Saturday 14 September 2013

डिलीवरी नॉर्मल होईल का ?

नमस्कार मित्रानो

त्या दिवशी दुपारचा  एक वाजत आला तरी कार्यालयातच होतो. एका डॉक्टरच्या कुंडलीतील वैवाहिक सौख्य कसे आहे ते अभ्यासायच काम चालू होत. वैवाहिक सौख्य जवळपास संपल्यातच जमा होत. काही केल तरी किमान पाच वर्ष त्याला हा त्रास म्हणा जाच म्हणा हा राहणारच या निष्कर्षा पर्यंत मी आलो ..तोच प्रशांत आला. त्याच्याबरोबर त्याचा मित्र योगेश होता. 

म्हंटल "काही विशेष ? अचानक आलास ?"
"विशेष काही नाही . बायको डीलेवरी साठी माहेरी गेली आहे." प्रशांत  बोलला
"अरे ! मग विशेष नाही कसं ? अभिनंदन !"
"डॉक्टरांनी डिलिवरी ची 25 ऑगस्ट  ही तारीख दिली"
"बर ! मग ? काही अडचण आहे का ?" मला त्याच्या अशा अचानक येण्याने चिंता वाटली 
"नाही नाही … तसं काही काळजी करण्यासारखं नाही. सहज आलो "   तो घाईघाईत बोलला
"अरे नाही कस आज 20 तारीख आहे. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे अजून पाच दिवस अवकाश आहे. आणि तू माझ्याकडे आलायस तर नक्की काही तरी प्रश्न असणार. कारण माझ्याकडे विनाकारण सहसा कोणी येत नाही"   

"फक्त एव्हढंच विचारायचं की डिलीवरी नॉर्मल होईल का ? आणखी एक … " अस म्हणत तो जरा थांबला.
"आणखी काय ?"
"मुलगी होईल की मुलगा  ?.  "
"अरे काय तू पण …. आणखी पाच दिवस थांब … कळेलच की ……. "
"मुलगा मुलगी काहीही झाल तरी मला आनंदच होईल. फक्त शास्त्र काय म्हणतंय ते सांगा "
"ठीक आहे . " अस म्हणत मी रुलिंग घेतलं

निव्वळ रुलिंग वरून हा प्रश्न सोडवायचा मी ठरवलं. कारण दीड वाजत आला होता. पोटात काव काव सुरु झाली होती  

दिनांक 20. 8.2013    वेळ 1:30  pm

या वेळचं रुलिंग (R. P) असं होत
मंगळ - चंद्र - शनी - मंगळ

रुलिंग मध्ये मंगळाची दोनदा उपस्थिती पाहिल्यानंतर मुलगा की मुलगी या प्रश्नाच उत्तर कळल पण डिलिवरी ची तारीख चुकते कि काय ? कारण रुलिंग मधील शनीची उपस्थिती…

"प्रशांत !….  डॉक्टरांनी दिलेल्या तारखेला ही डिलिवरी होणार नाही. उशिरा होईल. उशिर झाला तर उगाच काळजी करायचं कारण नाही " मी त्याला आधी जे महत्वाच होत ते सांगितलं   
 
"किती उशीर होईल ?" त्याने विचारलं

"दोन चार दिवस होऊ शकतो "
"काय होईल ? मुलगा … मुलगी … ते नाही सांगितलं अजून "
"मुलगा होईल … पेढे दयायला विसरू नको " असं म्हणत मी उठलो.

2 सप्टेबर ला त्याचा फोन आला … मुलगा झाल्याच सांगितलं … डिलिवरीही   नॉर्मल झाली .  25  तारखेची 2 तारीख उगवली तब्बल 9 दिवस उशीर . शनीन आपला प्रताप दाखवलाच. तरीही दोनच तारीख का 30 का नाही 31 का नाही असा विचार हे लिहित असताना मनात  आला.
    
अभ्यासकांनी इथे जरा लक्ष दयाव.

25 -26  ला चंद्र मेषेत, रुलिंग मध्ये मंगळ आहे पण शनि  मुळे उशीर … म्हणून या दोनी तारखा सोडल्या पुढे चंद्र वृषभेत , नंतर 30 -31 मिथुनेत , एक तारखेला 17:37 नंतर कर्केत. चंद्र रुलिंग मध्ये नक्षत्र स्वामी म्हणून बलवान आहे. म्हणजेच एक तारखेला सायंकाळ नंतर ते दोन तारखेच्या रात्री 12 पर्यंत डिलिवरी व्हायला हवी व त्याच दरम्यान ती झाली.  
 
खात्री करण्यासाठी पंचांग उघडून बघा . रुलिंगचं (RP)  महत्व कळेल … !

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब