नमस्कार मित्रानो !
जून महिन्यात एक इ - पत्र आल. त्या पत्रात एका जाताकासंबंधी काही प्रश्न विचारले होते. त्यातला एक अत्यंत महत्वाचा प्रश्नच मी इथे घेत आहे. प्रश्न होता "ओपन हार्ट सर्जरी यशस्वी होईल का ?". या जातकाला लहानपणा पासून हृदयाचा त्रास होता. बाजूलाच ती कुंडली दिलेली आहे. कुंडलीवर टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल.
हा जातक गुजरातमधील आहे.हि एका तरुण स्रि जातकाची कुंडली आहे.
लग्नाचा उपनक्षत्र स्वामी बुध सहा , आठ , बाराचा बलवान कार्येश आहे. त्यामुळे जाताकास आरोग्याची साथ मिळणार नाही हे दिसून येते. षष्ठाचा उप नक्षत्र स्वामी शनि मंगळाच्या नक्षत्रात आहे व मंगळ सिंह राशीत आहे त्यामुळे हार्टशी संबंधी विकार झाला.
सध्या कुंडलीला शनीची महादशा सुरु आहे. शनि पंचमात, दशमेश व लाभेश आहे. शनि मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ पंचमात व सप्तमेश आहे. दशास्वामी पाच, अकराचा कार्येश आहे त्यामुळे या दशेत ऑपरेशन केल्यास जातक आजारातून पूर्ण बरा होईल हे नक्की.
जून महिन्यात कुंडलीस शुक्र अंतर्दशा सुरु होति. शुक्र अष्टमात व लग्नेश, शुक्र बुधाच्या उपनक्षत्रात, बुध षष्ठात, द्वितीयेश व तृतीयेश लागला त्यामुळे ही अंतर्दशा सोडावी लागली. ही ऑगस्ट पर्यंत होती.
पुढील अंतर्दशा रवीची होती. आता ती सुरु आहे. रवि सप्तमात व पंचमेश, रवि शनीच्या नक्षत्रात, शनि पंचमात, दशमेश व लाभेश. अंतर्दशा स्वामी रवि पाच, अकरा चा बलवान कार्येश आहे . म्हणून मी सप्टेबर च्या पहिल्या दहा दिवसात ऑपरेशन चा सल्ला दिला.
ठरल्याप्रमाणे या जातकाच्या बहिणीने तिला हॉस्पिटलात दाखल केल व अत्यंत क्लिष्ठ, अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. त्या आनंदाच्या भरात जातकाच्या बहिणीने मला ही बातमी फोनवर कळवली. आनंदाश्रू फोनमधून दिसत नसले तरी त्यांच्या भारावलेल्या आवाजातून नक्की जाणवत होते.
अर्थात याच श्रेय जात ते डॉक्टरांनाच. ज्यांनी अत्यंत कुशलतेने काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया पार पाडली तेच खरे या श्रेयाचे मानकरी.
शुभं भवतु !
आपला
नानासाहेब
2 comments:
व्यसनाधीन लोकांचे व्यसनाचे योग आसतात का ? काही विशिष्ठ ग्राहयोगामुळे व्यसनाची सवय लागते का ?
very nice analysis,
Post a Comment