Tuesday 25 October 2011

अभ्यंग स्नान

नमस्कार मित्रानो !

ब्लॉगच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या !

हि दिवाळी आपण सर्वांना सुखसमृद्धीची, भरभराटीची जावो !

अभ्यंग स्नान  

बुधवारी  म्हणजे उद्या पहाटे  ५.१६  नंतर अमावस्या सुरु होत आहे. अभ्यंग स्नान दिवाळीतील महत्वाचे स्नान आहे. जसं सिंहस्थात साधूंच शाही स्नान तसच आपलं नरक चतुर्थीच्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर केलेल्या अभ्यंग स्नानाला महत्व आहे .

उद्या ब्राह्म मुहूर्त पहाटे ४ वाजेचा आहे. या मुहूर्तावर जर आपण अभ्यंग स्नान केले तर आपण पुण्याचे वाटेकरी व्हाल . पुण्याचा लाभ होईल. 

अभ्यंग स्नान करून पहाटे ५.१६ च्या  आतच, घरातील तसेच जवळच्या मंदिरातील देवांना फराळाचा नैव्यद्य दाखवावा व त्यानंतरच  स्वत: फराळावर ताव  मारावा, तसेच आपले मित्र, स्नेही, आप्तेष्टांना फराळाचे आमंत्रण द्यावे.

आपला शुभेच्छुक 
नानासाहेब पाटील

Monday 24 October 2011

नोकरी बदलली ...

नमस्कार मित्रानो !

एक दिवस शरद आला. बहुतेक सुटीच होती  त्या दिवशी त्याला. जरा घरगुती गप्पा टप्पा झाल्यानंतर त्यान मुख्य विषयाला हात घातला 
म्हंटला 'मला नोकरीत स्थैर्य कधी आहे ते बघ. सध्या जी नोकरी करतोय ती नकोशी झालीय. दुस-या नोकरीचे काही चान्सेस आहेत का तेही सांग.'

म्हंटल ठीक आहे. काढ टोकन. त्याने १७ नंबरच टोकन काढलं. त्याची जन्म तारीख नक्की नसल्यामुळे प्रश्न कुंडली काढावी लागली. ती कुंडली बाजूला दिली आहे. टिचकी मारून ती बघता येईल. 

प्रश्न कुंडली प्रमाणे षष्टाचा उप नक्षत्र स्वामी शनी असून तो चंद्राच्या नक्षत्रात आहे. शनी षष्टात असून दशमेश व लाभेशही आहे. शनी चंद्राच्या माध्यमातून फळे देणार. चंद्र द्वितीयात असून लाभेश आहे.  म्हणजेच नोकरीला मरण नाही.


पत्रिकेला मंगळ महादशा चालू आहे मंगळ २ ८ १ असा आहे व मंगळ बुधाच्या नक्षत्रात आहे. बुध ४  ६  ३ लागलाय.  बुध षष्टात असल्यामुळे नोकरीत बदल होणार हे निश्चित. तसेच  पालेभाज्या, लहान आकाराची फळे या माध्यमातून धनार्जन. त्याला हे सांगितलं  तस तो काही बोलला नाही. त्याला म्हंटल ह्या पंधरा दिवसात तुझी नोकरी बदलणार. 

त्यानंतर आठ दहा दिवसांनी त्याचा फोन आला. म्हंटला  'नोकरी बदलली. पिंपळगाव च्या आडतवर नोकरी सुरु केली आहे. 

ब-याच वाचकांना आडत म्हणजे काय हे माहित नसेल. आडत म्हणजे जिथे शेतकरी आपला शेती माल दलाला मार्फत व्यापा-यांना विकतात ती कंपनी. 

शेवटी महत्वाच काय तर टोम्याटो, द्राक्ष, भाजीपाल्याचा व्यापार करणा-या ठिकाणीच शरदला नोकरी लागली. 
धन्यवाद !


आपला 
नानासाहेब पाटील




Monday 3 October 2011

मुलगा कि मुलगी ?

माझा मित्र प्रकाश चौधरी यांचा आपल्या शास्त्रावर चांगलाच विश्वास बसलेला होता. कारण यापूर्वी त्यांना तसा अनुभव येऊन शास्त्राची सत्यता पटली होती. मी त्याला विचारलं ' काय रे काही विशेष ?'  तो म्हंटला 'बायको डिलिवरी साठी माहेरी गेली. काय होईल? काळजी वाटते म्हणून आलो. 

मी विचारलं 'डॉक्टरने कुठली तारीख सांगितली ?' तो म्हंटला  '२२.०९.२०११'
मी लगेच Ruling planet  घेतलं.  

L: शनी 
S: मंगल 
R:  बुध 
D: बुध 

रुलिंग मध्ये शनी आला म्हणून मी त्याला सांगितलं कि २२.०९.२०११ या तारखेला डिलिवरी होणार नाही.उशीर होईल. 

तो म्हंटला मला दिवस सांग. 

मी तो दिवस काढला व त्याला सांगितलं कि २४.०९.२०११ तारखेला  शनिवारी डिलिवरी होईल. नॉर्मल डिलिवरी होणार नाही काळजी घावी लागेल. डिलिवरीच्या वेळेस क्रिटीकल सिचुएशन येऊ शकते. 

तो म्हंटला ' ठीक आहे. आता हे सांगा सर कि मुलगा होईल कि मुलगी ? '

अवघड जागीचं दुखन म्हणतात ते हेच. त्याला म्हटलं कि मुलगा किंवा मुलगी काही झालं तरी काय फरक पडतो. 

तो म्हंटला ' मला काही फरक पडत नाही फक्त उत्सुकता म्हणून विचारतो.'     

मी रुलिंगच्या प्रश्न कुंडलीत  बघितलं पंचमाचा उप नक्षत्रस्वामी मंगळ भाग्यात. 

त्याला म्हटलं 'विष्णू डेअरीत पेढे काय किलो मिळतात.?' 

'का रे ?'

'अरे मुलगा झाल्यानंतर पेढे वाटतात आपल्याकडे ?'

'काय सांगतोस ? खरच का? '

'झाल्यावर सांग ' मी त्याला तसं सांगितलं.
काय झाल असेल ? वाचकांच्या मनात कदाचित प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही. मीही जास्त न ताणता त्यांची उत्सुकता शमवतो. 

प्रकाशचा मला २५.०९.२०११ ला सकाळी सकाळी फोन आला. 

म्हटला 'तू सांगितलं तसच झाल. २४ तारखेच्या शनिवारीच डिलिवरी झाली. चार टाके पडले. आणि मुलगाच झाला'.

त्याच्या फोनने  मलाही आनंदच झाला. मी मनातल्या मनात माझे मानस गुरुवर्य सोतीधामानन  श्री कृष्णमुर्ती यांना नमस्कार केला व त्यांनी किती  अचूक संशोधन करून ठेवलं  याच नेहमी प्रमाणे आजही विस्मय वाटला.


आपला 
नानासाहेब पाटील