|| श्री ||
नमस्कार मित्रहो !
रात्री आठ साढे आठ ची वेळ होती. इतक्यात गणेश आला. अर्थात तो मित्रच आहे. तो जसा मित्र आहे तसा जातकही आहे. जातक ह्या अर्थी कि तो वेळोवेळी ज्योतिष मार्गदर्शन घेण्याकरिता येत असतो म्हणून. आल्या आल्या त्यान सांगितलं आपला एक प्रश्न बघायचाय तुझ हातातलं काम संपव मग विचारतो.
त्यान अस म्हंटल्यावर मी माझ हातातल काम संपवलं. "बोल काय प्रश्न आहे ?"
"सोनीची एजन्सी मिळेल का. ? "
"तुझ्याकडे तर सोनी ब्रांड होताच ना ? आता पुन्हा डीलरशिप म्हणजे हा काय प्रकार आहे ? " माझा जरा गोंधळच उडाला. याच इलेक्ट्रोनिक्सच शोरूम आहे. त्यात हा सगळ्या वस्तू नावाजलेल्या कंपनीच्याच ठेवतो म्हणजे सर्विसला ला वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही अस तो म्हणतो.
"इथल्याच एका डीलरने काडया केल्या होत्या. आत्ताच त्याला जाम धुतला. तिकडनच येतोय. त्या भडव्याला धुतला म्हंटल्यावर कंपनी आपल्याला माल देणार कि नाही ते बघ." त्यान एका दमात सांगितलं
"ओ के ! काढ टोकन " मी टोकनची पिशवी पुढे करत म्हंटल.
त्यान टोकन काढल. नंबर होता १७६
मी तो के पी सिड घेवून संघनकावर प्रश्न कुंडली टाकली. ती बाजूलाच दिलेली आहे.
कुंडली संघनकावर छापून आली चंद्र लाभात दिसताच जरा हायस वाटलं.
या कुंडलीचा लाभाचा उप नक्षत्र स्वामी शनी असून शनी दशमात, द्वितीयेश व तृतीयेश आहे. तसेच शनी मंगळाच्या नक्षत्रात मंगळ दशमात, व्ययेश व पंचमेश आहे. शनी तृतीयाचा कारक आहे. तसेच तो मंगळाच्या माध्यमातून व्ययेश आहे. म्हणजे खर्च होणारच.
मी त्याला म्हंटल "खर्च होईल "
"माल घ्यायचा म्हंटल्यावर खर्च होणारच ना . इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार " त्यान त्याच गणित सांगितलं.
"ठीक आहे" अस म्हणून मी तृतीयाचा उप नक्षत्राकडे लक्ष केंद्रित केल.
मी त्याला म्हंटल "खर्च होईल "
"माल घ्यायचा म्हंटल्यावर खर्च होणारच ना . इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार " त्यान त्याच गणित सांगितलं.
"ठीक आहे" अस म्हणून मी तृतीयाचा उप नक्षत्राकडे लक्ष केंद्रित केल.
तृतीयाचा उप नक्षत्र स्वामी गुरु असून गुरु षष्टात, लग्नेश व चतुर्थेश आहे. गुरु चंद्राच्या नक्षत्रात. चंद्र लाभात व व्ययेश आहे. तृतीयाचा उप नक्षत्र लाभाचा मजबूत कार्येश आहे तसेच लाभाचा उप नक्षत्र तृतीयाचा कार्येश आहे. त्यामुळे काम होणार हे लक्षात येत.
आता डीलर शिप कधी मिळणार ? किती दिवसात कंपनीचा माल सुरु होणार वगैरे वगैरे ?
सध्या कुंडलीला शनीची महादशा व केतूची अंतर्दशा सुरू आहे. केतूची महादशा १८ सप्टेंबर पर्यंत आहे. शनी लाभाचा व तृतीयाचा कार्येश आहेच आता फक्त केतू अंतर्दशेत हे कार्य होणार का ?
केतू पंचमात आहे, केतू - मंगळ व चंद्राच्या दृष्टीत, मंगळ दशमात द्वितीयेश व पंचमेश मंगळ चंद्राच्या उपनक्षत्रात चंद्र लाभात व व्ययेश, तसेच चंद्र शनीच्या नक्षत्रात त्यामुळे चंद्र लाभाचा व तृतीयाचा मजबूत कार्येश होतो.
एकंदर स्थिती पाहता मी गणेशला म्हंटल. " १८ सप्टेंबर पर्यंत काम हो जायेगा."
त्यान पुन्हा खरच का वगैरे विचारल नाही. कारण त्याला यापूर्वी आलेले अनुभव.
वरील घटना २४ ऑगस्ट ला घडली व ३० ऑगस्टला रिप्लाय आला. त्याची अन कंपनीची बोलणी यशस्वी होवून त्याला पूर्ववत सोनीच्या मालाचा पुरवठा सुरु झाला.
शुभं भवतु !
आपला
नानासाहेब
शुभं भवतु !
आपला
नानासाहेब
No comments:
Post a Comment