही, शारीरिक ,मानसिक त्रासातूनही सुटका "
त्या म्हंटल्या " तुम्ही म्हणता तेच योग्य अस अनुभवांती पटतय. दोन वर्ष थांबणेच योग्य राहील"
शुभ भवन्तु !
आपला
नानासाहेब
------------------------------------------------------------------------------------------------------
लेख आवडला तर लेखाच्या खाली असलेल्या Face book, Google+ चिन्हावर क्लिक करून शेअर करा.
Keywords to search this blog jotish, atrology, horoscope, bhavishya, kp, rashi, krishnamurti paddhati
------------------------------------------------------------------------------------------------------
लेख आवडला तर लेखाच्या खाली असलेल्या Face book, Google+ चिन्हावर क्लिक करून शेअर करा.
Keywords to search this blog jotish, atrology, horoscope, bhavishya, kp, rashi, krishnamurti paddhati
No comments:
Post a Comment