ऑफिसला जाण्याची तयारी करत होतो. इतक्यात माझे मित्र निंबाळकर आले.
म्हंटल "या निंबाळकर एव्हढ्या सकाळी सकाळी कस काय येण केल, काही विशेष ? "
ते म्हणाले "विशेष काही नाही द्राक्ष घेऊन आलो. वानोळा.".
चहा पाणी झाल्यानंतर आम्ही दोघेही निघालो. त्यांना सलूनमध्ये दाढी करायची होती व मला ऑफिसला जायचं होत. रस्त्याने चालता चालता ते बोलले "विहीरीच काम चालू आहे मळ्यात. विहिरीला पाणी लागल."
मी म्हंटल " अरे वा ! गुड न्यूज, अभिनंदन "
"विहिरीला पाणी लागेल का ? असा प्रश्न मी विचारला होता. आठवत का ?". निंबाळकर बोलले.
मला आठवेना. मी त्यांना विचारलं "मी काय उत्तर दिल होत.?"
"पाणी लागेल. काळजी करू नका."
ऑफिसला आल्या आल्या मी निंबाळकर यांची प्रश्नकुंडली उघडली व मी काय लिहील होत ते पाहिलं तसा मला त्या वेळचा प्रसंग आठवला.
"विहिरीला पाणी लागेल का ? " हा प्रश्न श्री विजय निंबाळकर यांनी २४ जानेवारी २०१२ ला सकाळी ११:३० वा. विचारला होता.
ते म्हणाले हा प्रश्न माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजकाल विहीर खोदण म्हणजे खूप खर्चिक काम झालय.
"जुनीच विहीर खाली खोदायची कि नवीन विहीर काढायची " मी विचारल
"नवीन "
हे ऐकल्यावर मी टोकन ची पिशवी त्यांच्या पुढे ठेवली. त्यांनी त्यातील १३७ नम्बरच टोकन काढल.
हा प्रश्न २४ जानेवारी २०१२ ला सकाळी ११:३० मी. विचारला होता.
मी के पी सिड घेतला वा प्रश्न कुंडली तयार केली. चंद्र चतुर्थात पाहिल्यानंतर प्रश्न अगदी मनापासून विचारला हे कळल.
ती प्रश्न कुंडली मी बाजूला दिली आहे. त्यावर टीचकी मारून ती मोठी करून पाहता येईल.
लाभाचा उप नक्षत्र स्वामी गुरु असून तो षष्टात, तृतीयेश तसेच गुरु केतूच्या नक्षत्रात. केतू अष्टमात. केतूवर कोणाचीही दृष्टी नाही, केतू चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र चतुर्थात व दशमेश, केतू शुक्राच्या राशीत, शुक्र चतुर्थात, लग्नेश.
चंद्र हा ग्रह जलतत्वाचा कारक आहे. शिवाय तो चतुर्थात आहे. चतुर्थ भावाचा जमीन, जागा इत्यादी संदर्भात प्रश्न पाहताना विचार केला जातो. याचा अर्थ लाभाचा उप नक्षत्र स्वामी गुरु चतुर्थाचा कारक आहे.
चतुर्थाचा उप नक्षत्र बुध ३ ९ १२ आहे, बुध रवीच्या नक्षत्रात, रवी ३ ११ आहे. म्हणजेच चतुर्थाचा उप नक्षत्र बुध लाभाचा कारक आहे.
मी हे सगळ विश्लेषण करून त्यांना सांगितलं कि अपेक्षित पाणी लागेल व चांगल जोरदार लागेल. काम चालू करा.
त्यानंतर आज जेंव्हा निंबाळकर भेटले तेंव्हा त्यांनी खुलासा केला. त्यांनी सांगितलं कि "तुम्ही सांगितलेल्या भविष्याचा आम्हाला एक चांगला अनुभव आला. अगदी २० फुटालाच १० फुट पाणी लागल. काळजी मिटली."
शुभम भवतु
आपला
नानासाहेब
No comments:
Post a Comment