Sunday 19 June 2011

नव ग्रहांपैकी फक्त मंगळ ग्रहाचाच दोष का असतो ?

नव ग्रहांपैकी फक्त मंगळ ग्रहाचाच दोष का असतो ? इतर ग्रहांचा दोष का मानत   नाहीत ? कारण मंगळ हा पाप ग्रह आहे, अविचारी आहे,  अग्नी प्रकृती आहे, जलद गतीने परिणाम करणारा आहे. वैवाहिक सुखात बाधा निर्माण करतो.  

हा मंगळ जर १ ४ ७ ८ १२ पैकी असेल तर मंगळ दोष मानला जातो किंवा मंगळाची पत्रिका समजली जाते.  

शनी सुद्धा पाप ग्रह आहे पण तो अकस्मात हानी करीत नाही. तो नियोजनबद्ध वाट लावतो.

या पाचच भावात मंगळ दोष का? सौम्य व कडक मंगळ केंव्हा समजावे ? 

ज्या भावात मंगळ असतो त्यापेक्षाही जास्त परिणाम तो दृष्टी असलेल्या ठिकाणी करतो. 

जर मंगळ 1st house मध्ये असेल किंवा लग्नात असेल तर त्याची दृष्टी सप्तमावर म्हणजे विवाह स्थानावर असते. जातकाचा स्वभाव तापट असतो. त्याची चौथी दृष्टी चतुर्थ स्थानावर असते. या भावावरूनच सर्व सुखे बघितले जातात. सुखाची हानी करतोच व वैवाहिक सुखाचीही हानी करतो. स्रियांना वैवाहिक सुखाचा कारक मंगळ आहे. त्यामुळे त्यांना तो जास्तच त्रासदायक ठरतो. पुरुषांपेक्षाही स्रियांना मंगळ दोष जास्त त्रास देतो. 

पुरुषाच्या कुंडलीत मंगळ जर सप्तमात असेल तर पत्नी कर्कश, तापट, कैदासीन मिळते. म्हणजेच सप्तमात मंगळ असेल तर वैवाहिक जोडीदाराचा स्वभाव तापट असतो. 

अष्टमात मंगळ असेल तर आकस्मित मृत्यू , पूर्ण आयुष्य नाही, घातपात, अपघात, घर सोडून जाणे, दूरदूर रहाणे असे भोग वाट्याला येतात. एकंदरीत काय तर वैवाहिक सुख मिळत नाही. 

व्यय स्थानात जर मंगळ असेल तर मंगळाची आठवी दृष्टी सप्तमावर असते. व्ययात मंगळ म्हणजे अशुभ. हे शैयासुखाचे स्थान आहे. अनेक अपप्रकार निर्माण होतात. शैयासुख नष्ट होते. लग्नबाह्य संबंध स्थापित होतात. म्हणून मंगळ दोष मानला जातो. 
       
जर मंगळ १ ८ १० ४ ३ ६ या राशीचा असेल तर सौम्य असतो. मेष व वृश्चिक या स्वराशी आहेत. उच्च राशी मकर असेल तर मंगळ दोष नाही . मंगळ जर शत्रूराशीत असेल म्हणजे ३ ६ असेल तर मंगळ दोष नाही. जर मंगळ निचीचा असेल तर बलहीन असतो. उदा. कर्क राशी. मंगळ दोष नाही. मंगळ जर रविजवळ असेल किंवा एकाच अंशात्मक युतीत असेल तर सौम्य मंगळ. याचाच अर्थ मंगळ दोष नाही.

आयुष्यात २०-५० हे वैवाहिक सुखाचे वर्ष समजले जातात. या दरम्यानच जर मंगळाची दशा  येत असेल तर मंगळ दोष समजावा. दशा भयंकर परिणाम करते. जातकची अक्षरश: दशा दशा होते.

सप्तमेश मंगळ अष्टमात किंवा अष्टमेश मंगळ सप्तमात असेल तर महादोष. स्रीजातक असेल भयंकर दोष. वैधव्य येण्याची दाट  शक्यता. 

मंगळाच्या पत्रिकेत जर गुरु ६ ८ १२ असेल तर गुरूच बल मिळणार नाही. वैवाहिक आयुष्याची धूळदान होते.

आपला
नानासाहेब पाटील

2 comments:

Anonymous said...

good

Anonymous said...

nice. krupaya shani baddalahee lihaave.