Wednesday 25 September 2013

ओपन हार्ट सर्जरी यशस्वी होईल का ?

नमस्कार मित्रानो !

जून महिन्यात एक इ - पत्र आल.  त्या पत्रात एका जाताकासंबंधी काही प्रश्न विचारले होते.  त्यातला एक अत्यंत महत्वाचा प्रश्नच मी इथे घेत आहे. प्रश्न होता "ओपन हार्ट सर्जरी यशस्वी होईल का ?". या जातकाला लहानपणा पासून हृदयाचा त्रास होता.  बाजूलाच ती कुंडली दिलेली आहे. कुंडलीवर टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. 


हा जातक गुजरातमधील आहे.हि एका तरुण स्रि जातकाची कुंडली आहे. 

लग्नाचा उपनक्षत्र स्वामी बुध सहा , आठ , बाराचा बलवान कार्येश आहे. त्यामुळे जाताकास आरोग्याची साथ मिळणार नाही हे दिसून येते. षष्ठाचा उप नक्षत्र स्वामी शनि मंगळाच्या नक्षत्रात आहे व मंगळ सिंह राशीत आहे त्यामुळे हार्टशी संबंधी विकार झाला.  

सध्या कुंडलीला शनीची महादशा सुरु आहे. शनि पंचमात, दशमेश  व लाभेश आहे. शनि मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ पंचमात व सप्तमेश आहे. दशास्वामी पाच, अकराचा कार्येश आहे त्यामुळे या दशेत ऑपरेशन केल्यास जातक आजारातून  पूर्ण बरा होईल हे नक्की. 

जून महिन्यात कुंडलीस शुक्र अंतर्दशा सुरु होति. शुक्र अष्टमात व लग्नेश, शुक्र बुधाच्या उपनक्षत्रात, बुध षष्ठात, द्वितीयेश व तृतीयेश लागला त्यामुळे  ही अंतर्दशा सोडावी लागली. ही ऑगस्ट पर्यंत होती. 

पुढील अंतर्दशा रवीची होती. आता ती सुरु आहे. रवि सप्तमात व पंचमेश, रवि शनीच्या नक्षत्रात, शनि पंचमात, दशमेश व लाभेश. अंतर्दशा स्वामी रवि पाच, अकरा चा बलवान कार्येश आहे . म्हणून मी सप्टेबर च्या पहिल्या दहा दिवसात ऑपरेशन चा सल्ला दिला.     

ठरल्याप्रमाणे  या जातकाच्या बहिणीने तिला हॉस्पिटलात दाखल केल व अत्यंत क्लिष्ठ, अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. त्या आनंदाच्या भरात जातकाच्या बहिणीने मला ही बातमी फोनवर कळवली.  आनंदाश्रू फोनमधून दिसत नसले तरी त्यांच्या भारावलेल्या आवाजातून नक्की जाणवत होते. 

अर्थात याच श्रेय जात ते डॉक्टरांनाच.  ज्यांनी अत्यंत कुशलतेने काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया पार पाडली तेच खरे या श्रेयाचे मानकरी. 

शुभं भवतु !

आपला 
नानासाहेब 

Saturday 14 September 2013

डिलीवरी नॉर्मल होईल का ?

नमस्कार मित्रानो

त्या दिवशी दुपारचा  एक वाजत आला तरी कार्यालयातच होतो. एका डॉक्टरच्या कुंडलीतील वैवाहिक सौख्य कसे आहे ते अभ्यासायच काम चालू होत. वैवाहिक सौख्य जवळपास संपल्यातच जमा होत. काही केल तरी किमान पाच वर्ष त्याला हा त्रास म्हणा जाच म्हणा हा राहणारच या निष्कर्षा पर्यंत मी आलो ..तोच प्रशांत आला. त्याच्याबरोबर त्याचा मित्र योगेश होता. 

म्हंटल "काही विशेष ? अचानक आलास ?"
"विशेष काही नाही . बायको डीलेवरी साठी माहेरी गेली आहे." प्रशांत  बोलला
"अरे ! मग विशेष नाही कसं ? अभिनंदन !"
"डॉक्टरांनी डिलिवरी ची 25 ऑगस्ट  ही तारीख दिली"
"बर ! मग ? काही अडचण आहे का ?" मला त्याच्या अशा अचानक येण्याने चिंता वाटली 
"नाही नाही … तसं काही काळजी करण्यासारखं नाही. सहज आलो "   तो घाईघाईत बोलला
"अरे नाही कस आज 20 तारीख आहे. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे अजून पाच दिवस अवकाश आहे. आणि तू माझ्याकडे आलायस तर नक्की काही तरी प्रश्न असणार. कारण माझ्याकडे विनाकारण सहसा कोणी येत नाही"   

"फक्त एव्हढंच विचारायचं की डिलीवरी नॉर्मल होईल का ? आणखी एक … " अस म्हणत तो जरा थांबला.
"आणखी काय ?"
"मुलगी होईल की मुलगा  ?.  "
"अरे काय तू पण …. आणखी पाच दिवस थांब … कळेलच की ……. "
"मुलगा मुलगी काहीही झाल तरी मला आनंदच होईल. फक्त शास्त्र काय म्हणतंय ते सांगा "
"ठीक आहे . " अस म्हणत मी रुलिंग घेतलं

निव्वळ रुलिंग वरून हा प्रश्न सोडवायचा मी ठरवलं. कारण दीड वाजत आला होता. पोटात काव काव सुरु झाली होती  

दिनांक 20. 8.2013    वेळ 1:30  pm

या वेळचं रुलिंग (R. P) असं होत
मंगळ - चंद्र - शनी - मंगळ

रुलिंग मध्ये मंगळाची दोनदा उपस्थिती पाहिल्यानंतर मुलगा की मुलगी या प्रश्नाच उत्तर कळल पण डिलिवरी ची तारीख चुकते कि काय ? कारण रुलिंग मधील शनीची उपस्थिती…

"प्रशांत !….  डॉक्टरांनी दिलेल्या तारखेला ही डिलिवरी होणार नाही. उशिरा होईल. उशिर झाला तर उगाच काळजी करायचं कारण नाही " मी त्याला आधी जे महत्वाच होत ते सांगितलं   
 
"किती उशीर होईल ?" त्याने विचारलं

"दोन चार दिवस होऊ शकतो "
"काय होईल ? मुलगा … मुलगी … ते नाही सांगितलं अजून "
"मुलगा होईल … पेढे दयायला विसरू नको " असं म्हणत मी उठलो.

2 सप्टेबर ला त्याचा फोन आला … मुलगा झाल्याच सांगितलं … डिलिवरीही   नॉर्मल झाली .  25  तारखेची 2 तारीख उगवली तब्बल 9 दिवस उशीर . शनीन आपला प्रताप दाखवलाच. तरीही दोनच तारीख का 30 का नाही 31 का नाही असा विचार हे लिहित असताना मनात  आला.
    
अभ्यासकांनी इथे जरा लक्ष दयाव.

25 -26  ला चंद्र मेषेत, रुलिंग मध्ये मंगळ आहे पण शनि  मुळे उशीर … म्हणून या दोनी तारखा सोडल्या पुढे चंद्र वृषभेत , नंतर 30 -31 मिथुनेत , एक तारखेला 17:37 नंतर कर्केत. चंद्र रुलिंग मध्ये नक्षत्र स्वामी म्हणून बलवान आहे. म्हणजेच एक तारखेला सायंकाळ नंतर ते दोन तारखेच्या रात्री 12 पर्यंत डिलिवरी व्हायला हवी व त्याच दरम्यान ती झाली.  
 
खात्री करण्यासाठी पंचांग उघडून बघा . रुलिंगचं (RP)  महत्व कळेल … !

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब
             

Tuesday 14 May 2013

घटस्फोटाची गोष्ट


 ॥ श्री ॥ 

नमस्कार मित्रहो !

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे दुपारी जेवण झाल कि सुस्ती यायला लागते. वाटत घरी जाव अन मस्त झोप काढावी. पण ऑफिसला फक्त शनिवारी सुट्टी असते. त्यामुळे असले विचार डोक्यात येवूनही उपयोग नाही.     

आजही तसच झाल. दुपारच्या वेळी संगणकावर एका कुंडलीचा अभ्यास करत होतो. स्क्रिनकडे एकटक बघून बघून डोळे तारवटायला लागले होते पण कुंडली सुटत नसल्यामुळे कामही थांबवता येत नव्हत. पेंग यायला लागली तस उठलो ते तडक अन्सारच्या हॉटेलात. म्हंटल चहाही घेण होईल, सुस्तीही जाईल आणि पायही मोकळे होतील.

चहा घेत असतांनाच फोन आला "गुरुजी नमस्कार ! मी अमुक अमुक  …………. "

म्हंटल "बोला … बोला " मला काहीजण गुरुजी म्हणतात तर काही लोक सर म्हणतात.

"मुलाची कुंडली मेल केलीय. आमच्या मुलीची कुंडली तुमच्याकडे आहेच तर तेव्हढ जमत का बघा "

"ओके ! बघतो. पण तुमच्या मुलीची कोर्टात केस चालू होती त्याच काय झाल ? घटस्फोट मिळाला का ?"  

"हो .. हो .. मिळाला "

"ठीक आहे " अस म्हणत मी उरलेला चहा संपवला पण लगेच न उठता पाचेक मिनिटे डोळ्यांना विश्रांती म्हणून उगाचच दूर पाहत बसलो. (डोळ्यांचे डॉक्टर सांगतात दर वीस मिनिटांनी डोळ्यांना आराम दया.. दूरवर बघा, हिरवळीकडे किंवा हिरवे निसर्गचित्र बघा ..वगैरे  )

ऑफिसला येताच आधी त्या मुलीची कुंडली उघडली ..... 

२०११ ला या मुलीच्या घरच्यांनी मला तिची कुंडली दाखवली होती. त्यावेळी मी कुंडलीची दशा बघून सांगितलं  होत कि कुंडलीत वैवाहिक सौख्य अल्प आहे, त्रासदायक आहे, काळजी घ्या. कदाचित घटस्फोट होऊ शकतो.

यावर त्यावेळी तिच्या घरच्यांनी जी माहिती दिली होती ती अशी ….

मुलीच उच्च शिक्षण  झालं. योग्यवेळ येताच तीच लग्न झाल आणि दोनच महिन्यात मुलगी घरी आली ती पुन्हा कधीही सासरी न जाण्यासाठीच.   

काय घडल असेल ? अभ्यासकांसाठी कुंडली बाजूला देत आहे. तसेच कोर्स च्या विध्यार्थ्यानी सुद्धा या कुंडली चा अभ्यास करावा.

जातकास सध्या राहू दशा आहे ती २०२० पर्यंत.

राहू षष्ठात, बुधाच्या दृष्टीत, बुध ;लग्नात, अष्ठमेश व लाभेश, बुध शनीच्या नक्षत्रात, शनि व्ययात, तृतीयेश व चतुर्थेश तसेच राहू रवीच्या नक्षत्रात, रवि व्ययात व दशमेश, राहू शुक्राच्या राशीत, शुक्र लग्नात, सप्तमेश व व्ययेश, शुक्र केतूच्या नक्षत्रात केतू व्ययात.           


राहू दशास्वामी कुठल्याही प्रतीने वैवाहिक सौख्याचा बलवान कार्येश होत  नसून वैवाहिक सौख्य संपविण्याचाच बलवान कार्येश झाला आहे. 

दशा कालावधी संपायला तब्बल नऊ ते दहा वर्ष बाकी. हा कालावधी वैवाहिक सौख्यास वाईटच जाणार. दुसर लग्न करा किंवा तिसर करा…. काही फरक पडणार नाही फक्त दगडापेक्षा वीट मऊ अस होईल. 

या कुंडलीचा सप्तमाचा सब लॉर्ड बुध ;लग्नात वृश्चिक राशीत, शनीच्या नक्षत्रात व शनि व्ययात तूळ राशीत त्यामुळे जोडीदार हा शरीर सौख्याची इच्छा असली तरी उपभोग न घेऊ शकणारा, अतृप्त किंवा नपुंसक मिळतो. आणि याच कारणामुळे मुलगी दोन महिन्यातच घरी आली…. ती कायमची …पुन्हा कधीही  न जाण्यासाठी.  

दशा स्वामी राहू ३, ८, ११ व  १२   चा कार्येश असल्यामुळे घटस्फोट झाला.

आता दुस-या लग्नासाठी स्थळ पाहण्यास सुरुवात झाली आहे. मग दुसरा विवाह होईल का ? … तर नक्की होणार कारण सप्तमाचा सब लॉर्ड बुधच आहे शिवाय  दशास्वामी दुस-या विवाहासाठी आवश्यक म्हणून लाभेश आहे त्याच बरोबर  अष्टम भावाचाही कार्येश आहे. त्यामुळे दुसरा विवाह होणार हे नक्की.

पहिला विवाह वरील कारणाने संपुष्ठात आला. ठीक आहे झाल गेल गंगेला मिळाल. पण या मुलीचा दुसरा विवाह सुद्धा संपुष्टात येणार आहे …… काय कारण असेल बर ..... तुम्हीच ओळखा … !

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब 

Thursday 21 March 2013

कृष्णमुर्ती पद्धती अभ्यासक्रम

।। श्री ।।

मित्रहो !

११ एप्रिल २०१३ पासून कृष्णमुर्ती पद्धती Course सुरु करत आहोत.

ज्यांना इच्छा असेल त्यांना हा अभ्यास Distance Learning Method ने करता येणार आहे.

Course Fee  व  इतर माहिती करिता संपर्क साधावा.

संपर्क : nanasaheb@mail.com     nanasaheb.kp@gmail.com

भ्रमणध्वनी : ९०४९०७९२६४

Friday 1 March 2013

ना घर है S S ! ना ठिकाना S S S ! युंही चलते S जाना रे ...

                                                                           ।। श्री ।।

नमस्कार मित्रानो !

आमच्या कामात अनेक वेगवेगळे अनुभव येत असतात. प्रत्येक कुंडली हि नवीन, वैशिष्ठ पूर्ण असते.  काही  विस्मयकारक, विशेष घटना असली कि ती लिहावी अस मला वाटत. म्हणून हा लेखन प्रपंच.

काही दिवसांपूर्वी आमच्या बंधूंच्या मित्राचा फोन आला. त्याच्या कंपनीतील त्याचे वरिष्ठ अधिकारी येणार आहेत. त्याचं  काही महत्वाच काम आहे तर त्यांना तातडीने भेटीची वेळ हवी आहे. म्हंटल  ठीक आहे. दुपारी १ नंतर या. बरोबर वेळेवर बंधू मित्र व त्याचे वरिष्ठ अधिकारी आलेत. त्यांच्या सोबत आणखी दोघेजण. त्यातला एक केरळी किंवा आपल्या भाषेत दक्षिणात्य वाटत होता.

साहेबांची कुंडली बघून त्यांना सविस्तर माहिती वगैरे दिली. साहेब मुस्लिम समाजाचे होते. त्यांचा या शास्त्रावर नुसताच विश्वास नव्हता तर अभ्यासही होता. तस या आधीही मुस्लिम समाजाचे बरेच लोक माझे जातक आहेत. ग्रहांचा परिणाम हा  कुठल्याही  जाती , धर्मानुसार वेगवेगळा नसतो.  तासाभराने ते गेलेत. त्यांच्या सोबत जे इतर दोघेजण आले होते त्यांच्या पैकी एकाचा दुस-या दिवशी फोन आला कि आम्हाला आज वेळ द्या आमचेही काही प्रश्न आहेत. म्हंटल ठीक आहे या.

सोबत बाजूला जी कुंडली दिलेली आहे ती त्यावर क्लिक करताच मोठी होईल. गोपानियतेमुळे जातकाचे नाव वगैरे डीटेल्स काढून टाकलेत. 

सध्या या कुंडलीस बुधाची महादशा सुरु आहे. हि दशा २००७ ते २०२४ पर्यंत कार्यरत राहील.  बुध तृतीयात, चतुर्थेश व लग्नेश, बुध रवीच्या नक्षत्रात रवि तृतीयात व तृतीयेश.

सध्या या गृहस्थाच वय ५० च्या आसपास. दशास्वामी २०२४ पर्यंत तृतीय भावाचा मजबूत कार्येश. २०२४ साली या गृहस्थाच वय ६० असेल. तो पर्यंत हि व्यक्ती घरा पासून दूरच राहणार. मी त्यांना तसं म्हणताच त्या व्यक्तीने जे सांगितल ते अस.....

हि व्यक्ती कारखानदार होती. २०० ते २५० कामगार त्याच्या कारखान्यात काम करायची. भरपूर  पैसा मिळत होता. बंगला, गाडी, नोकर, चाकर वगैरे वगैरे सर्व गोष्टी...... ज्याला ऐश्वर्य म्हणतात असं सगळ होत. .....अचानक दृष्ट लागली....होत्याच नव्हत झाल.... आणि दिल्ली सोडून महाराष्ट्रात  याव लागल .... देशोधडीला लागण यालाच म्हणतात..... अचानक काही घडत नाही. ग्रह दशा आधीच हे सगळ सांगतात... हे सगळ का घडलं कसं घडलं हि सगळी चर्चा मी त्याच्याशी केली. मुख्य मुद्धा हे सगळ का घडलं हे सांगायचं नसून सध्या हि व्यक्ती घरा पासून दूर राहणार. घराच सुख याला मिळणार नाही.

मग हि व्यक्ती मला म्हंटली कि "व्यवसायात मुलाला मदतीला घेवू का ?". म्हंटल त्याची कुंडली बघितल्याशिवाय सांगता येणार नाही. म्हंटला "देखो" !


मी मराठीत लिहितोय पण प्रत्येक्ष  चर्चा हिंदीत चालू होती. हिंदीत सलग तीन तास बोललो तर अक्षरश: तोंड दुखायला लागत हा अनुभव मला नवा होता.

मुलाची कुंडली बाजूला दिलीय. 
त्याची गुरु महादशा २००७ ते २०२३ पर्यंत कार्येश. गुरु तृतीयात, दशमेश, गुरु   चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र व्ययात व षष्टेश.

हि जंत्री पाहून मी त्या जाताकास प्रश्न विचारला "हा मुलगा सुद्धा घरापासून दूरच आहे का व आयटी, कॉल सेंटर किंवा इ मार्केटिंग करतो का ? ".

यावर तो म्हंटला " हो ! तो नोकरी निमित्ताने हरियानात आहे व कॉल सेंटर मध्ये नोकरी करतो ."

"याला व्यवसायात आणू नका. हा नोकरीतच योग्य आहे" मी त्याची दशा पाहून सांगितलं

यावर तो म्हंटला "माझ्या लहान मुलाची कुंडली बघा. तो बी.टेक  करतोय. त्याची काय ग्रहदशा ते तरी कळू देत. "

मग मी त्याच्या लहान मुलाची कुंडली संघानाकावर छापली. ती बाजूलाच दिलेली आहे.
 
सध्या या मुलास शुक्राची महादशा सुरु आहे. हि दशा २०३२ पर्यंत कार्यरत राहील.

शुक्र द्वितीयात, तृतीयेश व दशमेश आहे. शुक्र रवीच्या नक्षत्रात रवि तृतीयात व लग्नेश आहे.

मी म्हंटल "तुमचा हा मुलगासुद्धा तुमच्या जवळ नाही का ?"

तर तो म्हंटला "तो कर्नाटकात इंजिनीअरिंग कॉलेजला आहे ".

हे ऐकून त्याने काही प्रश्न विचारण्या ऐवजी मीच त्यांना प्रश्न केला"तुमची बायको तरी तुमच्या बरोबर आहे का? "
तर यावर त्याच उत्तर ऐकून "तुका झालासी कळस  ऐवजी  'तृतीया' झालासी कळस" असंच म्हणावसं वाटल.

त्याची बायको उत्तर प्रदेश मध्ये घरी आहे. घरात चार सदस्य . एक महाराष्ट्रात, दुसरा हरियानात, तिसरा कर्नाटकात व चौथा उत्तरप्रदेश. चौघे चार वेगवेगळ्या राज्यात. 


जाता जाता शेवटी त्याने मला विचारल "तुम्ही म्हणता त्या प्रमाणे मी मुलाला इकडे व्यवसायात आणणार नाही. पण आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र कधी राहू कि नाही?"

"तुम्ही फक्त दिवाळी दसरा अस सणासुदीलाच एकत्र येणार. कायमचे एकत्र राहू शकणार नाही."

 तिन्ही कुंडल्या मध्ये तीन, बारा मजबूत लागलेत म्हंटल्यावर मी आणखी काय सांगणार

"ठीक है जी. भगवान कि यही मर्जी है तो उसमे हमे परेशान होणे कि जुरुरत नही है !"
अस म्हणून त्यान नियतीचा कौल मान्य केला व मी कृष्णामुर्तीना सलाम.

तो गृहस्थ केबिन च्या बाहेर पडला, त्याच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत असतांनाच मनाच्या पटलावर गाण उमटलं

ना घर  है S S ! ना ठिकाना S S S ! युंही चलते S जाना रे  .

शुभं भवतु !
 
आपला
नानासाहेब

Wednesday 6 February 2013

झट मंगनी पट ब्याह......

।। श्री ।।


नमस्कार मित्रानो !

काही कुंडल्यांमध्ये झट मंगनी पट ब्याह टाईपचे योग असतात.अगदी महिन्या दोन महिन्यात लग्न. एका जातकाच्या मेव्हणीची हि कुंडली. हा जातक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आला होता.

सप्तमाचा उप नक्षत्र स्वामी गुरु आहे. गुरु  अष्ठमात , द्वितीयेश व पंचमेश , गुरु शनीच्या नक्षत्रात, शनि कुटुंब स्थानी ,तृतीयेश व  चतृर्थेश.

सप्तमाचा  उ.न.स्वामी गुरु सहा, बारा या विवाह विरोधी भावांचा कार्येश नाही तसेच सध्या महादशा  गुरूचीच चालू आहे. हि दशा २०२४ पर्यंत आहे. नंतर पुढील  येणारी महादशा शनिची आहे. शनि महादशा २०४३ पर्यंत कार्येश आहे. शनि द्वितीयात, तृतीयेश व चतुर्थेश तसेच शनि चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र लाभात, नवमेश

त्यामुळे वैवाहिक, कौटुंबिक सौख्य उत्तम राहणार यात काही शंकाच नाही.    

गुरु महादशेत बुधाची अंतर्दशा सुरु आहे. बुध पंचमात, अष्टमेष, लाभेश आहे. तसेच बुध शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र अष्टमात, व्ययेश,  व सप्तमेश आहे.

बुध अंतर्दशा २०१५ पर्यंत कार्येश आहे. मग लग्न नक्की कधी होणार ? मग मी विदशा  निवडली, सध्या बुध अंतर्दशेत बुधाचीच विदशा  सुरु आहे.  रुलिंग मध्ये  बुध दोनदा आलेला नाही. त्यामुळे बुधाच्या पूढची केतूची विदशा निवडली 

केतू अष्टमात, गुरूच्या नक्षत्रात, गुरु वरील प्रमाणे कुटुंब स्थानाचा  कार्येश. 

केतूची विदशा १५  मार्च  २०१३ ते ३ मे २०१३ पर्यंत आहे. मी त्या जातकाला सांगितलं कि या मुलीचा विवाह १५ मार्च ते ३ मे २०१३ या दरम्यान होईल.

त्यानंतर तो जातक काही दिवसांनी त्याच्या बहिणीची कुंडली घेऊन आला त्यावेळी त्याने सांगितलं कि माझ्या मेव्हणीच लग्न जमलं व  ३ मे २०१३ हि  लग्नाची तारीख ठरली. 

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब 


 


Wednesday 23 January 2013

व्यवसायात झटका कोटीचा फटका ?

।। श्री ।। 

 नमस्कार मित्रानो  !

बाजूला ज्याची   कुंडली दिलेली आहे त्या व्यक्तीला तो जो नवीन व्यवसाय सुरु करू इच्छित होता त्याबद्दल  मार्गदर्शन हव होत.त्या कुंडलीवर क्लिक करताच ती वाचण्या योग्य मोठी होईल.


सध्या कुंडलीला  गुरूची महादशा व बुधाची अंतर्दशा सुरु आहे. महादशा २००७ ते २०२३ पर्यंत आहे व बुध अंतर्दशा -  मे २०१४ पर्यंत आहे. नंतर केतूची अंतर्दशा  लागेल .

गुरु अष्ठ्मात, चतुर्थेश आहे, गुरु केतूच्या नक्षत्रात, केतू दशमात, केतूवर  शनीची दृष्टी चतुर्थात, द्वितीयेश व तृतीयेश, शनि बुधाच्या नक्षत्रात, बुध तृतीयात व दशमेश आहे. तसेच केतू राविच्याही दृष्टीत आहे. रवि चतुर्थात व नवमेश, रवि बुधाच्या नक्षत्रात व बुध वरील प्रमाणे कार्येश. केतू  मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ  पंचमात,  व्ययेश व लग्नेश आहे. केतू बुधाच्या राशीत बुध वरील प्रमाणे कार्येश व बुध गुरूच्या नक्षत्रात, गुरु अष्ठमात व चतुर्थेश.

वरील जंत्री खालील प्रमाणे कार्येश होईल.

गुरु ८   ४                 नक्षत्रस्वामी केतू  १०  
दृष्टी शनि ४  २  ३     नक्षत्रस्वामी बुध ३  १०
दृष्टी रवि ४  ९           नक्षत्रस्वामी बुध ३  १० 
नक्षत्रस्वामी  मंगळ ५  १२  १
राशीस्वामी बुध ३  १० नक्षत्रस्वामी गुरु ८  ४

मित्रानो  हि कुंडली  एका बांधकाम व्यवसायकाची आहे. केतू वर शनीची दृष्टी  असून शनि चतुर्थात आहे. तसेच तो बुधाच्या नक्षत्रात, बुध ३ १० चा बलवान कार्येश, त्यामुळे कष्टमर चिकार, अनेक  "Flat system" चे प्रोजेक्ट त्याने यशस्वी केलेत.

आपण  अस म्हणू कि गुरु च्या दशेत त्याला यश मिळाल, चांगला पैसा मिळाला कारण आजच्या काळात तृतीय भाव सर्वात जास्त पैसा मिळवून देणारा भाव आहे.  पूर्वीच्या काळी तृतीय भावाला फारशी किमत  नव्हती पण आज  मात्र तृतीय भाव फॉर्म  मध्ये आहे. असो !

गुरु जसा ३, १० चा बलवान कार्येश आहे तसाच तो ५, १२, ८ चा सुध्दा मजबूत कार्येश आहे. आता पाच, बारा, आठ लागल्यानंतर भल्या भल्यांची  कशी वाट लागते हे   के. पी. च्या अभ्यासकांना माहित आहे.  भले मग तो कितीही शहाणा असो.

सध्या  बुधाची अंतर्दशा चांगली जात आहे कारण बुधाचा  उपनक्षत्र स्वामी शुक्र  ६,  ७,  ११ चा कार्येश आहे. त्यामुळे आणखी एक नवीन व्यवसाय करण्याची इच्छा निर्माण  झाली. पण बुध अंतर्दशा कितीही चांगली असली तरी पुढे येणारी केतूची अंतर्दशा त्याच नुकसान करणार कारण केतू ५,  १२,  ८ चा बलवान कार्येश होणार आहे.

पुढे येणारी केतूची  अंतर्दशा खरच नुकसान करणार का ? याची खात्री करण्यासाठी मी गुरु महादशेवर लक्ष केंद्रित केल. गुरु महादशा २००७ ला सुरु झाली, गुरु केतूच्या नक्षत्रात आहे म्हणजेच गुरूची दशा लागल्या लागल्या या व्यक्तीला जबरदस्त नुकसान झाले असेल यात काही शंका नाही.? 

मग मी त्या बिल्डरला विचारल "२००७ ते २००९ या काळात तुम्हची काही आर्थिक  हानी झाली का ?"  

तर तो  म्हंटला "माज्या आजवरच्या आयुष्यात सगळ्यात  मोठ नुकसान  २००७ ते २००९ च्या दरम्यानच  झाल आहे. एक कोटी रुपयाच्या आसपास नुकसान झालय"

गुरूची दशा सुरु झाल्या झाल्या या व्यक्तीला एका प्रोजेक्ट मध्ये जवळ पास कोटी  रुपयांचा फटका बसला. कोटी रुपयाच नुकसान होण  म्हणजे बाजारात रुपया हरवण नव्हे. 

२००९  नंतर पुन्हा गाडी रुळावर आली. आता सर्व मार्गी लागून नवीन  Drinking Water चा प्लान आहे. जवळ जवळ ५० ते ६० लाखाच्या आसपास गुंतवणूक करावी लागेल ? करू का  नको ? हा  खरा प्रश्न आहे.

येणारी  केतूची दशा पुन्हा  एकदा याला झटका देणार याची खात्री झाली. मी म्हंटल " गुंतवणूक करायची  कि नाही  ते तुमच तुमी ठरवा, पण २०१४ ते २०१५ या दरम्यान  आर्थिक हानी होणार म्हणजे होणार त्या दरम्यान डोळ्यात तेल घालून व्यवसायात लक्ष घाला व जेव्हढ वाचवता येईल तेव्हढ वाचवायचं  बघा अन्यथा थांबून घ्या व २०१५ नंतरच नवीन व्यवसाय सुरु करा."


शुभं भवतु  !

आपला 
नानासाहेब 

Friday 4 January 2013

रूलींग ग्रह आणि अचूकता ...

नमस्कार

काल  सकाळी ऑफिसला येताना  सुलेखा   डॉट कॉम च्या मार्केटिंग च्या माणसाचा फोन आला. तुमची जाहिरात द्या अशी अशी ऑफर चालू आहे, अशान अस होईल वगैरे वगैरे.

म्हंटल "मला त्याची गरज नाहीये, मी  जाहिरात देणार नाही." 
तो म्हंटला "जाहिरात द्यायची किंवा नाही हे नंतर ठरवा  आमची ऑफर तर ऐका, मी आमचा बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर तुमच्याकडे  पाठवतो"

ओके ! पाठव अस म्हणून मी ऑफिसला आलो सकाळच्या  दोन कन्सलटन्सी आवरून बसलोच होतो इतक्यात त्या  बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसरचा फोन आला. त्यावेळी तो माझ्या ऑफिस पासून २५ - ३०  किलोमीटर दूर  कुठेतरी होता. त्याने माझा पत्ता घेतला व  येतोय अस म्हणून  फोन ठेवला.

नंतर दहाएक मिनिटे आजची  पेंडिंग कामं काय काय आहेत ती  पाहीली.  इतक्यात मला आठवल नेट  कनेक्टर रिचार्ज करायचं आहे, नवीन वर्षाच पंचांग घ्यायचय, माउस मध्ये मध्ये बंद पडतो तो बदलायचा आहे. म्हणजे बराच वेळ जाणार. त्यात त्या बहाद्दरान कधी येणार काय हे काही सांगितलं नव्हत.  तशी मला त्याची चिंता  करायचं काही कारण नव्हत. आला तर वाट पाहत बसेल. पण मला अस कुणाला  ताटकळत ठेवण आवडत  नाही. 

म्हंटल चल रुलिंग ग्रहांचा उपयोग करूया. हा बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर  किती वाजे पर्यंत  येणार ते पाहू.

कालची  तारीख .३.०१.२०१३ वेळ ११.३१ सकाळी
            रूलींग ग्रह
लग्न मीन        - स्वामी गुरु
चंद्र नक्षत्र पूर्वा  - स्वामी शुक्र
चंद्र राशी सिंह  - स्वामी रवि
वार गुरुवार     - स्वामी गुरु

प्रश्न वेळेस मीन हे द्विस्वभावी लग्न सुरु होते. म्हणजे याची येण्याची  वेळ  बदलू शकते. त्यामुळे त्याच्या येण्याबद्दल काही शंका निर्माण झाल्या त्या अशा...

एकतर हा लंचून  येईल किंवा लंच न घेता  येईल,  बाईकवर येईल किंवा बसने,  सध्या महामार्ग विस्तारीकरणाच काम जोरात सुरु आहे. त्यामुळे ब-याचदा ट्राफिक जामला तोंड द्याव लागत वगैरे 

मीन हे लग्न सकाळी ११:१५ ते १२:५१ पर्यंत, मीनेत गुरु , शनि व बुधाची नक्षत्रे आहेत,  मी रुलिंग घेतलं ती वेळ ११:३१.  त्यावेळी गुरूच नक्षत्र संपून शनीच सुरु झाल होत. शनि ,बुध रुलिंग मध्ये नाही.  त्यानंतर मेष लग्न सुरु होईल , मेषेचा स्वामी मंगळ  रुलिंग मध्ये नाही. मेष लग्न २:३६ पर्यंत, नंतर वृषभ लग्न सुरु होईल. वृषभेचा स्वामी शुक्र रूलींग  मध्ये आहे. वृषभेत रवी, चंद्र व मंगळाची नक्षत्र येतात. त्यापैकी रवि रुलिंग मध्ये आहे. त्याची व्याप्ती  १:१३:२० ते ३:०:० अशी आहे. त्यात गुरूचा सब  आहे. गुरु रुलिंग मध्ये आहे. म्हणजेच वृषभ  लग्नी शुक्राच्या नक्षत्रात व  गुरूच्या सब मध्ये तो 'बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर' येणार. वृषभ लग्न २:३७ ला सुरु  झाले ते लग्न ३ अंशावर अंशावर येईल त्यावेळी ती  व्यक्ती येईल. २:३७ मध्ये ३ अंश  मिळवले. २:४९ ला तो यायला पाहिजे.

म्हणजे त्याला यायला बराच  अवधी आहे. पण मीन लग्न द्विस्वभावी असल्यामुळे आणखी एक वेळ निश्चित करायला हवी. पण कोणती ? कारण मीनेत गुरु, शनि, व बुधाची नक्षत्र आहेत, शनि बुध रुलिंग मध्ये  नाहीत.  नाहीत ...?   अहो बुध रवि धनेत होते. बुध रवीच्या युतीत. म्हणजेच बुध सुद्धा रुलिंग ग्रह होतो व मीनेत बुधाच नक्षत्र आहे. म्हणून मीन लग्नी,  बुधाच्या नक्षत्रात व शुक्राच्या सब मध्ये 'ती व्यक्ती येईल' . शुक्र का  घेतला तर शुक्र प्रथम प्रतीचा आहे म्हणून. शुक्राचा सब १९:२०:० ते २१:३३:२० विकला पर्यंत  आहे. म्हणजेच ११:१६ मध्ये २१ अंश मिळविले तर १२:४० ला ती व्यक्ती येणार अस म्हणायला हरकत  नाही. पुढील  सब सुद्धा रवीचा आहे व रवि सुद्धा रुलिंग मध्ये आहे. म्हणजे १२:४० ते १२:५०  या दरम्यान तो  'बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर' यायला  हवा.

वरील प्रकारे मी दोनी वेळा निश्चित करून व ऑफिस मधून आता १२:५० नंतरच बाहेर पडू असा विचार करून मी इतर कामात गुंतलो.. 

बरोबर १२:४९ ला त्यान फोन केला "तुमच ऑफिस कुठे आहे ? मी आलोय."
म्हंटल "एन. डी. सी समोर"
मी केबिन च्या बाहेर पाहिलं एक तरुण  फोन बंध करून इकडेच येत होता. १२:५० ला तो केबिन मध्ये आला व त्यान त्याच बिझनेस कार्ड माझ्या टेबलवर ठेवत तो म्हंटला  "मी गणेश कदम, सुलेखा डॉट काम कडून  आलोय.......... "     

आपला
नानासाहेब