!! श्री !!
नमस्कार मित्रहो काल एका जातकाची कुंडली बघितली . कुंडलीचा अभ्यास चालू असताना त्या पत्रिकेतील विशेष बाब जी नजरेस आली . तिचेच विश्लेषण करतोय . जातकाचा प्रश्न विवाह संबंधी होता त्याच उत्तर दिल्यानंतर माझ इतर गोष्टींकडे लक्ष गेल अन चमकलोच. त्याची कुंडली मी बाजूला दिलेली आहे. गुप्ततेमुळे नाव वगैरे काढून टाकलय. अर्थात हा काही खूप खाजगी विषय नाही म्हणून मी तो ब्लॉग वर टाकत आहे.
कुंडलीच निरीक्षण करताच लक्षात येईल कि पाच पाच ग्रह तृतीयाचे कार्येश होतात. बुध, गुरु ,शुक्र , चंद्र तृतीयात, शनी तृतीयेश.
जन्म १९८७ चा. शनीची महादशा १९९१ ते २०१० पर्यंत कार्यरत. शनी व्ययात, द्वितीयेश, तृतीयेश तसेच शनी बुधाच्या नक्षत्रात, बुध तृतीयात. त्यानंतर येणारी महादशा केतूची, ती २०३४ पर्यंत कार्यरत आहे. केतू चंद्राच्या दृष्टीत, चंद्र तृतीयात - गुरूच्या नक्षत्रात, गुरु तृतीयात व लग्नेश, केतू चंद्राच्या नक्षत्रात चंद्र तृतीयात. त्यानंतर येणारी महादशा शुक्राची, शुक्र तृतीयात, षष्ठेश, दशमेश व लाभेश , तसेच शुक्र शनीच्या नक्षत्रात, शनी व्ययात, द्वितीयेश व तृतीयेश. हि महादशा २०५४ पर्यंत कार्येश.
त्यानंतर येणारी दशा रवीची ती २०६० पर्यंत कार्येश. रवी सप्तमात व नवमेश, रवी केतूच्या नक्षत्रात. केतू वरील प्रमाणे कार्येश.
एकंदरीत हि जंत्री बघता मी जातकाला विचारल कि या व्यक्तीच शिक्षण घराबाहेर दूर झाल का ? त्यांनी लगेच होकार दिला. आणखी पुढे सांगत मी म्हंटल. "हि व्यक्ती नोकरी सुद्धा घरापासून दूर राहूनच करीन. याला वाहन सौख्य कमी मिळेल"
त्यावर लगेच त्यांनी सांगितलं "हो आम्ही दोघे एकाच कंपनीत नोकरीला लागलो, पण काही महिन्यातच तो कंपनी सोंडून दुसरीकडे जॉईन झाला, शिक्षणातही त्याला अडचणी आल्या होत्या."
माझ्या समोर जे जातक बसले होते मी त्यांना विचारल " हे सगळ तुम्हाला कस माहित "
"कारण तो माझा चुलत भाऊच आहे." त्यांनी सांगितलं.
माझ्या समोर जे जातक बसले होते मी त्यांना विचारल " हे सगळ तुम्हाला कस माहित "
"कारण तो माझा चुलत भाऊच आहे." त्यांनी सांगितलं.
"याला वाहन सौख्य कमी मिळेल, राहती घर बदलतील. म्हणजेच गृह सौख्य कमी मिळेल" मी पुढे सांगितलं.
"त्याला अजून निट गाडी चालवत येत नाही, खूप कमी वेळा तो गाडी वापरतो."
"असच होणार अगदी २०६० पर्यंत तो प्रवास खूप करणार कारण त्याचा तृतीय भाव मजबूत लागलाय." मी विश्लेषण करून सांगितलं.
"ज्योतिष शास्त्र इतक्या खोलात जावून मार्गदर्शन करू शकत ? मला विशेष वाटतंय " तो म्हणाला.
"हो. अनेक गोष्टींचा मागोवा या शास्त्रातून घेता येतो. खरतर यात विशेष काहीच नाही. कोणीही व्यक्ती जी कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यासक आहे ती सांगू शकते. त्या व्यक्तीमध्ये काही दैवी शक्ती किंवा विशेष शक्ती असते अस नाही. हे उपकार ज्योतिष शिरोमणी कृष्णमुर्तिनी करून ठेवलेत." त्याला सांगताना मला खरच आतून ज्योतिष मार्तंड कृष्णामुर्तींचा अभिमान वाटत होता.
या कुंडलीच वैशिष्ट काय आहे कळल का ? ज्या सुखासाठी मनुष्य आयुष्यभर धडपडतो, काबाड कष्ट करतो, एक नंबर दोन नंबर करतो तेच सुख जर माणसाला मिळणार नसेल तर......?
शुभं भवतु !
शुभं भवतु !
आपला
नानासाहेब
No comments:
Post a Comment