Thursday 23 June 2011

मी कुठले रत्न धारण करू ?

कुठले रत्न धारण करावे याबद्दल ब-याचदा संभ्रम निर्माण होतो. काही वेळा नको ते रत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो अन ते अंगाशी येत. 

समजा चंद्र दशमात  आहे व चंद्राच्या मालकीची कर्क रास तृतिय भावारंभी आहे. गुरु पंचमात असून अष्टमेश व लाभेश आहे.  चंद्र दशमात म्हणजे नोकरीचा सुकाळ. अनेक नोक-या मिळतात, मानसन्मान, सामाजिक जीवनात यश मिळते, धंदा व्यवसायात उर्जितावस्था येते. 

एखाद्याच चांगभल असेल तर तो ज्योतिष्याकडे जाणार नाही. पत्रिकेत चंद्र दशमात असूनही  तो ज्योतिषाकडे येतो व नोकरी गेल्याच किंवा व्यवसायात अडचणी निर्माण झाल्याच सांगतो. 

चंद्र दशमात असूनही नोकरी जाते, नोकरी मिळत नाही किंवा व्यवसायात अडचणी निर्माण व्हायला लागतात का होत अस ?  वर सांगितल्या प्रमाणे चंद्र जरी दशमात असला तरी तो गुरूच्या मालकीच्या नक्षत्रात आहे व गुरु पंचमात असून तो अष्टमेश व लाभेश आहे म्हणजेच ५,८,११ आहे व चंद्र १०, ३ आहे. म्हणजेच चंद्र ज्या भावस्थानाचा कार्येश आहे त्याच्या ऐवजी गुरु ज्या भावस्थानाचा कार्येश आहे त्याचीच  फळे मिळतील व त्यानंतर जमल्यास चंद्र ज्याठिकाणी आहे त्याची फळे मिळतील.     

गुरु पंचमात म्हणून तो षष्टाच्या व्यय स्थानाचा  बलवान कार्येश झाला अशा अवस्थेत नोकरी जाणारच, नोकरी मिळणारच नाही किंवा धंदयाची पार वाट लागेल.

मग अशा जातकाला कुठले रत्न धारण करावे लागेल कळले का ?  पुष्कराज ? कारण धंदयात बरकत म्हंटल कि बरेच व्यावसायिक पुष्कराज धारण करताना दिसतात. पण  जर या जातकाने  पुष्कराज रत्न धारण केले तर धंदयात ऊर्जितावस्थेऐवजी मोठा तोटा होऊन दिवाळखोरीच दिसेल.

रत्न धारण करूनही त्याला रिझल्ट्स मिळत नाही व जातकाचा मात्र जोतिष शास्त्रावरचा विश्वास उडून जातो.

मग अशावेळेस चंद्रबल वाढवण्याकरिता मोती रत्न धारण करण्याचा सल्ला त्याला दिला जातो व तेच योग्य आहे. 

कुठलेही रत्न धारण करताना एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा सहा, आठ,  बारा  या स्थानांचे रत्न कधीच धारण करू नये.

कारण सहावे रोग स्थान आहे, आठवे मृत्यू स्थान आहे व बारावे व्यय स्थान आहे. या स्थानांचे ग्रह नकारात्मक भूमिका निभावत असतात. यास्थानांची रत्ने वापरणे म्हणजे शत्रूची ताकद वाढवण्यासारख होईल.  

लग्नात मंगळ असलेल्या व्यक्तीने जर पोवळे वापरले तर तो स्वतःच भांडणे करीन व सांगेन सध्या माझ  कुणाशीच पटत नाही. कस पटणार मेषेचा मंगळ म्हणजे अग्नी. पोवळे धारण करून आगीत तूप ओतल्यासारखच  होईल.

शुक्र कलेशी  निगडीत आहे कलेचा कारक आहे. एखादयाचा कलेशी संबंधित व्यवसाय असेल तर अश्या व्यक्तीला हमखास शुक्राचे रत्न  हिरा वापरायला सांगतात. ब-याच बायकांना हि-याचे दागिने वापरण्याची हौस असते. 

समजा जातक जर स्त्री असेल व शुक्र चतुर्थात असेल तर ती  अविवाहित आहे तोपर्यंतच त्या जातकाने हिरा धारण केला तर लाभदायक ठरेल. लग्न झाल्यानंतर मात्र ते रत्न वापरू नये. कारण शुक्र चतुर्थेश असल्यामुळे पंचमाचा व्ययेश आहे व तो संतती होण्यास अडथळे निर्माण करणारच. 

मग पुन्हा ज्योतिष्याकडे ! संतती होत नाही म्हणून !

आपला 
नानासाहेब पाटील

2 comments:

Anonymous said...

namaskar,

blog aavadala.

Dhanu lagna, lagnesh Guru vyayat. Shani, Budh lagnaat. Ravi, Shukra dvitiyaat, Ketu chaturthat, Mangal panchamat, chandra mithunet saptamat, harshal astamat, pluto navamaat, raahu dashmaat, neptune laabhaat.
nokareevar kaayam traas. samaadhan naahee. saddhyaa nokaree sutalee (lay-off), looking for job. Konate ratna vaaparaave?

Unknown said...

The King Casino | Situs Judi Slot Online Terbaik 2021
Play online Pragmatic Play gri-go.com Slots at The King Casino - 토토 Member Baru & Terpercaya www.ambienshoppie.com 2021! apr casino Rating: https://septcasino.com/review/merit-casino/ 98% · ‎240,388 votes