Saturday, 10 March 2012

छाया ग्रहाचा खेळ जमवी लग्नाचा मेळ !

समोर बसलेला जातक जेंव्हा त्याच्या लग्नाची चिंता व्यक्त करत होता तेंव्हा मला आश्चर्यच वाटलं. अर्थात मला जे वाटलं तेच त्याच्याकडे पाहिल्यानंतर कुणालाही वाटलच असत. रुबाबदार देखणा तरुण, सरकारी भरपूर पगाराची नोकरी, लग्नाच्या आधीच स्वतःच्या मालकीचा मोठा बंगला, ४० लाखाची अद्ययावत कार, स्थावर जंगम वगैरे वगैरे आणि अस असूनही लग्न जमत नाही. मग आश्चर्य वाटणार नाहीतर काय ?

हा जातक  ऑक्टोबर २०११ मध्ये आला होता.  त्याची पत्रिका मी बाजूला दिलेली आहे. ती वाचकांना टिचकी मारून बघता येईल. गोपनियतेमुळे त्याच  नाव वगैरे  माहिती मी काढून टाकली आहे.    

जातकास  सध्या  शुक्राची  महादशा  सुरु असून  ती २०२२ पर्यंत आहे. तसेच  राहूची  अंतर्दशा  सुरु आहे. ती २००९ ते ०६.०३.२०१२ अशी आहे. त्यानंतर गुरूची अंतर्दशा ती नोव्हेंबर २०१४ पर्यंत 

शुक्र व्ययात  तृतीयेश  तसेच  दशमेश, शुक्र केतूच्या नक्षत्रात. केतू  चतुर्थात, केतूवर कुठल्याही ग्रहाची दृष्टी नाही, तो कुणाच्याही युतीत नाही. केतू शुक्राच्याच नक्षत्रात. केतू गुरूच्या राशीत, गुरु कुटुंब स्थानी, पंचमेश तसेच अष्टमेश, गुरु राहूच्या नक्षत्रात. राहू दशमात, राहू  गुरु व शनीच्या दृष्टीत, शनी लग्नेश, षष्टेष आणि सप्तमेश, शनी मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ कुटुंब  स्थानी, चतुर्थेश व लग्नेश, राहू बुधाच्या राशीत, बुध लग्नात, द्वितीयेश व लाभेश, बुध चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र सप्तमाचा मजबूत कार्येश तसेच व्ययेश.

वरील जंत्रीच अवलोकन करून मी त्याला सांगितले  कि " तुझे  यंदा  कर्तव्य  पूर्ण  होईल. काळजी  करू  नको "   तो म्हंटला "कधी होईल ते सांगा. जर योग नसेल तर उगाचच मुली बघत फिरण्यात काय अर्थ आहे. कारण प्रत्येक वेळेस असच होत. एकतर मला मुलगी पटत नाही किंवा मुलीवाले मला नापसंत करतात. " 

मी रुलिंग प्लानेट बघितले. रुलिंग मध्ये शुक्र लग्नाचा स्वामी व चंद्र नक्षत्र स्वामी गुरु. म्हणून रवी जेंव्हा शुक्राच्या नक्षत्रातून व गुरूच्या उप नक्षत्रातून भ्रमण करीन त्या दरम्यान लग्न होईल. मेषेत शुक्राचे नक्षत्र  २७ एप्रिल  ते ५ मे दरम्यान आहे. म्हणून मी त्याला सांगितले कि तुझे लग्न २७ एप्रिल ते ५ मे च्या आत होईल. 

त्यानंतर  काल  मला त्याचा फोन  आला. लग्न जमलय  व  24 एप्रिल २०१२ या  तारखेला   लग्न आहे. मी त्याच अभिनंदन केल व सहज त्याची पत्रिका उघडून पहिली. विचार केला, दोन  दिवस आधी लग्न होतंय. अस का बर ? 2७ ते ५ मे दरम्यान लग्न न होता २४ ला का होईल ? पत्रिकेत त्यावेळच रुलिंग होतच.  ते पाहिलं अन घोळ लक्षात आला.  रुलिंग मध्ये केतुही आहे. व केतूचे अश्विनी नक्षत्र १४ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान आहे.  रुलिंग मध्ये चंद्र राशी स्वामी शनी आहे. शनी या उप नक्षत्राची व्याप्ती ९:२० ते ११:२६ अंश आहे.  म्हणजेच 'रवी ज्या वेळी  केतूच्या नक्षत्रातून शनीच्या उप नक्षत्रात प्रवेश करीन त्या कालावधी मध्ये लग्न होईल. हा कालावधी २3 ते २5 एप्रिल असा आहे. आणखी पुढे जाऊन अस म्हणता येईल कि रवी जेंव्हा केतूच्या नक्षत्रातून शनीच्या उप नक्षत्रातून व शुक्राच्या उप उप नक्षत्रातून (शुक्राच्या  उप उप नक्षत्राची व्याप्ती १०:२६ अंश इतकी आहे)  भ्रमण करील त्या दिवशी म्हणजेच २४ एप्रिल २०१२ या तारखेला या तरुणाच लग्न होईल.    

एकूण काय तर पुन्हा एकदा ज्योतिष मार्तंड श्री कृष्णमुर्तिनी सांगितल्या प्रमाणे त्यांच्या 'छाया ग्रह हे इतर ग्रहांपेक्षा नेहमीच व जास्त बलवान असतात'  या नियमाच  प्रत्येंतर आल. 


शुभं भवन्तु !

आपला
नानासाहेब 

No comments: