!! श्री !!
नमस्कार मित्रानो !
दैवयोग, नियति काय प्रकार आहे याचा काहीना गंधही नसेल. ज्याचं सगळ आलबेल आहे, सिचुएशन अंडर कंट्रोल्ड आहे अश्या सो कॉल्ड लोकांना दैव, नियती वगैरे प्रकार म्हणजे कर्तुत्व शून्य लोकांनी निर्माण केलेली पळवाट आहे असे वाटते. अर्थात अश्या लोकांनाही कधी न कधी नियतीचा दणका बसतोच. असो.
काल सायंकाळी एक मध्यम वयीन जोडपं माझ्या कार्यालयात आले. मुलीची पत्रिका त्यांना जाणून घ्यायची होती. गेल्या वर्षा पूर्वी मुलीच लग्न अत्यंत थाटामाटात करून दिल होत. लग्नात मानपान, जेवणावळ, पाहुण्यांची सरबराई वगैरे वगैरे गोष्टी सर्व निट पार पाडल्या होत्या. तसच मुलीने सुखाने संसार करावा म्हणून समस्त नात्यागोत्याने भरभरून आशीर्वाद दिले होते.
वर्षभर संसार सुखाचा झाला. अन अचानक दृष्ट लागली................... सासरकडच्या मंडळीने सांगितले आम्ही मुलीला नांदवनार नाही........इतक्या दिवस गोडी गुलाबीने चाललेला संसार अचानक घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला.... काय घडल अस ?
अर्थात त्यांनी मला जे कारण सांगितलं ते मन सुन्न करणार होत. मुलीला अचानक काही कारण नसताना डायबीटीस डीटेक्ट झाला. हा आजार मूळीच अनुवांशिक नव्हता. आई वडिलांना त्यामुळे काही सुचेना. कारण या आजाराच गांभीर्य त्यांना माहित नव्हत. पण सासर कडच्या मंडळीने धमकी दिलेली कि मुलीला काही झाल तर आम्ही दवाखाण्यात घेऊन जाणार नाही. सासरकडच्या मंडळीनी अश्या पद्धतीने हातवर केल्यानंतर इलाजच खुंटला. ...... घटस्फोटा शिवाय पर्याय नव्हता.
आता पुढे काय ? त्या माता पित्या समोर गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मूळीच आरोग्य कस राहील तसेच तिच्या लग्नाचं काय वगैरे ?
पत्रिकेत गुप्ततेमुळे मुलीच नाव काढून टाकले आहे. पत्रिका बाजूला देलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल.
सध्या जातकास राहूची महादशा व बुधाची अंतर्दशा सुरु आहे. राहूची महादशा २०२१ पर्यंत कार्यरत आहे. तसेच बुधाची अंतर्दशा १६.०५.२०१४ पर्यंत. राहू अष्टमात, राहू रवीच्या नक्षत्रात, रवी सप्तमात, लग्नेश, राहू मंगळाच्या राशीत, मंगळ अष्टमात, नवमेश तसेच चतुर्थेश, मंगळ केतूच्या नक्षत्रात , केतू कुटुंब स्थानी, केतू मंगळाच्या दृष्टीत, मंगळ पुन्हा ८, ९, ४ तसेच केतू गुरूच्या नक्षत्रात, गुरु ५, ५ ८, केतू शुक्राच्या राशीत शुक्र ८, १०, ३ व शुक्र बुधाच्या नक्षत्रात, बुध ७, ११, २
वरील जंत्रीच्या अभ्यासावरून असे लक्षात येत कि वैवाहिक सौख्याचा कारक शुक्र व सुख स्थानाचा कारक ग्रह मंगळ अष्टमात राहुबरोबर. त्यामुळे वैवाहिक सौख्य बिघडलेले आहे. पण या एकमेव कारणास्तव घटस्फोट होणार नाही. कारण अश्या स्थितीत फार फार तर भांडण तंटा, शारीरिक. मानसिक त्रास वगैरे प्रकार होतात.
तरीही घटस्फोट झाला कारण या जातकाच्या पत्रिकेत पुनर्विवाहाचा योग आहे. भाव चलीत पत्रिका नीट बघा. सप्तमात बुध आहे. तसेच राहूच्या महादशेत तो कार्येश आहे. अंतर्दशाही बुधाचीच आहे. त्यामुळे पुनर्विवाहाचा योग याच दशेत आला. पुनर्विवाह तेंव्हाच होईल जेंव्हा आधीचे लग्न निकालात निघेल. इतर लोक याच कारण वर वर शोधतील, मुलीच्या सासरकडच्या मंडळीना जबाबदार धरतील. पण .... कारण काहीही असो कर्माचे भोग सुटत नाही. याला म्हणतात संचित. यावरच अवलंबून असत आपल प्रारब्ध... !
शुभं भवतु !
आपला
नानासाहेब
1 comment:
Nanasaheb Ashich mahiti det raha
Post a Comment